home / मनोरंजन
घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स – Vastu Tips for Wealth  in Marathi

घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स – Vastu Tips for Wealth in Marathi

प्रत्येकालाच वाटतं की, आपल्याकडे स्वतःच घर असाव, गाडी आणि सुबत्ता असावी. ज्यासाठी आपण दिवस-रात्र मेहनत करत असतो. शक्य तिथे बचत करत असतो. पण आपल्यापैकी काहीच जणांची स्वप्न पूर्ण होतात तर काहींच्या हाती निराशा लागते. असं म्हणतात ना की, वेळेआधी आणि नशीबापेक्षा जास्त कधीच कोणाला काही मिळत नाही. यामुळे तुमची सगळी मेहनत तेव्हाच फळाला येईल जेव्हा तुमच्या जोडीला तुमचं नशीबही असेल. वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं उत्पन्न वाढू शकतं आणि तुम्हाला एक चांगलं आरामदायी जीवनही मिळू शकतं. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वास्तू एक्सपर्ट योगेश मिश्र यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी सांगितलेल्या वास्तू टीप्स –  

1 – एक्वेरियम आणा

Aquariums

नोकरी करणाऱ्यांच्या घरी एक्वेरियम असणं नेहमी शुभ मानलं जातं. जर तुम्हाला अक्वेरियम आणून त्याची देखभाल करणं शक्य नसेल तर एखादा रंगीबेरंगी माशांच्या फोटो किंवा शो-पीसही तुम्ही ठेऊ शकता. असं म्हणतात की, एक्वेरियमच्या आत वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह निर्माण होतो. ज्यासोबतच घरातील धन संपन्नता आणि खुशालीही वाढते.  

2 – देव्हाऱ्याचं स्थान

vastu-tips-1

असं म्हणतात की, लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता असते. त्यामुळे लक्षात ठेवा की, ईशान्य कोन म्हणजेच पूर्व-उत्तर दिशा नेहमी रिकामी ठेवा आणि तिथे खासकरून स्वच्छता ठेवा. शक्य असल्यास तुमचं देवघरही त्याच कोनात बनवून घ्या. यामुळे घरात येणाऱ्या लक्ष्मीमध्ये अडथळा निर्माण करणारे दोष दूर होतील.

3 –  नकारात्मक उर्जेपासून करा घराचा बचाव

2016 1image 14 28 436600000broom-551a4fbcc1f98 l-ll

या गोष्टीवर लक्ष द्या की, घरात कधीही दोनदा झाडू किंवा लादी पूसू नये. एकदा झाडू मारल्यावर घरातील नकारात्मक उर्जा दूर होते पण दुसऱ्यांदा असं केल्यास घरातील सकारात्मक उर्जा समाप्त होते आणि लक्ष्मी रूसते.

4 – दरवाज्याबाबतची महत्त्वाची गोष्ट

decor-indian-home-main-door-design-with-sidelights-and-wall-lighting-for-exterior-indian-home-main-door-design-for-timeless-decor-black-double-entry-doors-front-door-grill

सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहराला वास्तू शास्त्रात शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा शक्य असल्यास उघडा ठेवावा. घराच्या आतल्या भागात येणाऱ्या सूर्यकिरणांच्या मार्गही मोकळा ठेवावा. ताजी हवा आणि सूर्याच्या किरणांमुळे घरातील अनेक दोष दूर होतात आणि घरात सदैव लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसंच उत्पन्नाचे मार्गही खुले होतात.

5 – रोज करा या नियमांचं पालन

images

घरावर लक्ष्मीची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याचीही साथ मिळेल. यासाठी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. रोज घरातील पहिली पोळी किंवा शेवटी उरलेली पोळी गाय किंवा कुत्र्याला खाऊ घाला. असं केल्याने तुमचा भाग्योदय होईल आणि ज्या कामात तुम्ही भाग घ्याल त्यातही यश मिळेल.  

मग तुमच्याही घरी या वास्तू टीप्सनुसार बदल करून पाहा आणि लक्ष्मीचा आशिर्वाद तुमच्या घरावर आणि कुटुंबावर कायम राहू द्या. तुम्हाला अजून कोणत्या वास्तू टीप्स किंवा घरानिगडीत गोष्टी वाचायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा. 

हेही वाचा – 

बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स

वास्तूशास्त्रानुसार या पाळीव प्राण्यांमध्ये दडले आहे तुमचे गुडलक

चूकूनही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

25 Apr 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text