निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी शांत झोप गरजेची आहे. जेव्हा तुम्हाला शांत आणि पुरेशी झोप मिळते तेव्हा तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ राहते. शांत झोपेसाठी गरजेची आहे योग्य गादी (Mattress) आजकाल अनेकांना झोप न येणे, उशीरा झोप येणे अथवा अनिद्रेचा त्रास जाणवताना दिसतो. वर्क फ्रॉम होम अथवा बैठ्या जीवनशैलीमुळे यात अधिकच वाढ होते. पण जर तुम्हाला योग्य गादी मिळाली तर तुम्ही लगेच आणि गाढ झोपी जाता. यासाठी जाणून घ्या गादी (Mattress) निवडताना काय काळजी घ्यावी. यासोबतच जाणून घ्या झोप येण्यासाठी काय करावे, जाणून घ्या घरगुती उपाय | Zop Yenyasathi Upay
योग्य मॉडेल निवडा
बाजारात आजकाल विविध प्रकारच्या मॅट्रैस उपलब्ध असतात. एकाच प्रकारच्या ब्रॅंडमध्ये विविध प्रकारचे मॉडेल तुम्हाला पाहायला मिळतात. यासाठी जेव्हा तुम्ही मॅट्रैस खरेदी कराल तेव्हा ब्रॅंड आणि बजेट प्रमाणेच तुमच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडा. तुम्ही कसे झोपता यावरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य मॅट्रै, निवडता येऊ शकते. कारण गादी अशी असावी ज्यामुळे तुमच्या पाठीचा कण, नितंब आणि खांद्यांना चांगला आराम मिळेल. आजकाल बाजारात यासाठी खास इको फ्रेंडली मॅट्रैस मिळतात. या गाद्यांमुळे तुमच्या शरीराला चांगला आराम मिळू शकतो.
मॅट्रैसची जाडी
गादी खरेदी करण्यापूर्वी ती किती जाड आहे हे पाहाणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्ही जाड असलेली मॅट्रेस निवडायला हवी. शिवाय तुमच्या गादीमध्ये कोणते घटक वापरले आहेत, तिचा बेस कसा आहे. हे देखील खरेदी करण्यापूर्वीच पाहावे. बऱ्याचदा गादीचा बेस जास्त मऊ केला जातो. ज्यामुळे असं असेल तर तुमचं अंग दुखण्याची शक्यता जास्त आहे. साधारणपणे चांगली झोप येण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी जास्त मऊ नसलेली आणि अति कठीण नसलेली मध्यम स्वरूपातील आरामदायक गादी निवडावी.
ऑर्गेनिक मॅट्रैस
आजकाल बाजारात इको फ्रेंडली, ऑर्गेनिक अथवा अॅंटि बॅक्टेरिअल गाद्या जास्त लोकप्रिय आहेत. कारण या गाद्यांमध्ये हवेतील धुळ, जीवजंतूं नष्ट करणारे कडूलिंब अथवा इतर घटक वापरण्यात येतात. ज्यामुळे जर तुम्हाला धुळीची अॅलर्जी असेल तर अशा मॅट्रैसवर झोपण्यामुळे इनफेक्शन होत नाही. अति संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठीही या मॅट्रैस उत्तम असतात.
बजेट पाहून खरेदी करा
बाजारात अनेक प्रकारच्या मॅट्रैस तुम्हाला विकत मिळतात. बऱ्याचदा तुमच्या गरजेनुसार गाद्या कस्टमाईज करून दिल्या जातात. या गाद्या अति आरामदायक असतात. शिवाय त्यांच्यावर चांगली झोपही लागते. मात्र अशा प्रकारच्या गाद्या प्रचंड महाग असतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुमच्या दुकानदाराकडून बजेट जरूर घ्या. कारण तुमच्या बेडच्या आकारानुसार गाद्या बनवल्या जातात. त्यानंतर तुम्हाला निर्णय बदलता येत नाही. यासाठी आधीच मॅट्रैसच्या मॉडेल आणि आकारावरून बजेट ठरवा.