ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
चिकन आणि मासे खरेदी करताना

पावसात चिकन किंवा मासे खरेदी करताना

 मस्त वातावरण झाले की, गरमा गरम आणि उष्णता देणारे पदार्थ खाण्याची मजा ही फारच वेगळी असते. जे नॉन व्हेज खातात त्यांना या दिवसात मस्त मासे आणि चिकनचे बेत करायला नक्कीच आवडत असतील. चिकन आणि मासे हे चवीला जितके चांगले असतात. तितकेच ते आरोग्यासाठी पुरक असतात. पण पावसाच्या या दिवसात अनेक आजार डोकं वर काढत असतात. अशावेळी पोटात काय जाते? ते चांगले आहे का? हे पाहणे फार महत्वाचे असते. अन्न हे ताजे असणे फार गरजेचे असते. या दिवसात चिकन आणि मासे ( Chicken And Fish )खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. याची खरेदी करताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

मासे आणि चिकन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊया.

  1. पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यामुळे ताजे मासे मिळण्याची शक्यता ही फार कमी असते. या दिवसात फ्रोजन किंवा कोल्ड स्टोरेजमधील मासे बाहेर काढले जातात. ते फार जुने असतात. असे नाही. पण कोळ्यांकडे हे मासे येईपर्यंत ते फार जुने झालेले असतात. असे जुन्या माशांची चव ही फार वेगळी असते. त्यामुळे मासे खरेदी करताना थोडा विचार करा. 
  2. हल्ली फ्रोजन माशांसोबत फ्रोजन चिकन हे देखील मिळते. पण फार कठीण अशा काळात तुम्ही फ्रोजन चिकनचा पर्याय निवडला तर ठीक पण तुम्ही कायम फ्रोजन चिकन निवडण्यापेक्षा जर तुम्ही फ्रेश चिकन निवडले तर ते आरोग्यासाठी अधिक चांगले असते. त्यामुळे शक्यतो फ्रोजन चिकन खाणे टाळा. 
  3. चिकन जर शिळे असेल किंवा कापून ठेवलेले असेल तर ते अजिबात घेऊ नका. कारण पावसाच्या या दिवसात उगाचच अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. 
  4. मासे आणल्यानंतर ते स्वच्छ धुणे हे देखील गरजेचे असते.मासांमधील कोळंबी हा प्रकार चवीला खूप चांगला लागतो. पण असे असले तरी देखील तुम्हाला हा मासा स्वच्छ करणे फार गरजेचे असते. त्यामुळे  तुम्ही अगदी योग्य पद्धतीने माशांची स्वच्छता करा. 
  5. पावसाच्या दिवसात मासे शिजल्यानंतर ते जास्त काळ खाऊ नये. कारण असे मासे खाल्ल्यामुळे आरोग्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसात मासे किंवा चिकन फार जुने खाऊ नका. 
  6. चिकन जर एकदम पांढरे पडले असेल तर ते अजिबात खरेदी करु  नका. कारण असे चिकन जुने झालेले असू शकते. त्याची चव तर लागणारच नाही. शिवाय त्यामुळे पोटाचा त्रासही होऊ शकतो. 
  7. मासे हे शिळे असतील तर ते पोटाला अधिक त्रासदायक असतात. मासे निवडताना जर ते फार दबलेले आणि पिचपिचित झालेले असतील तर ते अजिबात घेऊ नका. कारण असे मासे शिजवताना ते खराब असण्याची जास्त भिती असते. 
  8. चिकन खरेदी करताना जर फ्रोजन घेत असाल तर त्याची तारीख बघा. फ्लेश म्हणजे चिकन हे  लुसलुशीत लागायला हवे तर ते छान लागते. 

आता चिकन आणि मासे घेताना तुम्ही अगदी हमखास या गोष्टींचा विचार करायला हवा.

01 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT