आपला चेहरा कोणाला लक्षात राहावा असे प्रत्येकाला वाटते. चेहरा आकर्षक तेव्हाच दिसतो. ज्यावेळी तुमचे डोळे बोलके असतात. आता डोळे बोलके असावेत म्हणजे नेमकं काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही एखाद्याचे सुंदर डोळे पाहता तेव्हा काय पाहता ते आठवा. डोळ्यांखाली काळी वर्तुळे नसणे, डोळे चमकदार दिसणे, डोळ्यांचे बुभूळ स्वच्छ दिसणे, डोळयांची झापड स्वच्छ आणि त्यावरील पापण्या छान दिसणे हे सगळे गुण असतील तर डोळे छान दिसतात. तुमचे डोळे आरशात जाऊन नीट बघा. तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या कोणकोणत्या समस्या जाणवतात. त्यानुसार तुम्ही तुमच्या डोळ्यांना आम्ही सांगितलेले उपाय करा.
डोळ्यांचा मसाज
डोळ्यांचा मसाज हा डोळ्यांकडील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करत असतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एखादे मॉश्चरायझर किंवा तुमच्या आवडीचे (सूट होणारे ) तेल घेऊन बोटांनी डोळ्यांमध्ये गोलाकार आकारात मसाज करा. त्यामुळे डोळे रिलॅक्स होण्यास मदत मिळते. डोळ्याचा हा मसाज तुम्ही न चुकता झोपताना केला तर तुम्हाला शांत झोपही येण्यासही मदत मिळते.
आयकुल पॅड
डोळ्यांवरच आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. दिवसभर जे लॅपटॉपवर काम करत असतात त्यांना डोळे चुरचुरणे असा त्रास होऊ लागतो. अशांचे डोळे लाल देखील दिसतात.तुमच्या डोळ्यांची लाली घालवायची असेल तर एका कॉटन पॅडवर तुम्ही थोडेसे गुलाबपाणी किंवा नुसते पाणी घेऊन ते तसेच्या तसे ओले पॅड तुम्ही डोळ्यांवर ठेवा. साधारण 10 मिनिटे तुम्ही डोळ्यांवर हे ठेवले तरी देखील तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल. डोळ्यांमध्ये लाली कमी होण्यास मदत मिळेल.
डोळ्यांची स्वच्छता
काहींचे डोळे हे अस्वच्छ दिसतात. म्हणजे डोळ्यांच्या आत घाण साचते. अशांचे डोळे हे कायम बरबटलेले दिसतात. तुमच्या डोळ्यांसदर्भातही अशीच काही तक्रार असेल तर तुम्ही डोळ्यांची स्वच्छता राखा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना होणारा इतर त्रास होणार नाही. म्हणजे डोळे घाण असतील तर अशावेळी इन्फेक्शनची भीती जास्त असते. म्हणूनच डोळ्यांची स्वच्छता राखा.
डोळ्यांचा व्यायाम
डोळ्यांचा मसाज यासोबतच डोळ्यांचा व्यायाम हा देखील तुमच्या डोळ्यांना सुंदर करण्याचे काम करतो. डोळ्यांचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला काहीही वेगळे करावे लागत नाही. डोळ्यांचा व्यायाम हा तुम्हाला झोपताना उठल्यानंतर असे कधीही करता येऊ शकतो. डोळे वर खाली आणि डोळ्यांचा गोलाकार असा मसाज करा. डोळे बंद करुन डोळ्यांवर ठेवा. थोड्या वेळासाठी डोळे बंद करा. त्यामुळेही तुम्हाला बरे वाटेल.
आता या गोष्टी नक्की करा आणि मिळवा चमकदार असे डोळे