एखाद्या बर्थडे पार्टीला किंवा एखाद्या वेस्टर्न वेअरच्या पार्टीसाठी वनपीस घालायला खूप जणांना आवडते. खूप जण वनपीस निवडण्यावरुन खूपच कॉन्शिअस असतात. नेमकं मला काय चांगलं दिसतं हे त्यांना कळत नाही. मी लांब वनपीस (one piece) निवडू का शॉर्ट.. टाईड निवडू का फ्लेरी असे जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर अशावेळी तुम्ही वनपीस नेमका वनपीस कसा निवडायचा ते देखील तुम्हाला माहीत असायला हवी. कोणत्याही ब्रँडचा वनपीस निवडताना त्यामध्ये नेमकं तुम्ही काय बघायला हवं ते जाणून घेऊया.
कपड्याचा प्रकार
कोणताही वनपीस घेताना त्याचे फॅब्रिक जाणून घेणे हे गरजेचे असते. आपली फिगर कशी आहे त्यानुसार तुम्ही वनपीस निवडायला हवा. असे केले तर तुम्हाला तो अधिक जास्त उठून दिसतो. जर तुमचे पाय किंवा मांड्या जाड असतील तर पातळ असलेले कपडे तुम्हाला कम्फर्टेबल दिसणार नाही. यामध्ये शॉर्टचा पर्याय तुम्ही अजिबात निवडू नका. त्याऐवजी तुम्ही जाड आणि गडद असलेला रंग निवडा म्हणते तुम्ही त्यामध्ये अधिक चांगले दिसाल. वनपीसमध्ये साधारण कॉटन, जॉर्जेट आणि होजिअरी असे प्रकार मिळतात. त्यानुसार पॅटर्न बदलत जातात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे सगळ्यात आधी लक्ष द्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.
टाईट ड्रेस घातल्यानंतर तुमचेही होते असे, तुम्हाला माहीत हव्या योग्य पँटीज
साईज
वनपीसच्या प्रकारानुसार तुम्हाला त्याची साईज निवडणे गरजेचे असते. जर तुमची फिगर उत्तम असेल तर तुम्ही टाईट आणि घट्ट फिटिंगचे वनपीस निवडू शकता. पण जर तुमची फिगर जर एखाद्या ड्रेससाठी परफेक्ट नसेल तर तुम्ही त्याची साईज निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही साईज निवडताना काळजी घ्यायला हवी. वनपीस तुमच्या शरीराचे प्रदर्शन करण्यापेक्षा ते तुमच्या फिचरना अधिक ठळक दाखवणारे हवे. पण असे करताना तुम्हाला त्यामध्ये वावरणे अगदी सोपे जाते की नाही ते देखील तुम्ही पाहायला हवे. त्यामुळे साईज निवडताना या काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे.
पॅटर्न
पार्टीसाठी कोणता पॅटर्न तुम्हाला निवडायचा आहे ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं कोणत्या इव्हेंटसाठी ड्रेस निवडायचा आहे ते आधी तुम्ही मनाशी ठरवा. त्यानंतर तुम्ही जाणाऱ्या पार्टीसाठी नेमका क्राऊड किंवा कोणत्या प्रकारची लोकं असणार आहेत त्याची देखील माहिती असू द्या. उदा. तुम्ही समजा एखाद्या लहान मुलाच्या बर्थडे पार्टीला जाणार असाल आणि त्या ठिकाणी तु्म्ही डीप नेक किंवा बॉडीकॉन ड्रेस निवडत असाल तर मात्र तुम्ही काहीतरी चुकत आहात. अशा पार्टीला तुम्ही फ्लोई असे ड्रेस निवडायला हवे. म्हणजे ते अधिक चांगले आणि उठून दिसतात. त्यामुळे पॅटर्नकडे देखील अधिक लक्ष द्या
लाँग शर्ट आहे सध्याचा नवा ट्रेंड, अशी करा स्टायलिंग
किंमती बघा
कोणताही ड्रेस घेताना कोणत्या ब्रँडचा घेत असाल तर तुम्ही त्याची किंमत बघणे देखील गरजेचे असते. त्यामुळे त्याची किंमत बघून मगच घ्या. तुमच्या बजेटमध्ये बसणारे आणि हटके पॅटर्न असलेले ड्रेस निवडले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही ड्रेसची निवड करताना त्याची किंमत बघा.
आता वनपीस निवडताना ते परफेक्ट आहे की नाही ते नक्की बघा