ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
brass idols clean tricks

पितळेच्या देवाच्या मूर्ती कशा कराल स्वच्छ, सोप्या टिप्स

बऱ्याच जणांच्या देव्हाऱ्यात अनेक पितळेच्या मूर्ती असतात. पितळेच्या मूर्ती दिसायला अत्यंत सुंदर दिसतात. पण या मूर्ती आपल्याला काही ठराविक वेळाने स्वच्छ कराव्या लागतात. या पितळी मूर्ती स्वच्छ करण्यासाठी आपण वॉशिंग पावडर अथवा डिशवॉश लिक्विडचा वापर करतो. पण त्यामुळे या मूर्ती अधिक खराब होतात. या पितळेच्या मूर्तींची चमक लवकर कमी होते आणि नव्या मूर्तीही अगदी जुन्या वाटू लागतात. पण तुम्हालाही घरातील पितळेच्या देवाच्या मूर्ती स्वच्छ करायच्या असतील तकर आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. तुम्ही या ट्रिक्स वापरून या मूर्तींची चमक परत आणू शकता आणि या मूर्ती तुम्हाला अगदी दुकानातील नव्या मूर्तीप्रमाणेच दिसतील. 

चिंचेचा करा वापर  (Use tamarind)

use of tamarind

तुमच्या देवघरातील मूर्ती जर पितळेच्या असतील आणि तुम्हाला त्या काही मिनिट्समध्ये चमकावून हव्या असतील तर तुम्ही चिंचेचा वापर करणे उत्तम आहे. त्यासाठी तुम्ही साधारणतः 20 ग्रॅम चिंच हे पाण्यात 15 मिनिट्स भिजवून ठेवा. जेव्हा ही चिंच मऊ होईल आणि चिंचेचा कोळ तयार होईल तेव्हा त्याने मूर्तीवर रगडून त्या स्वच्छ करून घ्या. चिंचेचा कोळ पितळी मूर्तींवर सर्व भागावर अगदी व्यवस्थित स्क्रब करा आणि नंतर 10 मिनिट्स तसाच राहू द्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा आणि टॉवेलने अथवा स्वच्छ कपड्याने साफ करा. तुमच्या पितळेच्या मूर्ती अगदी स्वच्छ आणि पुन्हा चमकताना दिसतील. 

लिंबू आणि बेकिंग सोडा (Lime and Baking Soda)

baking soda

बेकिंग सोडा आणि लिंबू याचा नेहमीच वेगवेगळ्या भांड्यांच्या स्वच्छेतेसाठी उपयोग केला जातो. लिंबाचा वापर तर अनेक गोष्टींसाठी करण्यात येतो. पितळेच्या देवाच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस काढा आणि त्यात एक लहान चमचा बेकिंग सोडा मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट एका मऊ कपड्याने पितळेच्या मूर्तीवर घासा. त्यानंतर साधारण अर्धा तास ही पेस्ट मूर्तीवर तशीच राहू द्या. अर्ध्या तासानंतर गरम पाण्याने या मूर्ती धुवा. नंतर काही वेळ पंख्याखाली सुकवा. या मिश्रणामुळे पितळेच्या मूर्तीला आलेला काळेपणा नाहीसा होऊन पुन्हा चमक दिसून येईल. 

लिंबू आणि मिठाचा वापर (Lemon and Salt)

पितळेच्या देवाच्या मूर्ती जर काळ्या पडल्या असतील तर तुम्ही अर्धे लिंबू कापून त्यावर मीठ घाला. लिंबाच्या तुकड्याचा हा मीठ लावलेला रस पितळेच्या मूर्तींवर रगडा आणि नंतर 5 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर काही वेळाने गरम पाण्याने मूर्ती व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्या. या ट्रिक्समुळे पितळेची काळी पडलेली मूर्ती लवकरच चमक देते.

ADVERTISEMENT

गव्हाचे पीठ, मीठ आणि व्हाईट व्हिनेगर (Wheat Flour, Salt and White Vinegar)

salt

पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्ती स्वच्छ करण्यसााठी तुम्ही गव्हाचे पीठ, मीठ आणि व्हाईट व्हिनेगरचे मिश्रण करूनही वापर करू शकता. ही पेस्ट तुम्ही या मूर्तींवर लावा आणि 1 तास तसंच ठेवा. एक तासानंतर मूर्ती व्यवस्थित गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. व्हाईट व्हिनेगर हे स्वच्छतेचे मुख्य एजंट म्हणून काम करते. यामुळे पितळी मूर्तींवर लवकर चमक येते. 

टॉमेटो केचअप अथवा टॉमेटोचा करा वापर

टॉमेटो खरेदी करण्यापूर्वी वाचा या सोप्या टिप्स

टॉमेटोमध्ये असणारे अॅसिड हे पितळ आणि अन्य धातू काळे पडल्यास, त्याची चमक परत आणून देण्यास उपयोगी ठरते. त्यामुळे टॉमेटो अथवा टॉमेटो सॉसचादेखील तुम्ही यासाठी वापर करू शकता. टॉमेटोची पेस्ट अथवा टॉमेटो सॉस समान स्वरूपात तुम्ही पितळेच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा. एक तास तुम्ही असंच ठेवा आणि नंतर गरम पाण्याने अथवा डिशवॉशने स्वच्छ धुवा आणि सुकवा. त्याची चमक तुम्हाला नक्कीच आवडेल. 

मग यंदा दहीहंडी शुभेच्छा देण्याआधी आपल्या बाळ गोपाळाची मूर्ती स्वच्छ करायला विसरू नका. त्याची स्वच्छता राखण्यासाठी या ट्रिक्सचा नक्की वापर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT