आता मुलांना एखाद्या गोष्टीची माहिती देण्याची गरज भासत नाही. कारण तेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढतात. गुगलच्या या काळात मुलांना नको त्या गोष्टींची माहिती ही थोडी जास्त मिळत असते. त्यामुळे कधी कधी मुलांना न कळत्या वयात कळायला नको अशा गोष्टीही चुकीच्या पद्धतीने कळू लागतात. त्यामुळेच मुलांना योग्य वयात सेक्स एज्युकेशन (SEX Education) देण्याची गरज असते. पण आताची मुलं ही लवकर मोठी होऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी याची जाणीव कधी करुन द्यायची हे देखील आपल्याला माहीत हवे. घरी मुलगी किंवा मुलगा असेल तर सेक्स एज्युकेशन कधी द्यायला हवं आणि ते कशा पद्धतीने द्यायला हवं ते जाणून घेऊया.
मुलीला पहिल्यांदा पिरेड्स आलेत,असा साधा संवाद
योग्य वयाची जाणीव
हल्लीची मुलं पूर्वीच्या काळापेक्षा खूपच लहान वयात मोठी होऊ लागली आहे. मुलींना पिरेड्स लवकर येऊ लागले आहेत. त्यामुळे आता मुलांना सांगण्यासाठी एक असे वय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांमधील काही शारीरिक बदल टिपून घ्या. त्यांच्या शरीरात काही बदल होत असेल किंवा त्यांचे प्रश्न नको त्या गोष्टीला धरुन वाढत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण ज्यावेळी त्यांना प्रश्न पडतात त्यावेळीच त्यांची उत्तरे त्यांना द्यायला सुरुवात करा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे त्यांच्या वयाची जाणीव होणे आणि त्यानंतर त्यांना सांगणे
अशी करा सुरुवात
मुलांना सेक्स एज्युकेशन देताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा उलगडा करु शकत नाही. कारण त्यांना सगळ्या गोष्टी एकावेळी कळणारच नाही. अशावेळी तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगा. मुलांना माहिती देण्यापेक्षा शालेय वयात असतानाच पॉर्न म्हणजे काय ते माहीत असते. त्यांचे ते आकर्षण वाढू नये असे वाटत असेल तर तुम्हीच त्यांना या संदर्भात थोडे समजावून सांगा. एखादी गोष्ट झाकून ठेवलेली असेल तर ती उघडून बघायला अनेकांना आवडतं. त्यामुळेच त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवू नका. मुलांचे साधारण प्रश्न हे बाळं कसं जन्माला येतं? प्रेम म्हणजे काय?, प्रेम कसं करतात? किंवा त्यांनी मालिकांमध्ये जर काही पाहिलं असेल तर त्याच्याशी निगडीत असतात. अशावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना थोडी काळजी घ्या.
पालक आणि मुलांमधील हरवत चाललेल्या नात्याला हवी ‘सुसंवादाची गरज’

शोधक वृत्तीला देऊ नका चालना
मुलांची वृत्ती ही शोधक असते. त्यांना नवीन काहीतरी माहिती करुन घ्यायचं असेल तर ते इतर नको तो पर्याय शोधतात. चुकीच्या व्यक्तिंकडून मिळालेली माहिती ही त्यांना चुकीचे मार्गदर्शन घडवून देते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या शोधक वृत्तीला चालना देण्यापेक्षा तुम्हीच त्यांना या गोष्टी सांगा म्हणजे मोठ्या मुलांच्या संगतीत त्यांना नको ते कळणार नाही. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगा. सुरुवात करताना पिरेड्स, येणारे केस, प्रेमाची भावना, शारीरिक संबंध त्याचे परिणाम यांची हळुहळू माहिती द्या. म्हणजे मुलांचा गोंधळ होणार नाही.
आता तुमच्या मुलांचे योग्य वय जाणून त्यांना योग्य ती माहिती द्या.
मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा