एप्रिल महिना आता संपत आला आहे आणि बाजारात फळांचा राजा ‘आंबा’ दिसायला सुरुवात झाली आहे. हापूस हा आंब्यामधील सगळ्यात आवडता असा प्रकार. चवीला गोड आणि ॲसिडीक असा आंबा या दिवसात काही जणांच्या घरी मुख्य पदार्थ असतो. आंबा भात, आमरस पुरी असा मस्त बेत या दिवसात अगदी आवर्जून केला जातो. तुम्हीही आंबा खायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला आंब्यामुळे होणारा त्रासही माहीत असेल. खूप जणांना आंबा खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता वाढण्याचा त्रास होतो. तर काहींचे वजन वाढत. सतत आंबा खाल्ल्यामुळेही काही त्रास नक्कीच होतो. असा त्रास टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते आज आण जाणून घेऊया.
आंब्याची उष्णता अशी करा कमी
ज्यावेळी तुम्ही घरी आंबा आणता त्यावेळी त्या आंब्याचे सेवन लगेच करु नका. काऱण आंबा हा उष्ण असतो. आंबा बाजारातून आणल्यानंतर तुम्ही त्याचे लगेच सेवन केले तर तो तुम्हाला आतून गरम लागेल. आंब्याची प्रवृत्ती ही उष्ण असते. त्यामधील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी आंबे साध्या पाण्यात किमान 20 मिनिटांसाठी ठेवा. त्यामुळे आंबा थंड होतो. त्याची उष्णता कमी होते. आता आंबा आणल्यानंतर तो नुसता धुण्यापेक्षा तो पाण्यात ठेवा आणि मग कापून खा.
उष्णप्रवृत्ती असणाऱ्यांनी खाताना
खूप जणांच्या शरीरात आधीच खूप हिट असते. अशावेळी आंब्याचे सेवन जास्त प्रमाणात केले तर त्यामुळे शरीरात अधिक उष्णता वाढते. खूप जणांना त्यामुळे उबाळी किंवा मोठ्या फोडी येण्याचा त्रास होऊ शकतो. जर हा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही आंब्याचे सेवन करताना थोडे नियंत्रण ठेवायला हवे. एकावेळी एक आंबा पुरेसा असतो. पण उपाशीपोटी आंबा खाऊ नका. त्यामुळे शरीराला लगेच उष्णता मिळते.
जुलाबाचा त्रास होऊ शकतो
आंब्याच्या अतिसेवनामुळे पोटासंदर्भााचे अन्य काही त्रास देखील होऊ शकतात. वर सांगितल्याप्रमाणे आंबा पचनास जड असतो. त्यामुळे त्याच्या अतिसेवानाचे दोन परिणाम जाणवतात. एकतर तुम्हाला पोटदुखी होऊ शकतो किंवा काबी जणांना जुलाब देखील होऊ शकतात. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आंब्याचे सेवन करताना थोडे जपून करणेच कधीही चांगले.
वजन वाढवते
वजन वाढण्याची भीती तुम्हाला सतावत असेल तर आंबा हे फळ तुमच्यासाठी अजिबात नाही. आंब्यामुळे वजन वाढते. आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि साखर असते. त्यामुळे वजन वाढू नये असे वाटत असेल तर आंबे खाताना थोडे जपून खा. नाहीतर वजन वाढीला सामोरे जा.
आता आंबा खाताना या गोष्टीचा विचार तुम्ही नक्की नका.