थंडीच्या दिवसात सूर्य नारायणाचं दर्शन क्वचितच होतं. मुंबईत जरी हिवाळा एवढा जाणवत नसला तरी महाराष्ट्रातील इतर भागात मात्र चांगलीच थंडी पडते. अशा वेळी पंचाईत होते ती कपडे न सुकल्याने. मग गृहिणींना प्रश्न पडतो की, या लवकर न सुकणाऱ्या कपड्यांवर उपाय काय? एवढंच नाहीतर कपडे सुकल्यावरही हाताला गार लागतात किंवा कधी कधी त्यांना कुबट वासही येतो. घरातल्या सगळ्या सदस्यांची मग कपडयांबाबत आरडाओरड सुरू होते. पण आता चिंता नको. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही सोप्या टीप्स. ज्यांचा वापर करून तुम्ही झटपट कपडे सुकवू शकता.
हिवाळ्यात असे झटपट सुकवा कपडे
Shutterstock
- सर्वात आधी वॉशिंग मशीनच्या ड्रायरमधून कपडे काढल्यावर ते दोऱ्यांवर वाळत घाला. तुम्ही म्हणाल हे तर आम्ही नेहमीच करतो कपडे वाळत घालताना. पण सांगायचा मुद्दा हा की, एकावर एक कपडे वाळत घालू नका. नाहीतर ते लवकर सुकणार नाहीत.
- भरपूर कपडे एकाच दिवशी धुवायला टाकणं टाळा. कपड्यांच्या बॅच करून त्याप्रमाणे कपडे धुवा आणि वाळत घाला. ज्यामुळे तुम्हाला कपडे वाळत घालायला पुरेशी जागा उपलब्ध होईल.
- कपडे कधीही मोकळ्या हवेत वाळत घाला. ज्यामुळे त्यांना कुबट वास येणार नाही.
- तसंच संध्याकाळ होताच दिवसभर वाळत घातलेले कपडे घरात आणा. नाहीतर ते पुन्हा थंडगार पडतील आणि ओलसरही लागतील.
- जेव्हा बाहेर ऊन पडलं नसेल किंवा कपडे वाळत घालण्यासाठी मोकळी जागा नसल्यास फॅनखाली कपडे वाळत घाला. हा उपाय रात्री झोपताना करण्यासाठी बेस्ट आहे. रात्री झोपण्याआधी तुमच्या बेडरूममध्ये कपडे वाळत घाला. म्हणजे सकाळी तुम्ही उठेपर्यंत कपडेही सुकतील आणि विजेची बचतही होईल.
- काही छोटे कपडे जसं इनरवेअर, मोजे आणि रुमाल इ. तुम्ही हेअर ड्रायरनेही आरामात सुकवू शकता. पण लक्षात ठेवा कपडे सुकवण्यासाठी एअरकंडीशनरचा मात्र काही उपयोग होत नाही. हा जर रुम हीटर असेल तर तुम्हाला मदत होऊ शकते.
- झटपट जीन्स सुकवायची असल्यासही एक उपाय आहे. तो म्हणजे जीन्सवर इस्त्री करणे. हो..हा उपाय तुम्हाला कदाचित माहीतही असेल. हा उपाय जीन्स झटपट सुकवण्यासाठी अगदी उत्तम आहे.
- जेव्हा ऊन पडेल तेव्हा कपडे लगेच गॅलरीत वाळत घाला. पण ही शक्यता हिवाळ्यात थोडी कमीच असते.
घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स
Canava
लक्षात घ्या, थंडीत घाम कमी येतो त्यामुळे कपडे जास्त खराब होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास कपडे एका वापरात धुवायला न टाकता दोनदा वापरून तुम्ही धुवू शकता. अशा कपड्यांमध्ये जास्तकरून जीन्स, पँट्स आणि लोकरीच्या कपड्यांचा समावेश होईल. मग तुम्हाला कशा वाटल्या या टिप्स आम्हाला नक्की कळवा.
जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत
स्वेटर घातल्यावर तुमच्या अंगालाही सुटते का खाज
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.