आपण नेहमीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. इतर भागांचीही काळजी घेतो मात्र बऱ्याचदा आपल्या हाताचा कोपरा, ढोपर आणि मांड्यांची काळजी घेताना हलगर्जीपणा होतो. तुम्ही जर शॉर्ट ड्रेस घालत असाल तर तुम्हाला तुमच्या मांड्या काळ्या असणं हे नक्कीच लज्जास्पद वाटेल. पण तुम्हाला तुमच्या मांड्यांचा काळेपणा नक्कीच घरच्या घरी सोपे उपाय करून घालवता येतो. केवळ शाळेतच नाही तर त्यानंतरही तुम्ही शॉर्ट कपडे घालणार असाल पण तुम्हाला मांड्यांच्या काळेपणामुळे तसे करता येत नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या मांड्या काही कारणाने जर काळ्या पडल्या () असतील तर तुम्ही आतल्या बाजूच्या पिगमेंटेशनच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी नक्की या सोप्या टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
मांड्या काळ्या होण्याची कारणे
मांड्यांवर काळेपणा वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. काही जणांना हार्मोनल बदलामुळे होतो तर काही जणांना मांड्या घासल्यामुळे हा त्रास होतो. मांड्या एकमेकांना घासल्यामुळे त्वचेचे एकावर एक घर्षण होते आणि त्यामुळे मांडी काळी पडते. इतर त्वचेच्या तुलनेत मांडी अधिक काळी दिसू लागते. पण हे अत्यंत नॉर्मल आहे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता. हेच उपाय नक्की काय आहे ते आपण पाहूया.
कोरफड जेल (Aloe vera gel)

कोरफड जेलचा प्रभाव हा अत्यंत चांगला आणि थंड असतो. हा उपाय विशेषतः तेव्हा कामी येतो जेव्हा मांड्या एकावर एक घासल्या जातात आणि काळ्या पडतात. कोरफड जेल त्वचेला अत्यंत चांगले मऊ आणि मुलायम बनवते आणि पिगमेंटेशनची समस्या असेल तर त्याचा परिणाम कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
कसे वापरावे
- कोरफडच्या पानातून जेल काढून घ्या आणि सरळ तुमच्या काळ्या झालेल्या मांड्यावर लावा
- साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या
- तुम्ही दिवसातून दोन वेळा याचा वापर करून घेऊ शकता
तुम्हाला हवं असल्यास, बदामाच्या तेलाचे काही थेंब एका वाटीत घ्या आणि त्यात कोरफड जेल मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही तुमच्या मांड्यांना लावा आणि आपल्या त्वचेला हलक्या हाताने मालिश करा. 15 मिनिट्स हे असंच राहू द्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुतल्यावर टॉवेलने सुकवून घ्या.
हळद पावडर

हळद हा भारतीय स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारा मसाला आहे. हळद पावडर त्वचेवर येणाऱ्या पिगमेंटेशनसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही अभ्यासानुसार, हळद ही त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, पिगमेंटेशन, काळे डाग आणि अन्य समस्यांवर अतिशय उपयुक्त ठरते. तुमच्या मांड्यांचा काळेपणा हा शरीरातील अतिरिक्त मेलेनिनमुळे असेल तर हळद पावडर हा अत्यंत चांगला उपाय आहे.
कसे वापरावे
- एक चमचा दुधाच्या मलईमध्ये थोडीशी अगदी चिमूटभर हळद पावडर मिक्स करा
- मांडीच्या काळ्या झालेल्या भागाला ही लावा आणि सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा
- तुम्ही रोज दिवसातून एक वेळा हा प्रयोग करू शकता
लिंबाचा रस

लिंबाचा रस हा नैसर्गिक ब्लिंचिंग आहे. त्वचेचा रंग उजळण्यासाठी याची मदत होते. यामध्ये असणारे आम्लीय गुण आणि विटामिन सी हे नव्या त्वचेच्या कोशिका निर्मितीसाठी मदत करतात. लिंबाचा रस तुमची त्वचा कोरडी करू शकतो. त्यामुळे याचा वापर त्वचेवर केल्यावर नेहमी मॉईस्चराईजरचा वापर करा.
कसे वापरावे
- एका वाटीत एक लिंबाचा रस तुम्ही पिळून घ्या. कापसाने हा रस तुम्ही काळ्या झालेल्या मांड्यंना लावा
- साधारण 20 मिनिट्स राहू द्या आणि मग थंड पाण्याने तुम्ही धुवा
- आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा याचा वापर करावा
- ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी लिंबाच्या रसामध्ये पाणी घालून याचा वापर करावा
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चमचा ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिक्स करून त्यात 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करा. हे तुम्ही काळ्या झालेल्या मांड्यांना लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी पाण्याने स्वच्छ करा.
नारळाचे तेल

नारळाचे तेल हे नैसर्गिक मॉईस्चराईजर आहे. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्या महिलांसाठी हे एक वरदानच आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही नारळाचे तेल नक्की काळ्या मांड्यांवर लावा. याचा प्रभाव अत्यंत चांगला होतो.
कसे वापरावे
- 3 मोठे चमचे नैसर्गिक नारळाचे तेल आणि त्यात 1 मोठा चमचा लिंबाचा रस मिक्स करा
- हे मिश्रण तुम्ही तुमच्या काळ्या झालेल्या मांड्यांच्या भागांना लावा. 15-20 मिनिट्स तसंच ठेवा
- त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. तुम्ही या घरगुती उपायाचा आठवड्यातून दोन वेळा उपयोग करून घेऊ शकता
मांड्यांचा काळेपणा घालविण्यासाठी काकडीचा रस हादेखील एक चांगला आणि सोपा घरगुती उपाय आहे. योग्य परिणामांसाठी तुम्ही लिंबाचा रस लावा.
टीप – सर्वांची त्वचा एकसमान नसते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही घरगुती उपायाचा वापर करतानादेखील पॅच टेस्ट करून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक