ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to Clean YourTea Strainer in marathi

चहाची गाळणी पडली असेल काळी तर अशी करा स्वच्छ

सकाळी उठल्यावर आणि दिवसभर फ्रेश होण्यासाठी सर्वांना चहाची गरज असते. प्रत्येक घरात एकतरी चहा प्रेमी असतोच. चहा करण्यासाठी चहापावडर, दूध, साखर आणि पाण्यासोबतच गरजेची असते चहा गाळण्याची गाळणी… मात्र वारंवार वापर झाल्यावर चहापावडर अडकल्यामुळे चहाची गाळणी खराब होते आणि काळसर दिसू लागते. जर तुम्ही प्लास्टिकची चहाची गाळणी वापरत असाल तर खराब झाल्यावर चहाची गाळणी बदलण्याशिवाय तुमच्याजवळ पर्याय नसतो. मात्र जर तुम्ही स्टीलची अथवा मेटलची चहाची गाळणी वापरत असाल तर ती तुम्ही पुन्हा स्वच्छ आणि लखलखीत करू शकता.

चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

चहाची गाळणी नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. मात्र जर गाळणी जास्तच खराब आणि काळसर झाली असेल तर या टिप्स तुमच्या फायद्याच्या आहेत.

स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित

ADVERTISEMENT

बेकिंग पावडर वापरा

How to Clean YourTea Strainer in marathi

तुमच्या घरी स्टीलची गाळणी असो वा प्लास्टिकची तुम्ही गाळणी बेकिंग पावडरने स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत मोठा चमचा बेकिंग पावडर आणि थोडं व्हिनेगर एकत्र करा. या मिश्रणात पाणी टाकून त्यात थोडावर गाळणी बुडवून ठेवा. त्यानंतर भांडी घासण्याचा ब्रश अथवा जुन्या टुथब्रशने गाळणी स्वच्छ करा.

गाळणी गॅसवर धरा

गॅसवर धरल्यामुळे तुमची स्टीलची अथवा पितळी गाळणी नक्कीच स्वच्छ होऊ शकते. मात्र प्लास्टिकच्या गाळणीसाठी हा प्रयोग करू नका. स्टीलच्या गाळणीमध्ये चहापावडर अडकून ती ब्लॉक होते. ज्यामुळे त्यातून चहा गाळणं शक्य होत नाही. मात्र गॅसवर धरल्यास गाळणीमध्ये अडकलेले चहा पावडरचे कण जळून जातात आणि गाळणीची छिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे तुम्ही पुन्हा तुमची गाळणी वापरू शकता. मात्र तापवल्यावर गाळणीला लगेच हात लावू नका. थंड झाल्यावर मग ती पाण्याने स्वच्छ करा.

अल्कोहोल वापरा

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अल्कोहोल वापरू शकता. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यात दोन ते तीन चमचे अल्कोहोल मिसळा आणि आठ तास गाळणी त्यात बुडवून ठेवा. त्यानंतर साबणाने गाळणी स्वच्छ करा आणि पुन्हा वापरण्यास सुरूवात करा.

जाणून घ्या काळा चहा पिण्याचे फायदे आणि दुष्परिणाम (Black Tea Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

लिक्वीड साबण वापरा

लिक्विड साबणाच्या पाण्यात गाळणी रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी भांडी घासण्याचा ब्रश अथवा जुना टुथब्रश वापरून स्वच्छ करा. दोन ते तीन महिन्यातून अशा प्रकारे गाळणी भिजत ठेवल्यास ती नीट स्वच्छ होईल आणि निर्जंतूक राहिल. भिजत ठेवल्यामुळे गाळणीत अडकलेले कण भिजून मोठे होतात आणि सहज गाळणीच्या छिद्रातून बाहेर निघतात. 

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT