ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
पीनट बटरचे फायदे आणि सेवन

जाणून घ्या पीनट बटरचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत

हेल्दी आयुष्यासाठी चांगला आहार हा फारच गरजेचा आहे हे आता सगळ्यांना पटले आहे. आपण खात असलेले पदार्थ हेल्दी कसे करता येतील यासाठी खूप असलेल्या अनेक गोष्टींना हेल्दी असे पर्याय आलेले आहेत. आता बटरच घ्या ना… मस्त बटरमध्ये बनवलेली पावभाजी किंवा सँडवीच कोणाला आवडणार नाही. पण सतत बटरच्या सेवनामुळे वाढणाऱ्या कॅलरीज आणि फॅट हे अनेकांना नको असते. कारण आता कोणालाही लठ्ठ व्हायचे नाही. म्हणूनच की काय बटरला पर्याय म्हणून बाजारात हेल्दी असे पीनट बटर ( Peanut Butter) मिळू लागले आहे. पीनट बटरचे फायदे आणि ते कसे खायला हवे ते आज आपण जाणून घेऊया 

पीनट बटर म्हणजे काय?

पीनट बटर

 पीनट बटर हा शेंगदाण्यापासून बनवला जातो. शेंगदाणे चांगले चांगले भाजले जातात. त्यानंतर ते मिक्सरमध्ये चांगले वाटले जाते. त्याला एक स्मुथ टेक्श्चर येण्यासाठी त्यामध्ये कोणतेही आवडीचे तेल घातले जाते. त्यामुळे त्याला एक छान टेक्श्चर मिळते. जे ब्रेडवर स्प्रेड करणे फारच जास्त सोपे जाते. त्यामुळे जे शेंगदाण्यापासून तयार केले जाते. त्याला पीनट बटर असे म्हणतात 

असे करा पीनट बटरचे सेवन

आता पीनट बटर नेमके कधी आणि कसे खायचे हे तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही नव्याने पीनट बटर खायला घेतले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पीनट बटरचे सेवन करु शकता. 

  1. ज्यांना रोजचे बटर खायचे नसेल तर तुम्ही पावाला पीनट बटर खाऊ शकता. त्याची चव थोडी वेगळी लागते. पण सवयीने तुम्हाला त्याची चव आवडते. जीमला जाणारे पीनट बटरचे सेवन असे नुसतेही करतात. 
  2. पीनट बटरचा उपयोग करुन तुम्ही स्मुदी देखील बनवू शकता. पीनट बटर आणि त्यामध्ये केळ आणि प्रोटीन पावडर घालून तुम्हाला त्याचे सेवन करता येते. याशिवाय तुम्हाला त्यामध्ये सफरचंद, पेर, चिकू अशी फळ घालता येतील.  हे पोटभरीचे असे असते. 
  3. अगदी नव्याने पीनट बटर खायला घेतले असेल तर ते लगेच आवडेल असे सांगता येत नाही.अशावेळी तुम्ही त्यामध्ये गोड न्युटेला लावून ब्रेड खा आणि हळुहळू पीनट बटरचे प्रमाण वाढवा. 
  4. तुम्हाला जर ते नुसतं खायचं असेल तरी देखील तुम्ही पीनट बटर खाऊ शकता. 
  5. जर तुम्हाला थोडे हटके खायचे असेल तर तुम्ही एखादा रॅप देखील बनवू शकता. पातळ पोळी त्यावर पीनट बटर आणि केळ्याचे काप असे टाकून जरी खाल्ले तरी देखील त्याची चव खूपच चांगली लागते. 

हेही असू द्या लक्षात

पीनट बटर ( Peanut Butter) हे कितीही हेल्दी असले तरी देखील काही जणांना ते चालत नाही. खूप जणांना शेंगदाण्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते. काहींना शेंगदाणे बाधतात. अशा प्रकारचा त्रास तुम्हाला शेंगदाण्यामुळे होत असेल तर तुम्ही कितीही चांगले असले तरी देखील याचे सेवन न करणेच चांगले. 

ADVERTISEMENT

आता आहारात पीनट बटरचा समावेश करणार असाल तर एकदा हे नक्की वाचा.

06 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT