ज्वेलरी ही कोणत्याही ड्रेसचा लुक पूर्णपणे बदलून टाकते. त्यामुळेच साडी किंवा एखादा ड्रेस घेतल्यानंतर त्यावर सगळ्यात आधी आपण ज्वेलरी फायनल करतो. ड्रेस साधा असेल तरीसुद्धा एखादी हेव्ही ज्वेलरी घातली तरी देखील पुरेशी असते. दागिन्यांचा ट्रेंड हा बदलत असतो. साधारणपणे गोल्डन आणि सिल्व्हर प्रकारच्या ज्वेलरी मिळतात. पण हल्ली त्यामध्ये रोझ गोल्ड, व्हाईट गोल्ड अशा दागिन्यांच्या प्रकाराची भर पडली आहे. तुम्हालाही काही वेगळा ट्रेंड कॅरी करायची इच्छा असेल तर तुम्ही सध्या मिस मॅच ज्वेलरीचा ट्रेंड कॅरी करु शकता.
रंग निवडताना
मिस मॅच म्हणजे रंग असे आपल्या सगळ्यात आधी लक्षात येते. एखादा ड्रेस निवडल्यानंतर तुम्ही त्यावरील दागिने शोधताना त्याच रंगाचे शोधत असाल तर तुम्ही तसे करणे आताच बंद करा याचे कारण असे की, मॅचिंगवर मॅचिंग घालण्याचा आता ट्रेंड राहिलेला नाही. उदा. जर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घातले असतील तर तुम्ही हिरव्या किंवा गुलाबी रंगाचे दागिने घालू शकता. कारण असे दागिने जास्त शोभून दिसतात. त्यामुळे आता कोणताही रंग निवडल्यानंतर तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ड होत असतील असे दागिने निवडा.
ट्रेडिशनलवर वेस्टर्न
आता कोणतेही दागिने कोणत्याही वेअरवर घालण्याची फॅशन आहे. म्हणजे झुमका हा प्रकार देखील तुम्ही कोणत्याही कपड्यांवर घालू शकता. हल्ली ट्रेडिशनलवेअरवर वेस्टर्न दागिने आणि वेस्टर्नवेअरवर ट्रेडिशनल दागिने घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्ही अगदी आरामात सिल्व्हर किंवा ऑक्सिडाईज प्रकारातील दागिने हे कोणत्याही प्रकारावर घालू शकता. तुम्हाला असे ट्राय करण्याची भीती असेल तर एकदा तरी हा प्रकार नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल.
गोल्ड नको स्टोन निवडा
हल्ली सोन्याचे दागिने सगळ्यांना नको होतं. सोन्यापेक्षा काहीतरी वेगळे घालण्याची इच्छा नक्कीच तुम्हालाही असेल तर तुम्ही सोन्याच्या दागिन्यांऐवजी स्टोनचे दागिने निवडा असे दागिने नक्कीच तुमचा लुक बदलवण्यास मदत करु शकेल. त्यामुळे तुम्ही गोल्ड ऐवजी शक्य असेल तर मल्टी कलरचेे स्टोन निवडा ते तुम्हाला नक्कीच आवडतील. हल्ली मल्टी कलर, सिंगल कलर असे स्टोन मिळतात ते देखील तुम्ही वापरु शकता.
सोन्याला पर्याय
आता जर तुम्हाला गोल्ड रंगच आवडत नसेल आणि तुम्ही त्याऐवजी जर काही पर्याय निवडण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रोझ गोल्डचे दागिनेही निवडता येतात. अशा प्रकारातील दागिने हे फार नाजूक आणि दिसायला एकदम स्टायलिश दिसतात. त्यामुळे सोन्याला पर्याय आणि तुमच्या दागिन्यांची शान वाढवणाऱ्या अशा दागिन्यांची निवड तुम्ही नक्की करा.
आता तुमच्या अटायर नुसार निवडा मिसमॅच दागिने