उन्हाळा सुरु झाला की घाम आणि उन्हाच्या काहिलीमुळे खूप थकवा येतो. दिवसभर कामाचा कंटाळा येणं, दुपारी सतत झोप येणं या काळात जाणवत राहतं. तुमचा नेहमीचा उत्साह उन्हाळ्यात अचानक गायब होतो. कारण शरीरात थकवा प्रचंड जाणवत असतो. अशा वेळी घरच्या कामापेक्षा ऑफिसचे काम करणं कठीण होतं. यासाठीच ऑफिसचे काम उत्साहाने करण्यासाठी या काही सोप्या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत.
उन्हाळ्यात का येते झोप
उन्हाळ्यात वातावरणात उष्णता वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमानही वाढू लागते. शरीरातून घामाच्या धारा लागतात. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरात अनेक घडामोडी सुरू असकतात. ज्यामुळे तुमचे शरीर नेहमीपेक्षा जास्त थकते. उन्हात गेल्यावर शरीर लालसर अथवा काळे पडते. कारण या काळात शरीरात अनेक प्रक्रिया सुरू असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ह्रदयाचे ठोके वाढतात याचाच परिणाम म्हणजे शरीर थकते आणि तुम्हाला कंटाळवाणे वाटू लागते. शारीरिक थकव्यामुळे तुम्हाला सतत झोप आल्यासारखं वाटू लागतं. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की शरीर डिहायड्रेट होतं. ज्यामुळे शारीरिक क्रिया हळू करण्यासाठी मेंदू तुमच्या शरीराला झोपण्याचा संकेत देतो.
अवेळी येणाऱ्या झोपेवर मात करण्यासाठी टिप्स
उन्हाळा असला तरी तुम्हाला तुमचे ऑफिसचे काम करावेच लागते. त्यामुळे अशा वेळी झोपणं तुम्हाला शक्य नसतं. म्हणून फॉलो करा या सोप्या टिप्स
जड जेवण करू नका
दुपारी झोपायचं नसेल तर लक्षात ठेवा या काळात कधीच जड जेवण करू नका. कारण शरीर या काळात तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेचा वापर करत असतं. अशात जर तुम्ही जड अन्नपदार्थ अथवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर चे पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागेल. शिवाय या सर्व प्रक्रियेमध्ये तुमच्या शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. यासाठी उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढेल असे जड पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी ताक, कढीभात, वरणभात, खिचडी असा हलका आहार घ्या.
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका –
आजकालची जीवनशैली बैठ्या स्वरूपाची झालेली आहे. मात्र जर तुम्ही उन्हाळ्यात एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिला तर तुमच्या शरीकात अॅसिडिटी वाढते. चरबी जमा झाल्याने तुम्हाला सतत कंटाळा येतो. अन्न पचन करण्यास शरीरावर ताण येतो. यासाठी सतत एखाच ठिकाणी बसून राहणं योग्य नाही. जरी तुमचं काम बैठ्या स्वरूपाचं असेल तर या काळात 20-20-20 चा रूल फॉलो करा. वीस मिनीटांनी, वीस सेंकदासाठी वीस फूट दूर चालुन या. ज्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही.
कॅफेनचे प्रमाण टाळा –
कामाच्या ठिकाणी वारंवार झोप येत असेल तर अनेक लोक सतत कॉफी पितात. कॉफीमधील कॅफेनमुळे तुम्हाला लगेच तरतरीत वाटतं. मात्र यामुळे तुमचे शरीर जास्त प्रमाणात हायड्रेट होतं. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट झालं की तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटतं. यासाठी या काळात कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं.
लोहयुक्त पदार्थ खा
उन्हाळ्यात भूक कमी लागते. मात्र असं असलं तरी शारीरिक क्रिया सुरळीत होण्यासाठी योग्य, संतुलित आहार घ्यायला हवा. कारण शरीराला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा त्यातून मिळत असते. अशा वेळी जर एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने तुम्ही पौष्टिक पदार्थ खाल्ले तर चांगला फायदा होतो. यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि तीन ते चार तासांनी थोडं थोडं खा.
उन्हात फिरू नका
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही दुपारी घराबाहेर गेला तर त्यामुळे तुमचं शरीर लवकर डिहायड्रेट होतं. यासाठी या काळात दुपारी 11 ते संध्याकाळ 4 याकाळात घराबाहेर मुळीच पडू नका. ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाचेल आणि तुम्हाला थकून झोप येणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक