ऑक्टोबर महिना सुरू होत नाही तोपर्यंत त्याची उष्णता जाणवायला सुरूवात होते. अगदी मे महिन्यापेक्षाही जास्त गरम या महिन्यामध्ये होत असतं. पण याच महिन्यात अनेक सणही येत असतात. त्यावेळी आपल्याला नटायचं सजयाचंदेखील असतं. पण October Heat मध्ये आपल्या लुकची नक्की कशी काळजी घ्यायची हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात आपली त्वचा अधिक घामट, तेलकट होत असते. अशावेळी मेकअप जास्त न करणंच योग्य. पण मग नक्की कसा लुक करायचा असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपल्याला सुंदरही दिसायचं असतं आणि येणारा घाम आणि चिकटपणादेखील नको असतो. त्यामुळे यावेळी नक्की आपला ‘लुक’ कसा असायला हवा याबद्दल थोडं जाणून घेऊया.
1. द्या नॅचरल लुककडे लक्ष
Shutterstock
October Heat मध्ये जास्तीत जास्त तुम्ही नैसर्गिक स्वरूपाचा अर्थात ‘नॅचरल लुक’ देण्याचा जास्त प्रयत्न करावा. तुमची त्वचा जर डागरहित असेल तर फाऊंडेशनचा उपयोग करणं शक्यतो टाळा. अशा दिवसात तुम्ही चेहऱ्याला मॉईस्चराईजर आणि बेबी पावडर लावलीत तर तुम्हाला एक फ्रेश लुक मिळतो. अशा दिवसात तुम्ही जितका कमी मेकअप कराल तितका तुमचा लुक अधिक उठून दिसतो आणि तुम्ही फ्रेश दिसता.
2. करा मिनिमल मेकअप
Shutterstock
तुम्हाला नैसर्गिक लुक द्यायचा असेल तर तुम्ही डोळ्यांना फक्त काजळ लावा. अगदीच तुम्हाला वेगळ्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही आयशॅडोदेखील लावू शकता. ग्रे अथवा ब्राऊन आयशॅडो तुमच्या चेहऱ्याला नॅचरल लुक देतात. तसंच रात्रीच्या वेळी आयलायनर लावू शकता. रात्रीच्या वेळी तुमच्या डोळ्यांना उठाव द्यायचा असेल तर तुम्ही आयलायनरचा चांगला उपयोग करून घेऊ शकता. तसंच रात्रीच्या मेकअपमध्ये तुम्ही आयब्रोजच्या खाली थोडं हायलायटर लावूनदेखील डोळ्यांना नैसर्गिक लुक देऊ शकता. त्यासाठी तुम्ही पांढऱ्या अथवा कोणत्याही लाईट रंगाची शेड तुम्हाला वापरता येईल.
नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या
3. पार्टीसाठी करा मॉईस्जराईजरचा वापर
Shutterstock
अशा ऑक्टोबर हिटमध्ये तुम्हाला जर रात्रीच्या वेळी पार्टीला जायचं असेल तर तुम्ही चेहऱ्यावर लिक्विड फाऊंडेशनचा वापर करू शकता. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर अशावेळी तुम्ही मॉईस्चराईजरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच थोडंसं ब्लशर अगदी हलक्या हाताने लावा. चेहऱ्यावर जर डाग असतील तर त्यासाठी तुम्ही फाऊंडेशनच्या आधी कन्सीलर लावा. नॅचरल लुकसाठी लिपस्टिकच्या जागी तुम्ही लिपग्लॉस लावू शकता. तसंच ऑक्टोबर हिटमध्ये तुम्ही पिंक, ब्राऊन, कॉपर आणि बरगंडी अशा रंगाच्या लिपस्टिक वापरू शकता.अशामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते.
लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप
4. ब्लशरचा वापर करून उजळा लुक
Shutterstock
अशा उष्णतेमध्ये तुम्ही तुमच्या गालावरदेखील हलक्या ब्लशरचा वापर करा. कोणताही मेकअप करण्याआधी तुम्ही पावडर ब्लशरचा वापर करा. यामुळे तुमचा लुक अतिशय सुंदर दिसतो. तसंच तुमच्या त्वचेशी मिळताजुळता ब्लशरचा प्रयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर करा. त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर हिटचा त्रास होणार नाही.
5. कपडे आणि परफ्युम महत्त्वाचं
या लुकमध्ये तुमचं परफ्युमदेखील महत्त्वाचं असतं. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येत असतो. त्यामुळे तुम्ही दिवसाच्या वेळी कोलोनचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटतं. तसंच या दिवसात तुम्ही फ्लोरल प्रिंट्स, चेक्स, डॉट्स तसंच लेस अथवा एम्ब्रॉयडरीचे कपडे अथवा कॉटनचे कपडे चांगले दिसतात. पण रंगाची निवड करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी.
मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.