ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
कोरोनाच्या काळात दररोज सकाळी का करायला हवं मेडिटेशन

कोरोनाच्या काळात दररोज सकाळी का करायला हवं मेडिटेशन

देशभरात दुसऱ्या लाटेमुळे वाढलेली कोरोनाची संख्या कमी होत असली तरी सुरक्षेसाठी लॉकडाऊनचा टप्पा मात्र वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून राहणं आणि कोरोनामुळे वाढणाऱ्या चिंतेला दूर ठेवणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला स्थिर आणि शांत करायला हवं. गेले दोन वर्ष घरात अडकून पडलेल्या लोकांना मागच्या लॉकडाऊननंतर काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कोरोना जाता जाता पुन्हा सक्रिय झाल्यामुळे कोरोनाची भीती अधिकच तीव्र झाली. मित्रमंडळी, नातेवाईक यांना न भेटता पुन्हा घरात राहणं खूपच कठीण आहे. तुमच्या मानसिक स्थितीचा परिणाम हळू हळू तुमच्या मनावर होऊ लागतो. ज्यामुळे तुम्ही सतत चिडचिड करता, छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला वाईट वाटतं, नातेसंबध कलुषित होतात, काम करण्याचा कंटाळा येतो, मनात नकारात्मक विचारांचा गुंता वाढतो, काळजीने मन घाबरून जातं. यासाठीच या काळात मेडिटेशन करून तुम्हाला तुमच्या मनाला स्थिर करू शकता. 

Pexels

कोरोनाच्या काळात कशी कराल मेडिटेशनला सुरूवात

कोरोनाच्या काळात मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशनला सुरूवात कशी करावी.

ADVERTISEMENT

छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा

एकाजागी शांत बसणं आणि मनाला स्थिर करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यासाठी मेडिटेशनचा सतत सराव करणं गरजेचं आहे. कारण शांत बसताच तुम्हाला आजूबाजू्च्या सर्व चिंता काळजी अधिक तीव्रतेने जाणवू लागतात. त्यामुळे जसं तुम्ही पहिल्याच दिवशी कठीण व्यायाम करू शकत नाही त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी खूप वेळ मेडिटेशन करत बसू नका. सुरुवातीला फक्त श्वासावर लक्ष ठेवणं, दोन ते तीन मिनिटे श्वासाचे व्यायाम करणे, पुढे पुढे हा वेळ दहा ते पंधरा मिनिटांनी वाढवणं असा मेडिटेशनचा सराव करा.

मेडिटेशन मॉर्निंग रूटिनचा एक भाग करा

मेडिटेशन करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटेची वेळ. कारण या काळात इतर कोणत्याही गोष्टीचा आवाज अथवा व्यत्यय येत नाही.  शिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो. सकाळच्या वेळी कोणतेही कामे नसल्यामुळे तुमचे मन आणि मेंदू दोन्ही निवांत असतात. यासाठीच सकाळी लवकर उठण्याची सवय लावा आणि मेडिटेशनचा तुमच्या मॉर्निंग रूटिनमध्ये समावेश करा. सकाळी उठल्यावर काही मिनिटे अंथरूणात शांत बसून राहा. त्यानंतर श्वासाकडे लक्ष देत मेडिटेशनला सुरवात करा. हळू हळू तुमची ध्यानाची जागा ठरवत व्यवस्थित मेडिटेशनचा सराव करा. 

मेडिटेशनच्या योग्य टेक्निकचा सराव करा

मेडिटेशन म्हणजे सर्वांना वाटतं की फक्त शांत राहून मनाला एकाग्र करायचं. पण यामध्ये योग्य टेक्निक नाही जमलं तर तुमचं मन एकाग्र होणारच नाही. यासाठीच सर्वात आधी दीर्घ श्वसनाचा आणि शांत राहण्याचा आधी सराव करा. त्यानंतर दोन श्वसनामध्ये प्रार्थना, नामस्मरण या  गोष्टींवर लक्ष केद्रित करा ज्यामुळे तुम्हाला आतून शांतता मिळेल. या काळात तुम्ही फक्त चांगले आणि सकारात्मक विचार जाणिवपूर्वक करण्याचा प्रयत्न करा.

मेडिटेशनचे नियम पाळा

जर तुम्हाला मेडिटेशनबाबत काहीच माहीत नसेल तर यासाठी योग्य तज्ञ्ज व्यक्तीची मदत घ्या. तुम्हाला युट्यूब अथवा सोशल मीडियावर याबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकते. या गाईडलाईन्स फॉलो करताना मन विचलित होऊ नये यासाठी कानात इअर फोन्स लावा.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – Pexels

अधिक वाचा –

जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे

मेडिटेशन’ ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा

ADVERTISEMENT

ध्यानाचे फायदे जाणून घ्या आणि मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi)

31 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT