घरात पवित्र असा कोपरा आहे तो म्हणजे देव्हारा…. याला आपण देवघर किंवा मंदिर असे देखील अनेक जण म्हणतात. देव्हारा स्वच्छ असेल तर तो अधिक चांगला दिसतो आणि त्यामध्ये तितकीच सकारात्मक उर्जा राहते. देवघर सजवणे खूप जणांना आवडते देव्हाऱ्यात रोज दिवा लावल्यामुळे आणि पूजा केल्यामुळे तिथे चिकट आणि हळदी-कुंकवाचे डाग राहतात. देव्हारा स्वच्छ करायचा म्हणजे खूप कंटाळा येतो. कारण ते करणे खूप किचकट असते. काहीजणांचे देव्हारे हे फारच सुंदर आणि महागडे असतात. पण ते स्वच्छ करणे खूपच कठीण काम असते. एकदा का त्याकडे दुर्लक्ष झाले की, मग त्यावर चिकट असा राप चढच राहतो. तुमचाही देव्हारा नीट तपासून पाहा आणि तो स्वच्छ करायचा विचार करत असाल तर तो कसा स्वच्छ करायचा ते जाणून घ्या.
असा करा देव्हारा स्वच्छ
प्रत्येकाचे देव्हारे हे वेगेवगळे असतात. काही जणांकडे संगमरवरी, काही जणांकडे लाकडांचा तर काही जण हल्ली लाकडाला पत्रे लावलेले असे फॅन्सी देव्हारे निवडतात. अशावेळी त्यांची स्वच्छता ही वेगवेगळी असू शकते. देव्हाऱ्यात ठेवू नका या गोष्टी ते देखील असू द्या लक्षात
संगमरवरी देव्हारे
हे देव्हारे दिसायला खूपच सुंदर असतात. पांढरे शुभ्र देव्हारा घरात एकदम सकारात्मक उर्जा देतो. पण असे देव्हारे दुर्लक्षित केले तर ते काळे पडू लागतात. तुमच्याकडेही अशा स्वरुपाचा देव्हारा असेल तर त्याची वरचेवर देखभाल राखणे फार गरजेचे असते. दिवा ठेवतो त्याच्या खाली रोजच्या रोज पुसले तर त्यावर चिकट राप धरत नाही. सगळ्या देव्हाऱ्याच्या तुलनेत हा देव्हारा पटकन स्वच्छ करता येऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे असा देव्हारा असेल तर आठवड्यातून किमान दोनवेळा तरी तुम्ही त्यातील सगळे साहित्य काढून ओल्या फडक्याने छान पुसून घ्यायला हवे. त्यामुळे असे देव्हारे छान चमकतात आणि जास्त टिकतात.
लाकडाचे देव्हारे
ट्रेडिशन फॉलो करणाऱ्या प्रत्येकाकडे लाकडी देव्हारा असणे अगदी साहजिक आहे. हे देव्हारे सुंदर दिसतात. देवदेवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यानंतर ते फारच उठून दिसतात. पण अशा देव्हाऱ्यांमध्ये तेल जरासे सांडले तरी त्याचे डाग राहतात. अशावेळी तुम्ही हा देव्हारा जपणे आणि त्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही दररोज तेलाचा किंवा तुपाचा मोठा दिवा लावत असाल तर तो गळत नाही ना याची काळजी घ्या. कारण असा दिवा अनेकदा लाकडावर एक राप तयार करतो. ज्यामुळे हे देव्हारे लवकर चिकट आणि काळे पडतात. त्यामुळे शक्य असेल तर देव्हाऱ्यात एक कपडा घालून तुम्ही त्यावर दिवा ठेवावा. म्हणजे चिकट डाग लागण्याची शक्यता कमी होते. कपडा ठेवत असाल तर दिवा मोठा लावू नका. कारण कपडा पेट घेण्याची शक्यता असते. लाकडाचे देव्हारे साफ करण्यासाठी खास लिक्विड वापरा आणि मग त्याचे क्लिनिंग करा. देव्हारा पटकन स्वच्छ होईल
पत्रा असलेले देव्हारे
हल्ली अनेक फॅन्सी देव्हारे आले आहेत. खूप जण देव्हाऱ्याची निवड हल्ली देव्हाऱ्याला सोन्या-चांदीचे पत्रे लावण्यात येतात. ते आर्टिफिशिअल असतात. असे देव्हारे पटकन खराब होतात. तुमच्याकडे असा देव्हारा असेल तर तुम्ही त्याची नियमित स्वच्छता असायला हवी. असे देव्हारे पटकन खराब होतात. असे देव्हारे स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचा उपयोग करा. देव्हारा रिकामा करुन तुम्ही तो चांगला पुसून घ्या. म्हणजे तो नियमित स्वच्छ राहील.
आता तुमच्याकडे असलेल्या देव्हाऱ्याची नियमित स्वच्छता राखा.