ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
उन्हाळ्यातही घ्यावी लागते ओठांची काळजी, सोप्या टिप्स

उन्हाळ्यातही घ्यावी लागते ओठांची काळजी, सोप्या टिप्स

केवळ थंडी आली की ओठ फुटतात असं नाही. काही जणांना हा त्रास उन्हाळ्यातही होतो. खरं तर ओठांची काळजी तुम्हाला कायम घ्यावी लागते. उन्हाळ्यात ओठांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही ज्याप्रमाणे हिवाळ्यात ओठांची काळजी घेता तसंच काहीसं उन्हाळ्यातही आपण ओठांना जपायचे आहे. उन्हाळा हा खरं तर त्वचा अधिक कोरडी करतो आणि उन्हामुळे चेहरा निस्तेजही होतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासह तुम्हाला ओठांचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी नेमकं काय करायला हवे ते या लेखातून आपण जाणून घेऊ. 

ओठांना असे करा मॉईस्चराईज

उन्हाळा असो वा हिवाळा ओठांना मॉईस्चराईज करणे नेहमी गरजेचे असते. रोज तुम्ही ओठांना मॉईस्चराईज करावे. कोल्ड क्रिम अथवा व्हॅसलीनचा उपयोग करा. बोटावर थोडेसे कोल्ड क्रिम घेऊन हलक्या हाताने ओठांची मालिश करा. तसंच तुम्हाला जर मालिश आवडत नसेल तर तुम्ही तुपानेही ओठांना मऊ आणि मुलायमपणा देऊ शकता. तुम्हाला नैसर्गिकरित्या ओठांचे मॉईस्चराईज करता येते. 

अशी करा ओठांची स्क्रबिंग

अशी करा ओठांची स्क्रबिंग

Freepik.com

ADVERTISEMENT

ओठांचे वेळोवेळी स्क्रबिंग करणेही गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही अर्धा चमचा पिठी साखर घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. मग आपल्या बोटाने अथवा कापसाने हे मिश्रण हलकेपणाने ओठांवर लावा. हळूहळू ओठांची मालिश करा. यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आणि मग तुम्ही थोड्या वेळाने कोमट पाण्याने ओठ धुवा. हे करून झाल्यावर ओठांना लिप बाम लावा. हे तुम्ही नियमित स्वरूपात किमान आठवड्यातून एकदा अथवा पंधरवड्यातून एकदा नक्की करा. 

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती (Home Remedies For Dark Lips)

असा घालवा ओठांचा मेकअप

लिपस्टिक अथवा लिप लायनर काढण्यासाठी तुम्ही कोल्ड क्रिमचा वापर करा. आता बाजारामध्ये अनेक वाईप्स आले आहेत. त्यापैकी तुम्ही MyGlamm च्या फेशियल वाईप्सचाही मेकअप काढण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. मात्र कोल्ड क्रिम लावल्यानंतर ओठांचा हलक्या हाताने मसाज करा. ओठांना न रगडता तुम्ही हा मेकअप हलक्या हाताने काढा. त्यावर लिपस्टिक काढून झाल्यावर मॉईस्चराईजर लावा. यामुळे तुमचे ओठ अतिशय मऊ आणि मुलायम राहतात. 

गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

ADVERTISEMENT

 

उन्हाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी बनवा घरगुती लिपग्लॉस

तुम्हाला जर बाहेरचा बाजारातील लिपग्लॉस आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरीही उन्हाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी लिपग्लॉस करू शकता. 

साहित्य 

  • ½ चमचा मेण
  • 2 चमचा कोको बटर 

कृती 

ADVERTISEMENT
  • एका लहान बाऊलमध्ये कोको बटर आणि मेण घाला. या बाऊलपेक्षा मोठया भांड्यात पाणी घ्या आणि ते गरम करत ठेवा. 
  • जसजसे पाणी गरम होईल मेण विरघळेल आणि विरघळून त्यात कोको बटर व्यवस्थित मिक्स होईल 
  • व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर याचा लिप बाम म्हणून उपयोग करा 

घरीच बनवा प्रोटेक्टिव्ह क्रिम

घरच्या घरी तुम्ही तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी प्रोटेक्टिव्ह क्रिमही तयार करू शकता. त्याची पद्धत आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. 

साहित्य 

  • 2 चमचे मेण
  • 4 चमचे बदामाचे तेल 
  • 2 चमचे गुलाबपाणी 

कृती 

  • एका लहानशा बाऊलमध्ये मेण विरघळवून घ्या
  • त्यामध्ये बदाम तेल मिक्स करा 
  • हे तापवून घेतल्यानंतर खाली उतरवा आणि त्यात गुलाबपाणी मिक्स करा
  • हे मिश्रण घट्ट होऊ द्या आणि मग नंतर कोमट असताना बाटलीत भरा आणि नियमित याचा वापर करा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT