आपल्याला नेहमी हेच वाटतं की, बिझी लाईफ म्हणजे चांगलं आयुष्य. कारण आपल्याकडे करायला भरपूर काही असतं. पण या धावपळीच्या आयुष्यात तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की, हीच खऱ्या सुखी आयुष्याची व्याख्या. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. खरंतर आजच्या मॉर्डन लाईफस्टाईलमध्ये आपल्याला सुख आणि शांती मिळत नाही. जी जुन्या काळातील लोकांजवळ होती. याच धावपळीच्या आयुष्याने आपल्याला तणाव आणि अनेक तऱ्हेचे आजार दिले आहेत. आज आपल्याकडे करण्यासारखं खूप आहे पण याला सुख म्हणता येणार नाही. आपल्याकडे जेवण आहे पण पोषण नाही.
जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलंत तर तुम्हाला बॉडी डिटॉक्स करण्याचे अनेक प्रकार आढळतील. पण मन डिटॉक्स करण्याबाबत कोणी बोलत नाही. आपल्या soul वर लक्ष न दिल्याने आपलं मन नकारात्मक विचारांनी टॉक्सिक होतं. अशावेळी स्वतःला आनंदी आणि सकारात्मक बनवण्यासाठी वेळोवेळी डिटॉक्स करणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया soul किंवा मन डिटॉक्स करण्यासाठी काही सोपे उपाय –
नकारात्मक लोकांपासून दूर राहा
तुम्ही ऐकलंच असेल की, जशी संगत तशी रंगत. म्हणजेच ज्या लोकांसोबत तुम्ही राहता तसेच तुमचे विचार होऊ लागतात. त्यामुळे मनाला डिटॉक्स करण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहायला सुरूवात करा. कारण अशी लोकं फक्त तुमचा आत्मविश्वास कमी करतात. असं नाहीतर त्यांच्यामुळे तुमच्यातही निगेटीव्हिटी येऊ लागते. ज्यामुळे तुमचं मन दिवसेंदिवस अजून toxic होऊ लागतं.
हेल्दी डाएट
तुमचा आहार फक्त तुमच्या शरीरावर नाहीतर मनावरही परिणाम करत असतो. जेव्हा तुम्ही अनहेल्दी डाएट घेता तेव्हा शरीरावर त्याचा परिणाम होतो. तसंच तुमचं मनही तणावपूर्ण होतं. हेच जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तुमचं तन आणि मन दोन्ही संतुष्ट राहतं. यामुळे आजारही तुमच्यापासून दूर राहतात आणि काम करण्यातही उत्साह जाणवतो. त्यामुळे हेल्दी डाएटला तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. म्हणजे तणावही तुमच्यापासून दूर राहील. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर पूर्वीच्या काळी ऋषीमुनी सात्विक आहार खाण्यावर भर देत असतं. तेच आजच्या काळातही लागू होतं.
मेडीटेशन
तुमच्या मनाला डिटॉक्स करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेडीटेशन. दिवसभरात किमान 5 ते 10 मिनिटं मौन पाळा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला एनर्जेटीक वाटेल. या भावनेला शब्दांमध्ये मांडता येणार नाही. फक्त एकदा लक्ष द्या आणि तुम्हाला स्वतःलाच बदल जाणवेल.
फोन करा बंद
आजच्या काळात फोन किंवा इंटरनेटपासून दूर राहणं शक्य नाही. पण जर तुम्हाला खरोखरच मन डिटॉक्स करायचं असेल तर दिवसातून किमान एक तास तुमचा फोन बंद ठेवा. तुम्हाला कदाचित जाणीव नसेल पण खूपश्या शारीरिक आणि मानसिक समस्यांमागील कारणम तुमची फोन स्क्रीन आहे. त्यामुळे फोनपासून लांब राहा आणि तुमच्या हॉबीजना वेळ द्या. जेव्हा तुम्ही फोनऐवजी इतर गोष्टींवर अधिक फोकस कराल तेव्हा तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यात सुधारणा होईल.
निसर्गाशी मैत्री
हाही तुमच्या मनाला डिटॉक्स करण्याचा चांगला उपाय आहे. मानवनिर्मित गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी आपल्याला खरा आनंद आणि शांती निसर्गाच्या सान्निध्यात जास्त मिळते. त्यामुळे जितकं शक्य असेल तेव्हा वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. यामुळे तुमचं मन रिसेट करण्यात आणि मन डिटॉक्स व्हायला मदत होईल.