वातावरणातील बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो. धुळ, माती, प्रदूषण आणि घामामुळे त्वचा राठ होत जाते. त्वचा मऊ, चमकदार दिसण्यासाठी नियमित ती खोलवर स्वच्छ करायला हवी. बऱ्याचदा त्वचेची योग्य निगा न राखल्यास त्वचेवर डेड स्किन वाढू लागते. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच बाधा निर्माण होते. त्वचेवर या सर्व गोष्टींचा थर जमा झाल्यामुळे त्वचा राठ आणि काळवंडलेली दिसू लागते. यासाठीच घरातच काही उपाय करून तुम्ही त्वचा स्वच्छ करू शकता.
चेहऱ्यावरील डेड स्किन दूर करण्यासाठी उपाय
चेहरा स्वच्छ करण्यासाठी फक्त चांगले फेस वॉश अथवा क्लिंझर पुरेसे नाही. त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी चांगल्या फेस स्क्रबची गरज असते. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि पोअर्स मोकळे होतात. तुम्ही हे फेस स्क्रब घरीच बनवू शकता.आठवड्यातून एकदा याचा वापर करा.
मध आणि साखर
साखर आणि मधाचा वापर करून तुम्ही घरीच तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करू शकता. शिवाय यामुळे मृत त्वचादेखील दूर होते.
साहित्य –
- एक चमचा साखर
- एक चमचा मध
कसा कराल उपाय
- साखर आणि मध एकत्र करा यामध्ये तुम्ही गरजेनुसार थोडं पाणी मिसळू शकता.
- स्क्रब तयार करण्यासाठी गुलाबपाणी अथवा ग्रीन टीच्या पाण्याचा वापर केल्यास चांगला फायदा मिळेल.
- मिश्रण चेहऱ्यावर लावा दहा मिनीटांनी हळुवार हाताची बोटे गोलाकार फिरवत तो स्क्रब काढून टाका. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होईल.
- मात्र लक्षात ठेवा फार रगडून स्क्रब काढू नका.
पपईचा गर
त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी पपईचा गर खूपच फायदेशीर ठरतो. कारण पपईमध्ये क्लिंझिग घटक असतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय चमकदारही होते.
साहित्य –
- एक चमचा पपईचा गर
- एक चमचा ओट्स
कसा कराल उपाय
- दोन्ही घटक एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा
- दहा मिनीटांनी हाताने मसाज करत स्क्रब काढून टाका.
- चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा.
संत्र्याची साले
संत्र्याच्या सालींचा त्वचेसाठी खूप चांगला फायदा होतो. यासाठी तुम्ही ताज्या अथवा सुकवलेल्या संत्र्यांच्या सालींचा वापर करू शकता.
साहित्य –
- एक चमचा संत्र्यांच्या सालींची पेस्ट
- एक चमचा कच्चे दूध
कसा कराल उपाय
- दोन्ही घटक एकजीव करा आणि चेहऱ्यावर हे मिश्रण लावा.
- संत्र्यांच्या सालींमुळे त्वचा स्वच्छ होते आणि दुधामुळे त्वचेचं योग्य पोषण होतं.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक