सध्याच्या काळात ऑक्सिजन हा घटक सगळ्यांसाठीच महत्वाचा झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामध्ये घटणारा ऑक्सिजन हा अगदी जीवावर बेतणारा आहे. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी आहारात काही चांगले पदार्थ असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात आरोग्य फिट ठेवण्यासाठी तुम्ही काही खास पदार्थांचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही उत्तम राहण्यास मदत मिळेल. हे पदार्थ रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यात मदत करतात. चला जाणून घेऊया नेमक्या कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यास मदत करते.
कोरोना काळात #LongDistanceRelationship टिकण्यासाठी हे नक्की करा
शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणाऱ्या फळांची यादी
रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी तुम्हाला काही फळांचा आहारात समावेश करणे हे फारच गरजेचे असते.
- पेर हे फळ ऑक्सिजन वाढण्यासाठी फारच चांगला आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी हे फळ मदत करते. या फळांच्या सेवनामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत मिळेल.
- ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी अननस हे फळ देखील फारच फायद्याचे आहे. अननसमध्ये पीएच लेव्हल ही 8 च्या वर असते. त्यामुळे तुम्हाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही पुरेशा प्रमाणात त्याचे सेवन करायला हवे. हे फळ अँटीऑक्सिडंटने भरलेले असते त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते.
- पाण्याने काटोकाट भरलेलं कलिगंड हे फळ सगळ्यांनाच आवडणार आहे. या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा समावेश असतो. त्यामुळे हे फळ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे या फळाचा आहारात समावेश करायलाच हवा. या फळामध्ये सगळ्यात जास्त अल्केलाईन असते. त्यामुळे या फळाचा पीएच लेव्हलही 9 च्या घरात असतो. त्यामुळे या फळाच्या सेवनामुळे ऑक्सिजन वाढण्यास मदत मिळते.
कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स
- आंबा हे फर बारमाही उपलब्ध नाही. पण हे फळ उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असते. या फळांचा तुम्ही आहारात समावेश केला तर तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे या फळाचा तुम्ही समावेश अगदी सीझनमध्ये करायलाच हवा.
- किवी हे फळ सध्या अनेकांच्या निरोगी आरोग्यामध्ये येतो. या पदार्थांच्या सेवामुळेही शरीराला आवश्यक असलेली साखर मिळते. या फळामधील साखर ही शरीरात अल्केलाईनचे काम करते ज्यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते.
- कोणत्याही आजारावर रामबाण ठरणारा एकमेव घटक म्हणजे लिंबू वर्गातील फळ. व्हिटॅमिन C ने युक्त असलेली ही फळ शरीराला वेगवेगळ्या विषाणूंपासून दूर ठेवण्यास मदत करते. संत्री, मोसंबी, लिंबू या फळांच्या सेवनामुळे शरीलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत करते.
आता या पदार्थांचे सेवन करा आणि वाढवा शरीरातील ऑक्सिजन
कोरोना व्हायरस सारखा संसर्ग टाळण्यासाठी कर्करोगींनी घ्यावी विशेष काळजी