ॲक्ने हे कुठेही येऊ शकतात. शरीरावरील एकही जागा ॲक्नेने सोडली नाही. नितंबावर येणारे ॲक्ने हे खूपच त्रासदायक असतात. आधीच भारतीय त्वचा असल्यामुळे आपल्या नितंबाची जागा ही इतर त्वचेप्रमाणे नितळ दिसत नाही. त्यामुळेच आपल्याला कोणतेही लहान कपडे घालताना विचार करावा लागतो. शिवाय बट ॲक्ने आल्यानंतर ते जाता जात नाहीत. त्यातच जर तुम्ही चुकीचे इनरवेअर घालत असाल तरी देखील तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुमच्याही बटवर असे ॲक्ने आले असतील तर तुम्ही काही सोप्या उपायांनी तुमच्या बटवरील पिंपल्सचा त्रास कमी करु शकता.
पीएच बॅलन्स करणारे वॉश
हल्ली बाजारात प्रायव्हेट पार्टसाठी खास वॉश मिळतात. हे वॉश वापरल्यामुळे प्रायव्हेट पार्टकडील जागा ही स्वच्छ राहण्यास मदत मिळते. नितंबाची जागा ही खूप झाकलेली असते. त्यामुळे येथे हवा लागण्याची शक्यता फारच कमी असते. अशावेळी तुम्ही जर ही जागा कोरडी आणि स्वच्छ ठेवली तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तुम्ही नितंबाची जागा स्वच्छ वॉशने धुवून तुम्ही ती जागा कोरडी करा. त्यामुळेही तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. त्यामुळे ॲक्नेचा त्रास आपोआप कमी होण्यासही मदत मिळते.
स्क्रब
आपण ज्याप्रमाणे स्क्रब करतो. तशाच पद्धतीने तुम्ही नितंबालाही स्क्रब करायला हवे. तुम्ही स्क्रब केल्यामुळे नितंबावर आलेल्या फोड्या या जाण्यास मदत मिळते. त्यावर साचलेली घाण निघून जाते. इतकेच नाही तर मृत त्वचा देखील निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून एखादे लाईट असे स्क्रब आणून त्याचा वापर करा. म्हणजे तुमच्या नितंबावर पिंपल्स येण्याचा त्रास कमी होईल. तुम्हाला जर घरचा स्क्रब हवा असेल तर तुम्ही काही घरगुती स्क्रब देखील वापरु शकता. त्यामुळेही तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल.
काळवंडलेल्या buttocks च्या त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय
वापर खास ॲक्ने शॅम्पू
हल्ली बाजारात खास नितंबावर येणाऱ्या पिंपल्सच्या त्रासासाठी शॅम्पू मिळतो. त्याच्या नित्य वापराने देखील तुमच्या नितंबावरील ॲक्ने कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही ज्या प्रमाणे बॉडीवॉश वापरता अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला हे वापरता येतात. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास हा शॅम्पू ट्राय करा. त्यामुळे यावरील ॲक्ने सुकण्यास मदत मिळते. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर तुम्हाला नक्कीच ते अशाप्रकारचा शॅम्पू देतील.
स्वच्छता महत्वाची
काहीही झाले तरी तुम्हाला स्वच्छता राखणे हे देखील फारच गरजेचे असते. स्वच्छता तुम्ही राखली तर तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. तुम्ही कोणतेही उपाय केले तरी देखील तुम्हाला स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्यामुळए या सगळ्या गोष्टी ट्राय केल्यानंतर तुम्ही काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
आता हे काही सोपे उपाय नक्की करुन बघा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.