पावसाळ्याचं वातावरण म्हणजे सतत दमटपणा आणि ओलावा. अशा वातावरणात साधे कपडे लवकर सुकत नाहीत तर जीन्ससारखे जाड कापड कसे लवकर सुकणार. धुतलेली जीन्स दोन ते तीन दिवसात कोरडी झाली नाही तर तिला खूप घाणेरडा दुर्गंध येण्यास सुरुवात होते. अशी ही कोणत्याच ऋतूत खरंतर जीन्स सतत धुतली जात नाही. कारण जीन्स न धुता घालणं हा एक ट्रेंडच आहे. म्हणूनच जीन्स जरी धुतली नाही तरी ती स्वच्छ आणि निर्जंतूक कशी करावी हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. जीन्स खूप दिवस वापरल्यानंतर, ती नीट सुकली नाही म्हणून जीन्समधून येणारा हा घाणेरडा वास तुम्ही काही क्षणात कमी करू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
जीन्स वापरल्यावर हवेवर सुकत ठेवा
जीन्स वापरल्यावर अनेकांना तिची घडी घालून वॉर्डरोबमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र तुम्ही जेव्हा जीन्स वापरता तेव्हा तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. हा घाम तुमच्या जीन्समध्ये मुरतो आणि जीन्सला घाणेरडा वास येतो. यासाठीच जर तुम्हाला जीन्स धुण्याची गरज वाटत नसेल तर तुम्ही हवेवर अथवा उन्हात वाळत घालून तुमची जीन्स सुकवू शकता. ताजी हवा आणि सूर्यकिरणांमुळे तुमची जीन्स बॅक्टेरिआ फ्री होते.आऊटडेटेट जीन्सचे हे प्रकार आताच काढून टाका वॉर्डरोबमधून
जीन्सला इस्त्री करा
जीन्स न धुता घालायची असेल तर हा उपाय पावसाळ्यात नक्कीच प्रभावी ठरेल. कारण जीन्सचे कापड लवकर खराब होत नाही त्यामुळे ती सतत धुण्याची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही जर जीन्सला फक्त स्टीम केलं अथवा इस्त्री केली तर जीन्सवरील जीवजंतू कमी होतात आणि ती पुन्हा घालण्यासाठी योग्य होते. यासाठी जीन्स आतून आणि बाहेरून व्यवस्थित इस्त्री करा आणि मगच परिधान करा.

लिंबू पाण्याचा स्प्रे मारा
जीन्स न धुता स्वच्छ करण्याचा हा आणखी एक सोपा उपाय आहे. हॉस्टेलमध्ये राहताना अथवा बॅचरल लाईफसाठी हा तुमच्या नक्कीच सोईचा आहे. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि थोडं लिंबाचा रस मिक्स करा. जीन्स वापरल्यानंतर कंबर आणि जीन्सच्या आतील बाजूने हे पाणी जीन्सवर स्प्रे करा आणि हवेवर वाळत ठेवा. ज्यामुळे जीन्समधील जीवजंतू नष्ट होतील आणि जीन्सला घाणेरडा वास येणार नाही. जुनी जीन्स फेकताय? असा करा पुनर्वापर
बेकिंग सोडा वापरा
बेकिंग सोडा तुम्ही घराच्या साफसफाईसाठी वापरत असालच. आता तुम्ही तुमच्या जीन्सच्या स्वच्छतेसाठीदेखील बेकिंग सोडा वापरू शकता. जीन्समधून येणारा घाणेरडा वास यामुळे कमी होतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही जीन्सच्या कंबरेकडील आणि इतर भागाकडे लावू शकता. पेस्ट सुकल्यावर ब्रशने ती झाडून टाका. यामुळे तुमची जीन न धुता स्वच्छ आणि उजळ होईल. जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!
जीन्स वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात
जीन्स वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर घाम आणि जीवजंतूंमुळे जीन्समधून त्वचेचं इनफेक्शन होण्याचा धोका वाढेल.
- जीन्स वापरल्यावर ती सुकवूनच वॉर्डरोबमध्ये ठेवा
- जीन्समधून घामाचा वास येत असेल तर ती आधी उन्हात वाळत घाला सुकल्यावर मगच कपाटात ठेवा.
- जीन्स वाळल्यावर मगच घाला कारण जर ती ओलसर असेल तर घाम आणि ओलसरपणामुळे त्वचेचं इनफेक्शन होऊ शकतं.
- जीन्स सतत धुवू नका त्यापेक्षा ती कशी सुकेल याकडे लक्ष द्या.
- जीन्स वॉर्डरोबमध्ये ठेवण्यापूर्वी त्यामध्ये कडूलिंबाची पाने कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे जीन्सला घामाचा वास येणार नाही.