साडी हा महिलांसाठी अप्रतिम आणि अत्यंत सुंदर असा पोशाख आहे. सामान्य महिलांपासून अगदी बॉलीवूडमधील अभिनेत्रींपर्यंत साडीसाठी सगळेच क्रेझी असतात. भारतातील प्रत्येक घरातील वॉर्डरोबमध्ये साड्या दिसून येतील. त्यामुळे साड्यांचे अनेक ट्रेंड्स आणि साड्यांच्या अनेक फॅशन्स आपल्याला दिसून येतात. पण प्रत्येक साडीचे डिझाईन हे प्रत्येकासाठी चांगले दिसते असं नाही. कधी कधी साडी विकत घेतली जाते पण नेसल्यानंतर त्याचा कपडा आवडत नाही अथवा ती साडी आपल्यावर चांगली दिसत नाही असं वाटतं. याचे कारण म्हणजे प्रत्येक महिलेचे बॉडी टाईप अर्थात शरीरयष्टी वेगळी असते आणि त्यामुळेच आपण आपल्या शरीरयष्टीनुसार साडी आणि त्याचे ब्लाऊज डिझाईन्स शिवायला हवेत. कोणत्या शरीरयष्टीसाठी कोणते ब्लाऊज डिझाईन्स योग्य आहेत हे तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवे.
पिअर शेप बॉडी (Pear Shape Body)
पिअर शेप बॉडीमध्ये तुमच्या शरीराचा खालचा भाग थोडा मोठा असतो आणि वरील भाग बारीक दिसतो. तसंच यामध्ये कंबर कर्व्ही असते, त्यामुळे तुम्हाला नेहमी आपल्या शरीराचा वरचा भाग हायलाईट करायला हवा. तरच तुमच्या शरीराचे स्ट्रक्चर व्यवस्थित संतुलित दिसून येते. त्यामुळे तुम्ही अशी साडीची निवड अशी असायला हवी ज्यामुळे तुमची फिगर व्यवस्थित दिसू शकेल. तुमच्या शरीराचा आकार जर पिअर शेफ असेल तर तुम्हाला शिफॉन, जॉर्जेट साडी अधिक सुंदर दिसते. ही साडी तुमच्या शरीराचे कर्व्ह व्यवस्थित हायलाईट करते. त्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता. कंबर मोठी असेल तर साडी कशी नेसावी हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे.
टिप्स –
- तुम्हाला यामध्ये गडद रंग आणि बॉर्डरच्या साड्यांची निवड करायला हवी. याशिवाय तुम्ही हलकी एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटच्या साड्यादेखील नेसू शकता. ही तुमच्या बॉडी टाईपवर अधिक चांगली दिसते
- शिफॉन साडीचा सरळ पदर तुम्ही सोडलात तर तुम्हाला ही साडी अधिक आकर्षक दिसेल
- आजकाल पेस्टल रंगाच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्टल आणि ब्राऊट रंगाच्या साड्यांची निवड करा
अॅप्पल शेप बॉडी (Apple Shape Body)
या शरीरयष्टीच्या महिलांची छाती आणि पोटाचा भाग हा हिप एरियापेक्षा अधिक मोठा असतो. तुमची शरीरयष्टीही अॅप्पल शेपमध्ये असेल तर तुम्हाला असे फॅब्रिक निवडायला हवे, जे तुमचे पोट लपविण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे तुम्ही सिल्क फॅब्रिकच्या साड्या खरेदी करा. या साड्या तुम्हाला कंबरेचा भाग कव्हर करण्यासाठी उपयोगी ठरतात.
टिप्स –
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्यांची स्टाईल करू शकता. या कपड्याच्या साड्या तुम्हाला एलिगंट लुक देतात
- नेटच्या साड्या तुमचे पोट अधिक हायलाईट करतात, त्यामुळे तुम्ही नेटच्या साड्या नेसणे सहसा टाळा
ओव्हरग्लास बॉडी (Overglass Body)
या शरीरयष्टीच्या महिलांचे कर्व्ह्स अत्यंत आकर्षक असतात. त्यामुळे शरीराचा सर्वात हायलायटिंग भाग हा कर्व्हचा असतो. या शरीरयष्टीच्या महिलांना नेट कपडा अधिक चांगला दिसतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रेप फॅब्रिकच्या साड्याही स्टाईल करू शकता. तुमच्या शरीरावर हा कपडा अधिक उठावदार दिसतो.
टिप्स –
- अशा पद्धतीच्या शरीरयष्टीवर मोठ्या बॉर्डरच्या साड्या तुम्ही स्टाईल करू शकता. तसंच प्रिंट साड्या अधिक चांगल्या दिसतात. यामुळे तुमचे शरीर अधिक आकर्षक आणि उठावदार दिसते.
स्किनी बॉडी टाईप (Skinny Body Type)
तुमची शरीरयष्टी एकदम बारीक असेल अर्थात स्किनी असेल तर तुम्ही साड्या निवडताना तुमचा नक्कीच गोंधळ उडत असेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक प्रकारच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही अधिक बारीक दिसता. त्यामुळे तुम्हा कॉटन, सिल्क, ऑर्गेंझा साडीचा वापर करून स्टाईल करायला हवी. या साड्या फुलतात आणि त्यामुळे तुम्ही या साड्यांमध्ये अधिक चांगल्या दिसू शकता. तुम्ही उंच आणि बारीक असाल तर तुम्हाला काठापदराची अर्थात हेव्ही बॉर्डर साड्या अधिक चांगल्या दिसतात. तर बोल्ड प्रिंटवाल्या साड्या या अधिक आकर्षक दिसतात.
टिप्स –
- तुमचे शरीर स्किनी असेल तर तुम्हाला फिकट रंगाचे आणि जाड एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साड्यांची निवड करायला हवी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीड वर्क आणि ब्रोकेड वर्कच्या साड्या निवडा
- तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही बारीक असाल तर तुम्ही बोल्ड प्रिंटस घालणे टाळा अथवा तुम्ही बारीक बॉर्डर असणाऱ्या साड्या नेसा. ज्यामुळे तुम्ही अधिक उंच दिसाल
प्लस साईज बॉडी टाईप (Plus size body type)
तुम्ही जर ओव्हरवेट (Overweight) असाल अर्थात तुमची शरीरयष्टी जाड असेल तर तुम्ही शिफॉन साडी, सॅटीन, लिनन साडी अथवा सिल्क फॅब्रिकच्या साड्या निवडाव्या. या फॅब्रिकच्या साड्या या तुमच्या बॉडी टाईपसाठी उत्तम ठरतात. तर कॉटन आणि ऑर्गेंझा साड्या सहसा नेसणे तुम्ही टाळा. कारण या साड्या अधिक फुगतात आणि त्यामध्ये तुम्ही अधिक जाड दिसू शकता.
टिप्स –
- प्लस साईज बॉडी टाईप असल्यास, तुम्ही अधिकतर पूर्ण हाताचे ब्लाऊज घालावते. तसंच सिल्क आणि हँडलूम साड्या तुम्हाला अधिक चांगल्या आणि उठावदार दिसतील
- गडद रंगाची साडी ही तुम्हाला बारीक दाखविण्यासाठी मदत करते. काळा, गडद रंग वापरावा
तुम्ही तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे साड्यांची निवड करा. या टिप्स वापरल्यास, तुम्हीही अधिक आकर्षक दिसू शकता.