ADVERTISEMENT
home / Family
म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

12 मे  हा जगभरात मातृदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीमध्ये आई दडलेली असते. जरी तिने तिच्या गर्भातून बाळाला जन्म दिला नसला तरी तिच्याकडे उपजतच आईपणा असतो. तुम्हाला एखादी मोठी बहीण असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच आला असेल. तुमच्या आयुष्यातील मातृतुल्य अशा व्यक्तिंचा हा खास दिवस आहे. त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठीच हा दिवस खरं तर साजरा केला जातो. या निमित्तानेच आम्ही तुमच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत. म्हणजे नेमका मातृदिन म्हणजे काय? तो साजरा करण्याची गरज काय? वाचकांनी शेअर केलेला मातृत्वाचा अनुभ…आणि आईला नेमंक काय गिफ्ट द्याल या विषयीच अधिक माहिती देणार आहोत. मग करायची का सुरुवात?

mothers 1

भारतात मातृदिन साजरा करण्याची गरज काय? (why we need to celebrate mothers day in india)

भारतात अजूनही अनेक ठिकाणी महिलांना हवा तसा सन्मान दिला जात नाही. तो त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येकांच्या आयुष्यातील योगदान अधोरेखित करण्यासाठी  भारतासारख्या विकसनशील देशात मातृदिन साजरा करण्याची फारच गरज आहे. खरंतरं हा एकच दिवस नसावा. प्रत्येक दिवस हा मातृदिनच असायला हवा. पण भारतातील काही राज्यांमध्ये हा दिवस साजरा करण्याची आजही गरज आहे.

वाचा – Mother’s Day…आईसाठी करा खास आईच्या कविता

ADVERTISEMENT

तुमच्या आईला  मातृदिनाला काय द्याल गिफ्ट?(Perfect gift for your mother on this  mothers day)

mother-2

आता लगेचच तुमच्या मनात आईबद्दल मातृप्रेम जागृत झाले असेल. तिला काय देऊ काय नको असे झाले असेल तर थोडं थांबा तुमच्या आईला तुम्ही दिलेल्या वस्तूंपेक्षा काही वेगळ्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित असतात. त्या तुम्हाला नक्कीच माहीत हव्यात. त्या तुम्ही दिल्यात तर आईचा आनंद गगनात मावेनासा होईल हे नक्की! या गोष्टी कोणत्या ते देखील पाहूया

  •  तुमचा अमूल्य वेळ(valuable time)

आईने तुम्हाला लहानाचे मोठे केले. पण करीअरच्या मागे धावताना अनेकदा आपण आपला सगळा वेळ कामांमध्ये इतका घालवतो की, आपल्याला स्वत:साठीच वेळ नसतो तर आईला आपण कधी वेळ देणार नाही का? पण या मातृदिनाला अगदी ठरवूनच टाका की, तुम्हाला तुमच्या आईला वेळ द्यायचा आहे. खूप दिवस जर तुम्ही तुमच्या आईशी गप्पा मारल्या नसतील तर या  मातृदिनाच्या निमित्ताने तुम्ही पहिल्यांदा जर काही कराल तर तुमच्या आईला तुमचा अमूल्य वेळ द्या. कारण तुमच्या आईचे विश्व तुमच्यापलीकडे नाही. आठवून पाहा तुम्ही तिला जेव्हा एखादा फोन करता तेव्हा तिला किती आनंद होतो. दिवसातून अगदी दोन मिनिटं का असेना तुम्हाला तुमच्या आईला वेळ द्यायलाच हवा.

  •  आदर (Respect)

तुम्ही आज जे कोणी आहात ते तुमच्या आईमुळे आहात. तुम्ही कोणत्याही मोठ्या पदावर गेलात तरी इतरांचा आदर तुम्ही करायलाच हवा. विशेषत: आईचा आदर तुम्ही केलाच पाहिजे. तुमच्याकडून आईचा कधीही अपमान झाला असे तुम्हाला वाटत असेल तर तिची माफी मागा. तिच्या भावनांचा आदर करा तिच्यासाठी यापेक्षा मोठे काहीच नाही.

ADVERTISEMENT
  • बांधिलकी (commitment)

आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच काही कमिटमेंट करत असतो. तुमच्या कामाप्रती असलेली कमिटमेंट तुम्ही तंतोतंत पाळता. आई ही देखील तुमच्या आयुष्यातील मोठी कमिटमेंट आहेत. अनेक महिला त्यांच्या मुलांसाठी आपले करीअरदेखील सोडतात, तेव्हा त्या कसलाच विचार करत नाहीत. त्यांना फक्त महत्वाचे असता तुम्ही… त्यामुळे आईप्रती तुमच्या असलेल्या कमिटमेंट जर राहून गेल्या असतील तर तुम्ही त्या आधी आवर्जून पूर्ण करा.

  • नातेसंबंध जपण्याची जबाबदारी(Responsibility)

आई आणि मुलाचे नाते हे इतर सगळ्याच नातांपेक्षा वेगळे असते. हे नाते जपण्याची जितकी जबाबदारी आईची असते तितकीच तुमची असते. काही कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुम्ही तुमचा रुसवा फुगवा दूर करुन नाते संबंध जपण्याची तुमची जबाबदारी पार पाडा.

  •  योग्य काळजी (Care)

वयपरत्वे थकलेल्या आईला तुमची सगळ्यात जास्त गरज असते. तुम्ही तिची काळजी घ्यावी असे तिला मनोमन वाटते. पण ती ते कधीच बोलून दाखवत नाही. कारण तिच्यासाठी तुम्ही अजूनही लहान असता. पण तुमच्या आईला तुमची आता जास्त गरज आहे. हे ओळखून तिची योग्य काळजी घ्या. तिच्यासाठी या पलीकडे काहीच मोठे गिफ्ट नसेल.

आई होणं म्हणजे नक्की काय? जाणून घेऊया नेमकं काय वाटत महिलांना (5 Would be mothers on their motherhood)

 mothers day 2

ADVERTISEMENT

mothers day 2 %281%29

mothers day 3

mothers day 4

mothers day 5
तुमची आई तुमची बेस्ट फ्रेंड (why your mother is your best friend)

चांगला सल्ला देते (Good adviser)

तुमची आई तुमची बेस्ट फ्रेंडच आहे. कारण ती तुम्हाला नेहमी चांगलाच सल्ला देते. आयुष्यात अगदी कोणताही प्रसंग येऊ दे. तुमची ढाल बनून तुम्हाला सगळ्या प्रसंगातून बाहेर काढण्याचे काम आईच करते. तुमच्यासाठी ती अगदी निंजा वॉरिअरही बनू शकते. अगदी करिअरपासून ते तुमच्या प्रेम प्रकरणापर्यंत तुम्ही सगळे काही तुमच्या आईसोबत शेअर करु शकता. ती तुम्हाला प्रत्येकावर चांगला सल्ला देऊ शकते.

उदा. सगळ्यांसाठीच आई हा जीव की प्राण असतो. पण काहींसाठी आई अगदी मैत्रीण असते. वडिलांचा मार वाचवायचा असेल तर आई हा एकमेव पर्याय आहे. शिवाय काही चूक झाल्यानंतर त्यातून बाहेर काढण्याचे काम फक्त आईच करु शकते.

डोळे झाकून ठेवू शकता विश्वास (Trustworthy person in your life)

ADVERTISEMENT

तुम्हाला अगदी काही म्हणजे काहीही शेअर करायचे असेल तर आई हा safe पर्याय आहे. कारण ती या कानाची गोष्ट त्या कानाला लागू देत नाही. त्यामुळेच तुम्ही तिच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आईही अगदी विश्वासू व्यक्ती आहे.

उदा. प्रत्येकाचे काहीना काही सिक्रेट असते. कितीही लपवायचे म्हटले तरी काही गोष्टी आपल्या पोटात राहात नाही. बाहेर कोणच्या मैत्रिणीला या गोष्टी सांगायच्या म्हटल्या की, त्या बाहेर आणखी काही लोकांना कळण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही जर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता तरी ती असते फक्त आई!

अडचणीत कधीच सोडत नाही साथ ( support you in your problems)

mother-3

ADVERTISEMENT

वरील सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एक कळाले असेलच की, कोणताही कठीण प्रसंग येई देत. आई कधीच आपल्या मुलांना सोडून जात नाही. मग तुम्ही आयुष्यात कितीही मोठा गोंधळ घातला असेल तरी ती तुम्हाला ओरडेल, मारेल, बोलेल, टोमणे देईल पण तुमची साथ ती कधीच सोडून जाणार नाही.

उदा. तुमच्याकडून फार मोठा अक्षम्य चुका झाल्या आहेत.त्यातून बाहेर येण्याचा कोणताच मार्ग तुम्हाला दिसत नसेल अशावेळी आई तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न करते. इतकेच नाही. तर तुमच्या चुका दाखवून तुम्हाला चांगला मार्ग दाखवते. वेळप्रसंगी ती इतरांची कटुता सहन करते. पण त्याचा त्रास तुम्हाला होऊ देत नाही.

शॉपिंगसाठी परफेक्ट व्यक्ती (Perfect shopping partner)

विशेषत: मुलींना आईसोबत शॉपिंगला जाण्याचे टेन्शन असते कारण आई… तुम्हाला आवडत असलेले तोकडे कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घेण्यास कटकट करते. पण त्यामागे तिचा चांगला हेतू  असतो. पण तरीही तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडचे कपडे घेऊन देण्यासाठी तिचा सतत खटाटोप सुरु असतो. त्यामुळे तुमच्या शॉपिंगचा परफेक्ट पार्टनर जर कोण असेल तर ती तुमची आई कारण ती कधीच खोटं बोलत नाही. तुम्हाला काय चांगलं दिसतं काय नाही ते तिला माहीत असतं. म्हणूनच शॉपिंगसाठी ती अगदी परफेक्ट पार्टनर आहे.

ADVERTISEMENT

उदा. जर तुमच्या आईने नोकरी केली असेल तर तुम्हाला आठवतंय का पाहा तुमची आई तुम्हाला जसे शक्य असेल तसे नव्या फॅशनचे कपडे आणते.

आईसोबत मस्ती करण्याचा आनंदच वेगळा (perfect person to celebrate)

mother-4

शॉपिंग झालं, गॉसिंपिंग झालं… पण तुम्हाला माहीत आहे का? आईसोबत बाहेर फिरायला जाणे अजिबात बोअर नसते. तर अगदीच आनंदाचे असते. तुम्ही आईसोबत असाल तर तुम्ही मनमुराद गप्पा मारु शकता. हव्या त्या गोष्टी करु शकता. कारण ती असताना तुम्हाला कसलंच टेन्शन नसत.

ADVERTISEMENT

 मातृदिन साजरा करण्याचा ट्रेंड आला कधीपासून (history of mothers day)

हल्ली सगळेच डे सर्रास साजरे केले जातात. पण तुम्हाला जागतिक महिला दिनामागचा इतिहास माहीत आहे का? जागतिक महिला दिन हा जगभरातील 40 देशांमध्ये साजरा केला जातो. साधारण 20 व्या शतकापासून हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.आता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या तारखांना मातृदिन साजरा केला जातो.

आता या मागील इतिहास सांगायचा तर अमेरिेकेत राहणाऱ्या अॅना मारिया यांच्या मृत्यूनंतर हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. अॅना मारिया या समाजसेविका होत्या. अमेरिकन यादवी युद्धांच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रम राबवले. मुलांना मोफत शिक्षण दिले.  कुपोषण, अस्वच्छता आणि त्यावरील उपाय या संदर्भात त्यांनी संबंध आयुष्य मार्गदर्शन केले. त्यांची मुलगी अॅना मारिया रिवस जार्विस यांनी आईच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा व्हावा अशी अमेरिकन सरकारकडे मागणी केली. 1914 साली ही मागणी मान्य करण्यात आली.त्या दिवसापासून हा दिवस मातृदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.

आईला देऊ शकता हे गिफ्ट (Gift ideas for your mom)

रिलॅक्सिंग(Relaxing massage):

आई दिवसभर काम करुन थकते पण सांगत नाही. त्यामुळे तिला रिलॅक्स होणे किती गरजेचे आहे तुम्हाला कळलेच असेल. त्यामुळे आईला मस्त एक रिलॅक्सिंग मसाज गिफ्ट करा. तिचा थकवा काही क्षणापुरता कमी करण्यास तुम्ही मदत कराल.

ADVERTISEMENT

डे आऊटचा करा प्लॅन (Plan for day out) :

घरी बसून बसून आईला कंटाळा आला असेल तर तिच्यासाठी मस्त डे आऊटचा प्लॅन करा. कामाच्या व्यापातून त्यांना छान निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा. जवळचे ठिकाण निवडून तिला तिथे छोटेसे सरप्राईज द्या. बघा तिचा मूड कसा चांगला होता. 

स्किन केअर (skin care kit):

आई तुम्हाला मोठे करता करता स्वत:कडे लक्ष द्यायचे सोडून देते. त्यामुळे तुम्ही तिला स्किनकेअर  किट देऊ शकता. ज्यामध्ये क्लिनझर, टोनर आणि मॉश्चरायझर असेल.

ADVERTISEMENT

 तुम्हाला तुमच्या आईला या सगळ्या व्यतिरिक्तही काही गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही आमच्या popxo shop ला भेट देऊ शकता. तुमच्या आईला देण्यासाठी काही हटके गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील.

 जर तुम्हाला हटके मग दयायचा असेल तर हा पर्याय बघा- VEERE FOREVER COFFEE MUG

मोबाईल कव्हर द्यायचा विचार करत असाल तर QUEEN OF PPT’S PHONE COVER

आईंना होम डेकोरही प्रिय असते PINK LOTUS CUSHION COVER

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

Womens Day Quotes in Hindi
मदर्स डे कोट्स
मदर्स डे स्टेटस
Small Poem on Mothers Day

06 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT