जेव्हा पायांवर लहान काळे ठिपके तयार होतात आणि हे डाग स्ट्रॉबेरीच्या बियांसारखे दिसतात म्हणून त्या स्थितीला स्ट्रॉबेरी लेग्स असे म्हणतात. सामान्यतः मॉइश्चरायझिंग शेव्हिंग क्रीम वापरून व इतर काळजी घेण्याच्या पद्धती वापरून आपण स्ट्रॉबेरी लेग्स टाळू शकतो. जेव्हा पायांवरच्या ओपन पोअर्स गडद दिसतात किंवा पायांचे शेव्हिंग केल्यावर पायांवर काळे किंवा तपकिरी डाग दिसतात किंवा पायांवर ठिपके दिसतात तेव्हा त्याला स्ट्रॉबेरी लेग्स असे म्हणतात. अशा वेळी शॉर्ट ड्रेसेस घालणे ऑकवर्ड वाटू शकते. स्ट्रॉबेरी लेग्समुळे बहुतांश वेळेला काही त्रास आणि वेदना होत नाहीत पण जर चुकून वेदना होत असतील किंवा खाज सुटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण अशावेळी इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता असते. जेव्हा पायांच्या त्वचेचे पोअर्स मोठे होतात किंवा त्यामध्ये त्वचेच्या मृतपेशी, तेल आणि बॅक्टेरिया अडकतात तेव्हा ही स्थिती उद्भवते. किंवा फॉलिक्युलायटिस, कोरडी त्वचा आणि केराटोसिस पिलारिस हा त्रास असल्यास त्या व्यक्तींना स्ट्रॉबेरी लेग्सचा त्रास होतो. काहींना इनग्रोन हेअरची समस्या असेल तर त्यांनाही स्ट्रॉबेरी लेग्स होऊ शकतात. पण आपण घरच्या घरीही Ingrown Hair वर उपाय करू शकतो.
स्ट्रॉबेरी लेग्स टाळण्यासाठी करा त्वचा एक्सफोलिएट
बहुतेकवेळा, स्ट्रॉबेरी लेग्स टाळण्यासाठी आपण घरीच काही सोपे उपाय करू शकतो.पण घरगुती उपायांचा फायदा न झाल्यास पायाचे केस कायमचे काढून टाकणे किंवा वैद्यकीय उपचार घेणे हे पर्याय देखील आहेत. स्ट्रॉबेरी लेग्स होऊ नयेत म्हणून पाय नियमितपणे एक्सफोलिएट केले पाहिजेत. जेव्हा आपण पायांची त्वचा एक्सफोलिएट करतो तेव्हा त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि केसांची वाढ होणे सोपे जाते व इनग्रोथ होत नाही.
तसेच त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग क्रीम वापरणे हा दुसरा घरगुती पर्याय आहे. तसेच सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड वापरणे हा पर्याय देखील तुम्ही वापरून बघू शकता. ही ऍसिडस् स्ट्रॉबेरी लेग्स दिसण्यास कारणीभूत असलेल्या मुरुमांवर उपचार करण्यास मदत करू शकतात.
एक्सफोलिएट कसे करावे
आपले पाय एक्सफोलिएट करताना, ते सुरक्षितपणे करा. खूप वेळा किंवा खूप जास्त एक्सफोलिएट केल्याने तुमच्या त्वचेला लालसरपणा येऊ शकतो किंवा इजा होऊ शकते. एक्सफोलिएट करण्यापूर्वी तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घ्या. तुमची त्वचा जर सेन्सिटिव्ह असेल तर एक्सफोलिएशननंतर त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते. घरच्या घरी तुम्ही दोन पद्धतींनी एक्सफोलिएशन करू शकता. एक म्हणजे ब्रश किंवा स्पंजसारखे साधन वापरून कोरडी त्वचा एक्सफोलिएट करणे आणि दुसरी पद्धत म्हणजे केमिकल एक्सफोलिएशन होय. यामध्ये मृत त्वचा विरघळण्यासाठी सौम्य ऍसिडसारख्या रसायनांचा वापर केला जातो.
आपले पाय एक्सफोलिएट करण्यासाठी योग्य पद्धत वापरा
तुमच्या पायांसाठी उत्तम काम करणारी एक्सफोलिएशन पद्धत निवडा. जर तुमची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल, तर तुम्ही केमिकल एक्सफोलिएंट आणि वॉशक्लोथ वापरू शकता. जर तुमची त्वचा अधिक लवचिक असेल तर तुम्ही मेकॅनिकल एक्सफोलिएंट वापरू शकता.किडा चावल्यानंतर किंवा भाजल्यानंतर तुमच्या त्वचेवर काळे डाग सहज उमटत असल्यास मात्र हे दोन्ही प्रकार वापरू नका कारण तुमच्या त्वचेवर एक्सफोलिएशनमुळे काळे डाग पडण्याची अधिक शक्यता असते.
पाय हळूवारपणे एक्सफोलिएट करा
आपले पाय एक्सफोलिएट करताना, आपल्या त्वचेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही एक्सफॉलिएशनसाठी ब्रश किंवा स्पंज वापरत असल्यास त्वचेवर लहान आणि हलके स्ट्रोक द्या. ज्या ठिकाणी तुम्हाला उघडे कट किंवा जखमा आहेत किंवा तुम्हाला सनबर्न झाले असेल अशा ठिकाणी एक्सफोलिएट करू नका. यामुळे तुमच्या त्वचेला आणखी त्रास होऊ शकतो.
एकदा पाय एक्सफोलिएट केल्यानंतर, त्यांना मॉइश्चरायझ करा. अशा प्रकारे तुम्ही पाय एक्सफोलिएट करून स्ट्रॉबेरी लेग्स टाळू शकता.
फोटो क्रेडिट – depositphotos
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक