Advertisement

घर आणि बगीचा

तुम्ही तुमचा पासवर्ड बदलता की नाही, पासवर्ड बदलताना

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 15, 2021
तुम्ही तुमचा पासवर्ड बदलता की नाही, पासवर्ड बदलताना

Advertisement

सायबर सुरक्षा ही सध्याच्या काळाची गरज झाली आहे. हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे त्याचे वेगवेगळे अकाऊंट हँडल करणे सगळ्यांनाच भाग झाले आहे. एका क्लिकवर सगळे व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुमचे वेगवेगळे अकाऊंट नक्कीच असतील. मेल, बँक, युपीआय अशा अॅपसाठी पासवर्ड ठेवताना तुम्ही लक्षात राहील असा पासवर्ड ठेवता. पासवर्ड कसा असायला हवा या यादीत येणाऱ्या सगळ्या नियमांचे तुम्ही पालनही करत असाल पण तरीदेखील काही काळानंतर तुम्ही पासवर्ड बदलणे गरजेचे असते. तुम्ही पासवर्ड बदलताना काही काळजी घेणे गरजेचे असते त्या गोष्टी कोणत्या ते देखील जाणून घेऊया. 

काहीही झाले तरी जोडीदारासोबत कधीही शेअर करु नका काही सिक्रेट्स

पासवर्ड बदलताना

साधारण तीन महिन्यांत तुम्ही पासवर्ड बदलणे गरजेचे असते. खूप अॅप हल्ली पासवर्ड बदलण्याची वेळ आली याचे नोटिफिकेशन तुम्हाला पाठवतात. ज्यावेळी तुम्हाला असा मेल किंवा मेसेज येईल त्यावेळी तुम्ही अगदी हमखास तुमचा पासवर्ड बदलायला हवा. पासवर्ड बदलताना काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.

  • खूप जण पासवर्ड सहज आणि लक्षात राहावा असा ठेवण्यासाठी आपला फोन नंबर ठेवतात. असे पासवर्ड ओळखणे सहज शक्य असते. त्यामुळे ही चुकी मुळीच करु नका. 
  • पासवर्ड ठेवताना त्यामध्ये कॅप्सलॉक म्हणजेच इंग्रजीचे मोठे अक्षर हमखास ठेवा. कारण त्याचा फायदा असा की, तुमचा पासवर्ड ओळखणे हे कठीण जाते. त्यामुळे पासवर्ड बदलताना तुम्ही त्यामध्ये एकतरी मोठे अक्षर ठेवा. ते मागे पुढे किंवा मध्ये तुमच्यानुसार कुठेही ठेवले तरी चालू शकेल. 
  •  पासवर्ड ठेवताना तुमच्या घरातील व्यक्तिचे नाव मुळीच ठेवू नका कारण ही नाव शोधणं फार सोपे असते. त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही जवळच्या व्यक्तिचे नाव ठेवू नका. 
  •  पासवर्ड हा मुळीत 12345 अशा स्वरुपातील ठेवू नका. किंवा उलट क्रमाने ठेवू नका. कारण ते ओळखणे फारच सोपे जाते.त्यामुळे तुम्ही मुळीच ही चूक करु नका. किंवा काही जण किबोर्डवरील अक्षर qwertyuiop असे टाईप करुन पासवर्ड तयार करतात. तेही अजिबात करु नका. 
  • पासवर्ड लक्षात राहण्यासाठी त्याची नोंद कुठेतरी करुन ठेवा. एकमेकांना मेल कनेक्ट करुन ठेवा. त्यामुळे तुम्हाला पासवर्ड पुन्हा बदलणे सोेपे जाते. 

तुमचा मोबाईल करायचा आहे का झटपट चार्ज (Mobile Charging Tips In Marathi)

पासवर्ड लक्षात राहात नाहीत?

 हल्ली प्रत्येक गोष्टींसाठी पासवर्ड ठेवण्याची सवय झालेली आहे. अशावेळी सगळेच पासवर्ड सगळ्यांच्याच लक्षात राहतील असे नाही. तुम्हालाही पासवर्ड लक्षात राहणे कठीण जात असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये कोडवर्ड टाकून हे पासवर्ड सेव्ह करु शकता. इतरांना कळणार नाही अशा स्वरुपात तुम्ही तो फोनमध्ये सेव्ह करु शकता. जर तुम्हाला फोनमध्ये नोट्स काढायच सवय झाली असेल तर तुम्ही तुमच्या नोट्समध्येही असे पासवर्ड ठेवू शकता. एखाद्या मेलचा  पासवर्ड तुम्ही लक्षातच ठेवा. कारण एक पासवर्ड कठीण आणि लक्षात राहिल तर तुम्हाला इतर पासवर्ड मिळवणे सोपे जाते. 

 आता तुमच्या महत्वाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड योग्य वेळी बदला त्यामुळे सायबर क्राईमचा त्रास तुम्हाला होणार नाही.

तुम्हीही असे सोपे पासवर्ड ठेवता,मग तुमचेही अकाऊंट होऊ शकते हॅक