ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
अशी तपासा नारळाच्या तेलाची शुद्धता, घरीच करा चाचणी

अशी तपासा नारळाच्या तेलाची शुद्धता, घरीच करा चाचणी

नारळाचे तेल स्वयंपाक आणि केसांना लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. नारळाच्या तेलात बनवलेले पदार्थ चविष्ट लागतातच पण ते आरोग्यासाठी उत्तम असतात. शिवाय नारळाचे तेल तुम्ही केस आणि त्वचेवरही वापरू शकता. केसांची वाढ होण्यासाठी, केस गळणे रोखण्यासाठी, त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल फायदेशीर आहे. यासाठी जाणून घ्या नारळाच्या तेलाचे फायदे… मात्र तुम्ही वापरत असलेलं नारळाचं तेल शुद्ध आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे. कारण बाजारात नारळाच्या तेलाची वाढती मागणी पाहता अशुद्ध अथवा भेसळयुक्त तेल विकलं जातं. यासाठी स्वतःच करा नारळाच्या तेलाची शुद्धता तपासण्यासाठी चाचणी

कशी तपासावी नारळाच्या तेलाची शुद्धता

नारळाचे तेल शुद्ध आहे का हे तपासणं सोपं नक्कीच नाही. कारण तेलात कोणीही भेसळ करू शकतो. पण जेव्हा नारळाच्या तेलात इतर तेल मिसळलं जातं तेव्हा नारळाच्या तेलामधील पोषक तत्त्वं कमी होतात. बऱ्याचदा तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी साधं तेल त्यामध्ये मिसळलं जातं. अशा प्रकारे तयार केलेल्या तेलामध्ये  वीस टक्केही नारळाचं तेल नसतं. यासाठी अशा प्रकारे तुम्ही नारळाचे तेल तपासून पाहू शकता.

नारळाचे तेल फ्रीजमध्ये ठेवा

नारळाचे तेल फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही नारळाच्या तेलाची गुणवत्ता तपासू शकता. ज्यामुळे तुम्हाला नारळाचे तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे सहज समजू शकेल. यासाठी नारळाचे तेल एका काचेच्या अथवा पारदर्शक बरणीत ओता आणि फ्रीजमध्ये ठेवा. जवळजवळ अर्धा तासाने नारळाचे तेल गोठून घट्ट होईल पण जर असं झालं नाही तर ते नक्कीच शुद्ध नाही. कारण नारळाचे तेल थंड तापमानात सहज गोठते. 

तेलाची चव चाखून बघा 

नारळाचे तेल आरोग्यासाठी उत्तम असून त्याचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो. सहाजिकच तुम्ही नारळाच्या तेलाची चव पाहू शकता. जर तुम्ही नारळाच्या तेलात बनवलेले पदार्थ खात असाल तर तुम्हाला नारळाच्या तेलाची चव लगेच कळेल. जर त्यात भेसळ असेल तर तुम्हाला शुद्ध नारळाच्या तेलाची चव लागणार नाही. अती प्रमाणात इतर तेल मिसळलेलं अथवा सुगंध मिसळलेलं तेल भेसळयुक्त असू शकतं. 

ADVERTISEMENT

यासोबतच वाचा मोहरी तेलाचे फायदे, तुम्हीही व्हाल थक्क (Mustard Oil Benefits In Marathi)

तेल गरम करा

नारळाचे तेल गरम करून तुम्ही शुद्धतेची चाचणी करू शकता. यासाठी थोडं तेल एखाद्या कढईत गरम करा. नारळाचे तेल जर शुद्ध नसेल तर त्याला पाण्याप्रमाणे उकळी फुटेल. शिवाय नारळाच्या तेल स्वयंपाक करताना फोडणी दिल्यानंतर अन्नपदार्थावर थराप्रमाणे जमा होतं. असं जर झालं नाही तर तुमचं नारळाचं तेल कदाचित भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

वाचा लवंग तेलाचे फायदे मराठीतून (Lavang Oil Benefits in Marathi)

नारळाचे तेल पारदर्शक दिसते का

नारळाचे तेल कसं दिसतं यावरूनही तुम्ही शुद्धता तपासू शकता. कारण जर तेल शुद्ध असेल तर ते पारदर्शक दिसेल आणि भेसळयुक्त असेल तर स्वच्छ आणि पारदर्शक दिसणार नाही. जर तुमचं तेल थोडं जरी गढूळ आणि स्वच्छ दिसत नसेल तर ते कदाचित मिक्स केलेलं असू शकतं. 

ADVERTISEMENT

नारळाचं तेल खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

नारळाचं तेल शुद्ध आहे की अशुद्ध हे तपासण्यासोबतच तुम्ही ते खरेदी करताना काही गोष्टी पाहायला हव्या.

1.नारळाचे तेल सुट्टे कधीच खरेदी करू नका. कारण अशा तेलात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते.

2.नारळाचे तेल खरेदी करताना तुम्ही विकत घेतलेल्या बॉटल अथवा डब्यावरील माहिती वाचा. ज्यामुळे तुम्हाला तेलाची गुणवत्ता आणि प्रमाण समजेल.

3.तेलाच्या प्रॉडक्टवरील एफएसएसआयचे चिन्ह जरूर तपासा. असे नारळाचे तेल नक्कीच शुद्ध असते.

ADVERTISEMENT

4.नारळाचे तेल शुद्धता तपासल्याशिवाय कधीच खाण्यासाठी वापरू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

17 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT