ADVERTISEMENT
home / पालकत्व
Improving Sleep Habits in Children

मुलांना अशी लावा लवकर झोपून लवकर उठण्याची सवय 

मुलांना सकाळी लवकर उठवून शाळेत पाठवणं हे खरं तर आयांसाठी एक मोठं काम असतं. सकाळी लवकर उठल्यावर मुलं अर्धी झोपेत किंवा सुस्त राहतात. पण असे का होते? मुलांची झोप का पूर्ण होत नाही याचे कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? वास्तविक, पुरेशी झोप आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाची आहे. खास करून लहान मुलांची झोप चांगली होणे तर अत्यंत महत्वाची आहे कारण चांगली झोप त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी खूप आवश्यक असते. व्यवस्थित झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुले साथीच्या आजारांना बळी पडत नाही. पण सध्याच्या काळात टीव्ही, मोबाईलसारखी गॅजेट्स मुलांच्या झोपेची शत्रू बनली आहेत. रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल बघत बसल्याने, त्यांच्यातच मग्न राहिल्याने मुलांच्या झोपेचे वेळापत्रक विस्कळीत होते. आपल्याला किती झोप आवश्यक आहे हे आपल्या वयावर अवलंबून असते. 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांनी किमान 11 ते 14 तास झोपावे तर 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी किमान 10 ते 13 तासांची झोप घेतली पाहिजे. 6 ते 12 वर्षांच्या मुलांना 9 ते 12 तासांची झोप आवश्यक आहे. पण हल्ली टीव्ही मोबाईल यांमुळे मुले लवकर वेळेत झोपत नाहीत आणि मग सकाळी शाळेसाठी लवकर उठावे लागल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. म्हणूनच मुलांना रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी म्हणजे सकाळी लवकर उठताना त्यांना त्रास होणार नाही. 

मुलांना रात्री लवकर झोपण्याची सवय कशी लावावी 

Improving Sleep Habits in Children
Improving Sleep Habits in Children

लहान मुले अनुकरणप्रिय असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे केवळ मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही चांगल्या झोपेचे महत्त्व समजले पाहिजे. आणि प्रत्येकाने वेळेवर झोपण्याची सवय लावली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे वेळापत्रक बनवून सर्वांनी ते पाळायला हवे. मुलांना काहीतरी चांगले शिकण्यासाठी क्लास लावा किंवा चांगल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना गुंतवा. मुलांनी इनडोअर आणि आउटडोअर खेळ खेळले पाहिजेत. जर मुले दिवसभरात खेळून ,अभ्यास करून दमतील तेव्हाच त्यांना रात्री शांत झोप लागेल. तसेच मुले जेथे झोपतात  तेथे कोणतेही उपकरण नसावे याची काळजी घ्या. जर मुले डिजिटल डिव्हाइस वापरत असतील तर ते वापरण्याची वेळ मर्यादित ठेवा आणि रात्री मुलांना कुठलीही स्क्रीन बघू देऊ नका. 

झोपण्याच्या खोलीत शांत वातावरण असावे 

लहान मुले फक्त बेडरूममध्ये शांत ठिकाणी सहज झोपू शकतात. म्हणूनच झोपताना, आपण आपल्या खोलीत मंद  प्रकाश असावा आणि बेडरूममध्ये हलका आवाज ठेवावा जेणेकरून लहान मुले विचलित होणार नाहीत आणि त्यांना शांत झोप लागेल.

झोपण्याच्या आधी टीव्ही बघू नका 

मुलांना लवकर झोपायला लावण्यासाठी, झोपण्याच्या किमान 1 तास आधी टीव्ही बंद करा. कारण टीव्ही किंवा अशा कोणत्याही स्क्रीनच्या प्रकाशामुळे आपल्यातील मेलाटोनिन हार्मोन कमी होते. झोपेसाठी या हार्मोनची उच्च पातळी आवश्यक असते. ते टिकवून ठेवण्यासाठी मुलांना झोपण्याच्या 1 तास आधी टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून या हार्मोनच्या वाढीसह त्यांना लवकर झोप येऊ लागते.

ADVERTISEMENT

झोपेचे वातावरण तयार करा

Improving Sleep Habits in Children
Improving Sleep Habits in Children

मुलांच्या उशिरा झोपण्याच्या सवयीला काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. कारण आजचे पालक कोणत्या ना कोणत्या कारणाने रात्री उशिरापर्यंत जागत असतात. अशा स्थितीत जोपर्यंत मुलांना घरात झोपेचे वातावरण मिळत नाही तोपर्यंत त्यांना झोप कशी येणार?  त्यामुळे त्यांच्यासाठी झोपेचे वातावरण तयार करा. टीव्ही बंद करा आणि गोष्टीचे पुस्तक वाचण्यास सांगा किंवा तुम्ही स्वतः त्यांना गोष्ट सांगा. अशा प्रकारे मुलांना स्वतःहून लवकर झोपण्याची सवय होईल. 

अशाप्रकारे मुलांच्या दिनचर्येत काही बदल करून तुम्ही लवकर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावू शकता.

Photo Credit – istockphoto 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
22 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT