ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
worms in garden soil

झाडाच्या कुंडीत कीड येत असेल तर करा सोपे उपाय

अनेकांच्या घरात लहान लहान कुंड्या लावलेल्या असतात. गार्डन अथवा अनेक कुंड्या आपण घरातील गॅलरीमध्ये ठेवतो आणि सजवतो. पण तुम्ही झाडे लावता तेव्हा त्याची माती कशी आहे आणि त्यामध्ये कीड तर लागणार नाही ना अथवा त्याची वाढ कीड न लागता नीट होईल की नाही हेदेखील पाहणे गरजेचे आहे. एकदा झाड लावले म्हणजे काम झाले असे होत नाही. तर त्याची व्यवस्थित निगाही राखली गेली पाहिजे. घरात रोपटी लावणे हे जितके आवडते तितकीच त्याची काळजी घेणे आणि त्याला कीड लागू न देणेही गरजेचे आहे. खरं तर काही किडे हे मातीमध्ये खताप्रमाणे काम करतात पण जर हे किडे तुमच्या झाडांना नुकसान पोहचवत असतील तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अशी कीड कुंड्यांमध्ये सुरूवातीपासूनच लागते आणि मग त्यामुळे झाडे सुकू लागतात. पण तुम्ही चिंता करू नका. झाडाच्या कुंड्यांमध्ये जर अशी कीड लागली असेल तर तुम्हाला काही सोपे उपाय आम्ही सुचवत आहोत. तुम्ही याचा वापर नक्की करा आणि सुटका मिळवा. 

मातीला कीड का लागते?

बऱ्याचदा मातीला नक्की कीड का लागते या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला माहीत नसतं. पण जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही त्यावर योग्य उपाय करू शकता. पावसाळ्यात बऱ्याचदा आपण बघतो की आपण झाडाची निगा नीट राखू शकत नाही. मग मातीचे थरावर थर बसतात आणि त्यामध्ये पावसाळी कीड तयार होते. त्यामुळे पावसाळ्यात आपली झाडे अशीच सोडून देऊ नका. नियमित त्याची देखरेख करा. खुरप्याच्या मदतीने दर तीन चार दिवसाने माती वरखाली करा. ज्यामुळे त्यावर कीड लागणार नाही. 

माती उन्हात सुकवा

plants

सर्वात पहिले काम म्हणजे जर कीड लागली असेल तर तुम्ही माती उन्हात सुकवा. ही पद्धत तुम्ही कोणतेही नवे रोपटे लावण्याआधीपासूनही उपयोगात आणू शकता. पण जर मातीमध्ये किडे असतील तर माती तुम्ही उन्हात सुकवा. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे माती सुकल्यानंतर तुम्ही हाताने माती तपासून पाहा. किडे असतील तर तुम्हाला हाताला ते जाणवतील. त्यानंतर तुम्ही माती चाळण्यासाठी चाळण घ्या आणि ही माती चाळून घ्या. त्यानंतरच तुम्ही रोपटे लावण्यासाठी याचा वापर करा. लक्षात ठेवा की, माती ही तुम्हाला प्रखर उन्हामध्येच सुकवायची आहे. 

व्हिनेगरचा करा वापर 

कुंडीमधील मातीमध्ये जर कीड लागली असेल तर तुम्ही सर्वात पहिले रोपटे बाहेर काढून घ्या. त्यानंतर तुम्ही मुळापासून तर कीड लागली नाही ना हे तपासून पाहा. जर तसे असेल तर तुम्ही त्वरीत पाण्याने हे स्वच्छ करून घ्या आणि नवी माती तुम्ही मुळांमध्ये लावा आणि वेगळ्या कुंडीमध्ये हे रोपटे लावा. कीड लागलेल्या मातीसाठी तुम्ही एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात 6-7 चमचे व्हिनेगर मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. आता त्या मातीवर या पाण्याचा शिडकावा करा आणि साधारण 4-5 तास तसंच राहू द्या. एक अथवा दोन दिवस ही माती तुम्ही आलटून पालटून तपासून पाहा आणि मग कीड नाही याची खात्री पटली की पुन्हा एकदा त्यामध्ये रोपटे लावा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

सफेद किड्यांपासून सुटका

तुम्हाला मातीमध्ये जर सफेद किडे दिसले असतील तर या किड्यांपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही डिस्परिन गोळीचा (Disprin Tablet) वापर करा. सर्वात पहिले पाव बादली पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन गोळ्या मिक्स करून घ्या. पूर्ण मिक्स झाल्यावर हे पाणी स्प्रे बाटलीत भरा आणि मातीवर हे पाणी शिंपडा. लक्षात ठेवा की, झाडावर हे पाणी शिंपडायचे नाही तर मातीवर शिंपडायचे आहे. पाण्यात जास्त गोळीचा वापर करू नका.

कडिलिंबाचा करा वापर 

neem

कडिलिंबांची पाने हादेखील यावरील उत्तम उपाय आहे. तुमच्या झाडातील मातील कीड (worms in garden soil) लागली असेल तर ततुम्ही कडिलिंबाच्या पानाची पावडर बनवा. जेव्हा तुम्ही रोपटे लावाल तेव्हा तुम्ही मातीमध्ये ही पावडर मिक्स करा. कडिलिंबाच्या पानांमध्ये किटकनाशक गुण आढळतात. त्यामुळे हे अत्यंत नैसर्गिक असे खत आहे. हा कीड न लागण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. 

अधिक वाचा – सौंदर्य वाढवण्यासाठी घरातच लावा ही झाडे, होईल चांगला फायदा

ADVERTISEMENT

या गोष्टी ठेवा लक्षात

  • रोपटे लावताना तुम्ही जी माती तयार करता त्यामध्ये काही गोष्टी मिक्स करायला हव्या. अंड्याचे कवच, वापरण्यात आलेल्या चहाची पाने आणि राख अशा वस्तू त्यामध्ये मिक्स करून माती तयार करून घ्या. या घरगुती गोष्टी खताप्रमाणे काम करतात आणि त्यामुळे मातीमध्ये सहसा कीड लागत नाही 
  • मातीमध्ये थोडेथोडे कीडे दिसत असतील तर घाबरून जाऊ नका. ते तसेच राहू द्या. कारण हे किडे खताप्रमाणे काम करतात आणि रोपट्यांना नुकसान पोहचवणाऱ्या तत्वांनादेखील रोखतात
  • याशिवाय प्रत्येकवेळी माती ओली ठेऊ नका. यामुळे रोपटे मरते. योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करा. ज्या झाडांना पाणी जास्त लागत नाही त्यांना सतत पाणी देऊ नका

तुमच्या घरातील झाडांना वा रोपट्यांना कीड लागत असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स वापरा आणि नक्की आम्हाला सांगा याचा उपयोग झाला की नाही. 

अधिक वाचा – घरच्या झाडांची काळजी कशी घ्यावी याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT