थंडीत गरमगरम चहाचा आस्वाद घ्यायला कोणाला नाही आवडणार… अनेकांची सकाळ तर चहाशिवाय सुरूच होत नाही. एक कप चहा घेतल्याने कामाचा कंटाळा, मनावर आलेला ताण काहिही कमी होऊ शकते. जगभरात यासाठी चहाचे निरनिराळे प्रकार घेतले जातात. प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेला चहा आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. मात्र तुम्ही घेत असलेला चहा शुद्ध आहे का हे तपासणंही तितकंच गरजेचं आहे. कारण आजकाल बाजारात भेसळयुक्त चहा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. त्यामुळे चहा पावडर खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्की तपासून पाहा.
चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)
चहाची गुणवत्ता कशी तपासावी
चहाची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता. जसं की चहा पावडर विकत घेताना ती मानांकीत कंपनी अथवा चांगल्या विक्रेत्याकडून विकत घ्या. शिवाय बघून, वास घेऊन अथवा हाताने तपासून तुम्हाला चहा पावडची गुणवत्ता तपासता येते. मात्र या व्यतिरिक्त अशा अनेक चाचण्या आहेत. ज्यातून तुम्हाला चहा पावडरची शुद्धता तपासता येईल.
जाणून घ्या काळा चहा पिण्याचे फायदे आणि दुष्परिणाम (Black Tea Benefits In Marathi)
टीश्यू पेपर
टीश्यू पेपरने तुम्ही चहाची गुणवत्ता तपासू शकता. यासाठी टीश्यू पेपरवर थोडी चहापावडर ठेवा आणि त्यावर थोडं पाणी शिंपडून काही वेळ उन्हात ठेवा. चहा पावडर जर चांगल्या गुणवत्तेची असेल तर तिचे डाग लगेच टीश्यू पेपरवर पडणार नाहीत. जर टीश्यू पेपरवर जास्त तेलकट डाग नसतील तर तुम्ही बिनधास्त तुमची चहा पावडर वापरू शकता.
पाणी
पाण्याचा वापर तुम्ही चहापावडरची शुद्धता तपासण्यासाठी वापरू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे चहापावडर मिसळा. जर एक ते दोन मिनीटांमध्येच तुमच्या पाण्याचा रंग गडद झाला तर समजा की चहा पावडर शुद्ध नाही. रंग थोडा जास्त गडद नाही झाला तर तुमची चहा पावडर वापण्यासाठी सुरक्षित आहे.
हाताने रगडून पाहा
वास घेणे आणि हाताने रगडून पाहणे हा चहा पावडर चेक करण्याचा उत्तम मार्ग आहे. कारण जर का तुम्हाला अशा प्रकारे गुणवत्ता तपासता आली तर तुम्ही कधीच फसवले जाणार नाही. यासाठी हाताने रगडून चहापावडर पाहा. जर तुमच्या हाताला रंग लागला आणि खूप उग्र वास चहापाडवरला येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला भेसळयुक्त चहापावडर मिळत आहे.
आयुर्वेदिक काढा रेसिपी (Kadha Recipe In Marathi)