पावसाळी वातावरणात मुसळधार पाऊस घराच्या खिडकीत बसून पाहणं रोमांचक ठरू शकतं… सोबत गरमा गरम आल्याचा चहा, कांदाभजी, बटाटेवडे अशी जय्यत तयारी असेल तर यासारखं दुसरं सुख नाही. पण जर या काळात जर तुमचं घर विशेषतः स्वयंपाक घर अस्वच्छ आणि असुरक्षित असेल तर मात्र तुमचं पावसामुळे झालेलं प्रसन्न मनावर चिंता, काळजीत बदलू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात बाहेर सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो. ज्यामुळे घरातील वातावरणाही उबदार आणि कुबट होण्याची शक्यता वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. यासाठीच पावसाळ्यात घराची आणि स्वयंपाक घराची विशेष निगा राखायला हवी. स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
कसं ठेवाल तुमचं स्वयंपाक घर सुरक्षित आणि स्वच्छ
दर महिन्यातून एकदा आणि विशेषतः पावसाळ्याआधी स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुरक्षित आहे का हे पाहायला हवं. यासाठी फॉलो करा या टिप्स
नियमित स्वच्छता राखणे गरजेचे
पावसाळ्यात किचनमध्ये छोटे मोठे किडे आणि किटक येण्याची शक्यता वाढते. बाहेरील वातावरणात झालेल्या बदलांमुळे हे जीवजंतू तुमच्या घराचा आसरा घेतात. मात्र त्यामुळे तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठीच पावसाळ्यात दिवसभरात दोनदा किचन स्वच्छ करा. किचनच्या ट्रॉली आणि कपाटांमध्ये झुरळ येत असेल तर पावसाळ्याआधी घर पेस्ट कंट्रोल करून घ्या.
कोरडा मसाला व्यवस्थिक पॅक करा
उन्हाळ्यात आपण मसाले आणि साठवणीचे पदार्थ घरात करून ठेवतो. शिवाय स्वयंपाकासाठी लागणारे विविध प्रकारचे मसाले बाजारातून आणले जातात. मात्र पावसाळ्यात ओलाव्यामुळे हे मसाले लवकर खराब होऊ शकतात. यासाठीच पावसाळ्याआधी एकाद्या कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावे. शिवाय जुने झालेले, रंग फिका झालेले मसाले आधीच फेकून द्यावेत. ज्यामुळे इतर मसाले खराब होणार नाहीत. पावसाळ्यात मसाल्याचा डबा सारखा चेक करावा ज्यामुळे ते खराब झाले आहेत का हे तुम्हाला समजेल.
साठवणीसाठी असावेत हवाबंद डबे
पावसाळ्याआधी किचन स्वच्छ करताना तुम्ही साठवून ठेवत असलेले डबे अथवा स्टोअरेज कंटेनर चेक करा. धान्य,साखर, मसाले अथवा इतर खाण्याचे पदार्थ साठवण्यासाठी नेहमी हवाबंद कंटेनर्सच वापरा. ज्यामुळे तुमच्या किचनमधील साहित्य लवकर खराब होणार नाही. स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर
फ्रीजची स्वच्छता
पावसाळ्यात किचनची स्वच्छता राखताना प्रामुख्याने फ्रीज स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. यासाठी या काळात महिन्यातून एकदा फ्रीज स्वच्छ करा. फ्रीजमध्ये साठवलेले शिळे पदार्थ, भाज्या आणि फळे वेळेवर बाहेर काढा. कारण हे पदार्थ खराब झाल्यास त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवेलेले इतर पदार्थ संक्रमित होऊ शकतात. निरोगी आरोग्यासाठी फ्रीज वेळेवर स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स
इलेक्ट्रॉनिक वस्तू
आधुनिक युगात वेळ वाचवण्यासाठी स्वयंपाक घरात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक साधने वापरत असतो. मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, भाज्या धुण्याचे मशीन, डिश वॉशर, वॉटर प्युरिफायर, फूड प्रोसेसर, ओव्हन, मायक्रोव्हेव, एसी, फॅन अशा अनेक गोष्टी तुमच्या किचनमध्ये असू शकतात. मात्र लक्षात ठेवा पावसाळ्याआधी यासर्व वस्तू वीजेसोबत जोडणारी यंत्रणा सुरक्षित आहे का हे तपासणं गरजेचं आहे. कारण किचनमध्ये काम करत असताना चुकून तुमचा ओला हात या वस्तूंना लागल्यामुळे शॉक लागण्याची शक्यता वाढते. यासाठीच वेळीच किचन सुरक्षित करून घ्या.
फोटोसौजन्य – Pixels
अधिक वाचा –