पावसाळा सुरु झाला की सगळ्या घरात ओलावा जाणवू लागतो. हा ओलावा कितीही नाही म्हटला तरी नकोसा होतो. साधारण आषाढ महिन्यामध्ये घरात अधिक माशा येऊ लागतात. किचन म्हणू नका की कुठेही अगदी माशांचा त्रास होऊ लागतो. या माशा घरात असल्या की उगाचच घर अस्वच्छ वाटू लागते. पावसाळ्यात किचनमध्ये सतत माशा येत असतील तर तुम्ही काही सोपे उपाय करुन माशा घालवू शकता. यामुळे तुमची चिडचिडही होणार नाही. जाणून घेऊया घरी माशा आल्यावर नेमके कोणते सोपे आणि साधे उपाय करायला हवे ते.
पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित
पाणी अजिबात ठेवू नका
पावसाळ्यात किचन, बाथरुममध्ये सतत पाणी साचून राहतं. घरात सतत ये-जा सुरु असल्यामुळे ओल्या छत्री किचनमध्ये येत जात असतात. अशावेळी किचनमध्ये बाहेरुन पाणी आले की, त्यामध्ये काही असेल तर त्यावर माशा घोगांवत राहतात. त्यामुळे शक्य असेल तेवढे घर कोरडे ठेवा. घरात ओलावा जाणवत असेल तर तुम्ही ती जागा कोरडी करा. एखादा ओला कपडा किंवा फडका किचन किंवा इतर परीसरात ठेवू नका. त्यामुळे घरी अजिबात पाणी ठेवू नका.
पावसाळ्यात वॉर्डरोबचा फंगसपासून असा करा बचाव
अस्वच्छता नको
किचनचा ओटा किंवा किचनमध्ये जरासे जरी उष्ट राहिले असेल तर अशावेळीही माशा राहण्याची शक्यता असते. अशावेळी घरातील सगळ्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. विशेषत: किचनचा ओटा. बरेचदा त्यावर तसेच उष्ट राहते. त्यामुळे त्याठिकाणी माशा येण्याची शक्यता असते. अशा माशा पटकन निघून जात नाही. अशावेळी तुम्हाला ओटा हा स्वच्छ पुसणे गरजेचे असते. जर तुम्ही ओटा स्वच्छ पुसला आणि कोरडा केला तर माशा पुन्हा फिरकत नाही
कापूर आणि धूप जाळा
जर घरात सगळीकडे माशांचा उपद्रव झाला असेल तर अशावेळी तुम्ही एका भांड्यात कापूर आणि धूप घेऊन जाळा. कापूर आणि धूप जाळल्यामुळे घरात माशांचा त्रास होत नाही. शिवाय घरही सुगंधी राहते. त्यामुळे कापूर आणि धूप घरी असल्यास ते जाळा तुम्हाला नक्कीच त्याचा त्रास होणार नाही.
लोणच्याला बुरशी येते, जाणून घ्या लोणचं टिकवण्याच्या टिप्स
झाडांना जास्त पाणी घालू नका
पाणी हे माशी येण्याचे मुख्य कारण असल्यामुळे घरात जर एखादे झाड असेल तर तुम्ही त्याला पावसाच्या दिवसात खूप पाणी घालू नका. जर या झाडांमध्ये खूप पाणी घातले तरी देखील घरात माशा येऊ शकतात.त्यामुळे घरी असणाऱ्या झाडांना पावसाळ्यात कमीत कमी पाणी घाला. त्यामुळे ओलावा राहणार नाही. घरात एखादे तुळशीचे झाड ठेवले तरी देखील माशांचा उपद्रव कमी होतो.
निलगिरी आणि पेपरमिंट तेल
जर माशांचा उपद्रव काही केल्या कमी होत नसेल तर तुम्ही घरात काही तेल एकत्र करुन स्प्रे करु शकता.त्यामुळे देखील हा त्रास कमी होऊ शकतो. निलगिरी आणि पेपरमिंट तेल एकत्र करुन तुम्ही त्याचा स्प्रे तयार करा आणि ज्या ठिकाणी माशा जास्त येत आहेत असे दिसत असेल तर तिथे हे तेल स्प्रे करा. इतकेच नाही तर तुम्ही घराच्या काही सतत ओल्या राहणाऱ्या जागांमध्ये तुम्ही हे तेल स्प्रे करु शकता.
आता माशांचा उपद्रव होत असेल तर तुम्ही हे काही सोपे उपाय करु शकता.