ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
दीर्घ काळ लोणचं टिकण्यासाठी वापरा सोप्या टिप्स, लागणार नाही बुरशी

दीर्घ काळ लोणचं टिकण्यासाठी वापरा सोप्या टिप्स, लागणार नाही बुरशी

जेवताना एखादी भाजी आवडली नाही की सर्वात पहिले कोणत्या पदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे लोणचं. आपल्याकडे अनेक प्रकारची लोणची केली जातात. पण लोणच्याला बुरशी लागते. लोणचं दीर्घ काळ टिकवायचे असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लोणचं तयार करतानाच तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अधिक काळ लोणचं टिकविण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेतली तर लोणचं दीर्घ काळ टिकण्यासाठी नक्कीच मदत होते. काही गोष्टी पूर्वपरंपरागत तुम्हाला माहीतही असतील. पण काही गोष्टी अधिक सोप्या रितीने आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हालाही लोणच्याची आवड असेल आणि दीर्घ काळ लोणचं टिकवायचं असेल तर हे नक्की वाचा. पण त्याआधी लोणचं नेमकं खराब का होतं याची कारणं जाणून घेऊया.

लोणचं खराब होण्याची कारणे

लोणचं खराब नक्की का होतं तुम्हाला माहीत आहे का? याची काही महत्वाची कारणं जाणून घ्या. 

  • लोणचंं खराब होण्याचे मुख्य कारण  म्हणजे त्याला बुरशी लागणे. लोणच्यामध्ये जे  साहित्य वापरण्यात येते त्यामुळे ही बुरशी लागते. 
  • दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला नाही तर लोणचं खराब होतं. लोणच्याला जास्त प्रमाणात तेल लागतं.  
  • तसंच लोणच्याचे साहित्य अर्थात कैरी, लिंब, आवळा हे नीट धुतले गेले नाही आणि त्यावरील डाग तसेच राहिले तरीही लोणचं खराब होण्याची शक्यता असते.  
  • लोणचं  बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यात अथवा चमच्याला योग्यरित्या स्वच्छ केले नाही अथवा कोणताही ओला चमचा लोणच्याच्या बरणीत घातल्यास, लोणचं खराब होते
  • ताजे लोणचे घातल्यानंतर सुरूवातीला काही दिवस यामध्ये चमच्याने वरखाली करणे गरजेचे असते. पण असं न केल्यास बुरशी लागण्याची शक्यता असते

लोणचं तयार करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

Instagram

ADVERTISEMENT

लोणचं दीर्घ काळ टिकवायचे असेल तर लोणचं तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

  • स्वच्छतेची योग्य काळजी घ्या 
  • लोणचं  बनविण्याच्या भाजी अथवा मसाल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दमटपणा असू नये 
  • लिंबू, आवळा अथवा कोणतीही लोणच्यामध्ये वापरली जाणारी भाजी ही डाग असणारी नको 
  • लोणच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर असे मसाले वापरताना तेलात जळणार नाही याची काळजी घ्या.  तेल कोमट असेल अथवा थंड असेल तेव्हाच मसाले घाला 
  • गोड लोणचं तयार करताना पाक व्यवस्थित जाड ठेवावा 
  • लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त लागते. ज्यामुळे लोणचं खराब होत नाही 
  • तसंच लोणच्यात तेल, मीठ, साखर, हिंग आणि  फोडणी या सगळ्या गोष्टी दीर्घ काळ टिकविण्यासाठी महत्त्वाच्या असतात

हिवाळ्यात आस्वाद घ्या ‘या’ स्वादिष्ट लोणच्यांचा, वाचा झटपट पाककृती

लोणचे कसे भरावे

Instagram

ADVERTISEMENT
  • लोणचे  ज्या कंटेनरमध्ये भरायचे आहे ते भांडे काचेचे अथवा मातीचे असावे. धातूच्या अर्थात स्टीलच्या भांड्यामध्ये लोणचे टिकत नाही
  • प्लास्टिकच्या जारमध्ये लोणचं कधी  खराब होत नाही. मात्र आरोग्यासाठी हे चांगले नाही. त्यामुळे लोणचं भरण्यासाठी काचेचाच जार असावा याची काळजी घ्या 
  • लोणचे भरण्यापूर्वी सर्वात पहिले कंटेनर डिटर्जंट आणि गरम पाण्याने नीट स्वच्छ  करून घ्या. पूर्ण सुकल्यावर मगच त्यामध्ये लोणचे भरा

उन्हाळ्यातील बोअरींग जेवणाला करतील ही झटपट लोणची चटकदार

लोणचे कसे ठेवावे

लोणचे नुसते तयार करून चालत नाही ते टिकविण्यासाठी योग्य तऱ्हेने ठेवावेही लागते. याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या 

  • लोणचं तयार करून झाल्यावर दोन ते तीन दिवसाने मलमलच्या कपड्यामध्ये बरणी झाकून उन्हात ठेवावे ज्यामुळे लोणच्यात कोणताही दमटपणा असेल तर तो निघून जाईल आणि लोणचे दीर्घ काळ टिकू शकेल
  • लोणच्यातील मसाल्यांमध्ये दमटपणा असेल तर लोणचे खराब होऊ शकते त्यामुळे लोणचं तयार करण्यापूर्वी हे  मसाले जरा भाजून घ्या अथवा मसाले काही वेळ उन्हात ठेवा
  • लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला दीर्घ काळ लोणचे टिकवायचे असेल तर त्यामध्ये मीठ थोडे जास्त प्रमाणात घाला. लोणचे हे बराच काळ ठेवण्यात येते. त्यामुळे मधून मधून त्यामध्ये मीठाचे प्रमाण तुम्ही तपासून घ्या 
  • यामध्ये तेलामध्ये लोणचे पूर्ण मुरायला हवे असते. तेल तरंगणे गरजेचे आहे. तसे नाही झाले तर बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलाचे प्रमाण व्यवस्थित आहे की नाही ते पाहा. अन्यथा तुम्हाला वरूनही फोडणी घालता येते 
  • गोड लोणचे बनवत असाल तर अजिबात पाण्याचा थेंबही राहता कामा नये. पाक व्यवस्थित जाड करून घेणे 
  • लोणचे बनविण्यासाठी जो हंगाम आहे त्याप्रमाणे भाजीचा वापर करावा. भाजी आधी स्वच्छ धुवा. ती कपड्याने स्वच्छ करा आणि उन्हात काही वेळ सुकवा 
  • कैरीच्या  लोणच्यासाठी कच्ची कैरी आहे की नाही याचा अंदाज घेऊनच वापर करा. तसंच आवळा लोणचे बनविण्यासाठी ताजे आणि कच्चे आवळे घ्यावेत. यावर डाग असू नयेत

लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
10 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT