लग्न झालेल्या असोत अथवा लग्न न झालेल्या असोत बऱ्याच महिलांना टिकली लावायला नक्कीच आवडते. लग्न झाल्यानंतर बऱ्याच महिला टिकली लावतातच. पण काही जणींना टिकलीमुळे अलर्जीही येते. ही अलर्जी आल्यामुळे कपाळावर केवळ खाजच नाही तर अगदी मध्यभागी लालसरपणा उमटवते आणि कधी कधी यामुळे सफेद अथवा लाल डागही पडतो. हे त्वचेसाठी अत्यंत वाईट ठरते. पण यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून हे दूर करू शकता. मुळात या अलर्जीचे नक्की कारण काय आणि यापासून वाचण्याचे नक्की उपाय काय आहे हे आपण या लेखातून पाहूया. सर्वात आधी टिकलीची अलर्जी येण्याचे नक्की काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया.
अलर्जीचे कारण
Freepik
टिकलीमुळे होणाऱ्या अलर्जीला डर्मेटायटिस असं म्हटलं जातं. टिकली तयार करताना पॅराटर्शियरी ब्युटिल फिनॉल नावाच्या केमिकलचा वापर करण्यात येतो. यामुळे संवेदनशील त्वचेवर पटकन परिणाम होतो. जास्त काळ टिकली लावल्यास कपाळाच्या मध्यभागाची त्वचा खराब होते आणि त्याला हानी पोहचू शकते. यामुळे त्या ठिकाणी खाज येण्यासारख्या गोष्टी होतात. तसंच काही जणांना खाजेमुळेही हा भाग लालसर अथवा सफेद होण्याचा त्रास होतो.
अलर्जीचे लक्षण
टिकलीच्या अलर्जीच्या मुख्य कारणांपेकी सर्वात पहिले लक्षण म्हणजे टिकली लावत असणाऱ्या जागेवर पांढरे निशाण येणे आणि याशिवाय सतत या जागेवर खाज येणे. याशिवाय टिकली ज्या ठिकाणी लावण्यात येते ती जागा अधिक कोरडी दिसू लागते आणि हातालाही कोरडी जाणवते. तसंच कपाळावर जळजळ, सूज येणे अशीही लक्षणे दिसून येतात. यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात ते आपण पाहूया.
तिळाच्या तेलाचा वापर (Sesame Oil)
Shutterstock
तुम्हालाही टिकलीची अलर्जी झाली अथवा टिकलीची मुळातच अलर्जी असेल तर तुम्ही प्रभावित स्थानावर तिळाचे तेल लावा. या तेलाच्या मसाज करण्याने अलर्जी जाण्यासाठी मदत मिळते. यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचे 2-3 थेंब घ्या आणि बोटाने कपाळाला लावा आणि मसाज करा. तुम्ही चेहऱ्यालाही मसाज करू शकता. हे तेल लावल्यानंतर टिकली मात्र लगेच लाऊ नका. थोडा वेळ तेल तसंच राहू द्या. काही दिवसातच तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल.
सनस्क्रिनचा करू नका अति वापर, होईल त्वचेचे नुकसान जाणून घ्या
कोरफड जेलाचा उपयोग (Aloe Vera Gel)
Shutterstock
टिकलीची अलर्जी समस्या असेल तर सुटका मिळविण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करा. कोरफड जेलमुळे तुमच्या चेहऱ्याला मुलायमपणा तर मिळतोच. पण अलर्जीपासूनही सुटका मिळते. रात्री झोपताना तुम्ही टिकलीच्या जागेच्या ठिकाणी कोरफड जेल लावा आणि रात्रभर हे असंच राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे अलर्जी लवकर निघून जाईल.
पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी
नारळाच्या तेलाचा करा वापर (Coconut Oil)
Shutterstock
नारळाचे तेल हे नैसर्गिकरित्या मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. त्यामुळे अलर्जीने येणाऱ्या खाजेवर नारळाचे तेल अत्यंत उपयोगी ठरते. यासाठी तुम्ही घरातील नारळाच्या नियमित वापरल्या जाणाऱ्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे खाज निघून जाते आणि त्वचेवर आलेले पांढरे निशाणही नाहीसे होते. तसंच नारळाच्या तेलाने त्वचादेखील अधिक मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. तुम्हाला चेहऱ्यावर अधिक चमक मिळते. मात्र तुमची त्वचा तेलकट असेल तर याचा अति उपयोग करू नका.
ब्लीच केल्याने येत असेल अलर्जी, तर करा घरगुती ब्लीच (Homemade Bleach)
मॉईस्चराईजरचा उपयोग (Moisturizer)
जरी तुम्हाला एखाद्या विशिष्ट हंगामात टिकलीमुळे अलर्जी येत असेल. उदाहरणार्थ उन्हाळ्यात जास्त घामाच्या त्रासाने टिकलीची अलर्जी येत असेल आणि यामुळे तुमचे कपाळ अत्यंत कोरडे होत असेल तर तुम्ही मॉईस्चराईजरचा वापर करू शकता. यामुळे खाज निघून जाईल आणि तुमची त्वचा अत्यंत व्यवस्थित आणि मऊ राखण्यास मदत होईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक