ADVERTISEMENT
home / सौंदर्य
वापरण्यापूर्वी असे स्वच्छ करा तुमचे हेअर स्ट्रेटनर

वापरण्यापूर्वी असे स्वच्छ करा तुमचे हेअर स्ट्रेटनर

केसांची स्टाईल करण्यासाठी आता तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नसते. कारण प्रत्येकीकडे स्वतःचे हेअर स्ट्रेटनर असते. केसांची निगा राखण्यासाठी हेअर स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी तुम्ही हेअर सिरम, हेअर स्प्रेचा वापरही करता. पण या सर्वात तुम्ही एक गोष्ट हमखास विसरता ती म्हणजे तुमचे हेअर स्ट्रेटनर स्वच्छ करणे. समजा तुम्ही केस स्वच्छ धुतलेले आहेत. केसांच्या प्रोटेक्शनसाठी केसांवर सिरमही लावलं आहे. पण तुमचं हेअर स्ट्रेटनर घाणेरडं आणि अस्वच्छ असेल तर तुमच्या केसांवर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. कारण अस्वच्छता तुमच्या स्ट्रेटनरच्या हिटिंग प्लेटवर कायम असते. पुढे त्या प्ल्ेटचा स्पर्श तुमच्या केसांना होतो आणि ती तुमच्या केसांच्या समस्या वाढवू शकते. यासाठीच वेळीच हेअर स्टेटनर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. हेअर स्ट्रेटनरच नाही तर तुम्ही वापरत असलेले सर्व स्टाईलिंग टूल्स कसे आणि कितीवेळा स्वच्छ करावेत याबाबत जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती.

हेअर स्ट्रेटनर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या –

हेअर स्ट्रेटनर तुम्ही जितक्या वेळ वापराल तितक्या वेळी तुम्ही ते स्वच्छ करायला हवे. केसांवर आर्यन प्लेट वापरण्यापूर्वी त्यावरील धुळ, माती, तेलकटपणा, प्रदूषण स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही हेअर स्ट्रेटनरवर पैसे खर्च करणार असाल तर ते स्वच्छ करण्याची  जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी.

हेअर स्ट्रेटरन स्वच्छ करण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

हेअर स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी असं स्वच्छ करा तुमचे प्रत्येक टूल्स

  • सर्वात आधी स्ट्रेटनर गरम करा – हेअर स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी ते मध्यम हिटवर गरम करा. ज्यामुळे त्यावर असलेली धुळ, माती, चिकटपणा हिटिंग प्लेटपासून वेगळा होईल.
  • स्ट्रेटनर प्लगपासून वेगळे करा – सुरक्षित राहण्यासाठी  हेअर स्ट्रेटनर प्लग पासून वेगळे करा आणि हिटिंग प्लेट थंड होऊ द्या.
  • हिटिंग प्लेट पुसून काढा – थंड पाण्यामध्ये कॉटन पॅड बुडवून तुम्ही हिटिंग प्लेट या कापसाने पुसून काढू शकता. फक्त असं करताना प्लेट जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्या. 
  • प्लेटवर अल्कोहोल लावा- प्लेट खोलवर स्वच्छ करण्यासाठी कॉटन पॅडनर थोडे अल्कोहोल घ्या आणि त्याने प्लेट पुसून काढा. मात्र असं करताना प्लेट जोरात घासू नका नाहीतर त्यावर ओरखडे येतील. 

 

ADVERTISEMENT

 

हेअर स्ट्रेटनर किती वेळा स्वच्छ करावे

हेअर स्ट्रेटनर तुम्ही किती वेळा वापरता यावर तुम्ही ते कितीवेळा स्वच्छ करावे हे ठरू शकते. जर तुम्ही कधीतरी हेअर स्ट्रेटनरचा वापर करत असाल तर तुम्ही महिन्यातून एकदा हेअर स्ट्रेटनर स्वच्छ करू शकता. मात्र तुम्ही जर नियमित तुमचे हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर दररोज तुम्ही ते स्वच्छ करायला हवे. विशेषतः केसांवर हेअर स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी ते स्वच्छ असेल याची काळजी घ्यायला हवी. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्रामम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

काय आहे 5:2 स्किन डाएट, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

त्वचेवर जादू करते आर्गन ऑईल, जाणून घ्या फायदा

आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

ADVERTISEMENT
07 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT