ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
How To Keep Your Skin Moisturized In Air Conditioned Room in Marathi

एसीच्या अति वापरामुळे कोरडी झाली असेल त्वचा, तर करा हे उपाय

एअर कंडिशनर ही आजकाल एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. उन्हाळा असो वा कोणताही ऋतू, ऑफिस असो वा घर चोविस तास एसीमध्ये बसण्याची अनेकांना सवय असते. एसीशिवाय जगणं कठीण झालं असेल तर तुमच्या त्वचेवर याचे दुष्परिणाम दिसू शकतात. कारण जास्त वेळ एसीमध्ये राहिल्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. उन्हाळ्यात या त्वचेच्या समस्येला अनेकांना तोंड द्यावं लागतं. कारण उन्हाळ्यात जास्तीत जास्त वेळ एसी रूममध्ये काढला जातो. एसीचे आरोग्यावरही अनेक दुष्परिणाम होतात. मात्र त्वचेवर याचे परिणाम लगेच दिसू लागतात. यासाठी जाणून घ्या अशा कोरड्या झालेल्या त्वचेची निगा कशी राखावी. यासोबतच जाणून घ्या कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi), कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi), कोरड्या आणि शुष्क त्वचेसाठी होममेड मॉश्चराईझर (Best Moisturizer For Dry Skin In Marathi)

एसीमध्ये असताना अशी घ्या त्वचेची काळजी

वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे एसी रूममध्ये बसण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. मात्र असं असलं तरी काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखू शकता.

स्वतःला हायड्रेट ठेवा 

जर तुम्हाला एसीत राहण्याशिवाय पर्याय नसेल तर स्वतःला सतत हायड्रेट ठेवा. वास्तविक निरोगी राहण्यासाठी माणसाने दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पण एसीत बसल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यासाठीच सतत पाणी पिण्याची सवय स्वतःला लावा. पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही नारळपाणी, फळांचे रस देखील पिऊ शकता. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहिल.

त्वचा नियमित मॉइस्चराईझ करा

एसीमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ नये, यासाठी दररोज त्वचा मॉईस्चराईझ करायला विसरू नका. कामाच्या ठिकाणी डेस्कवर यासाठी तुम्ही तुमचं मॉईस्चराईझिंग लोशन ठेवू शकता. त्वचा कोरडी पडू नये यासाठी नैसर्गिक घटक असलेले मॉईस्चराझर वापरा. 

ADVERTISEMENT

मिस्टचा वापर करा

फेस मिस्ट वापरल्यामुळे तुमची त्वचा जास्त वेळ हायड्रेट राहते. ऑफिसमध्ये जाताना यासाठी बॅगेत फेस मिस्ट ठेवा. त्वचा कोरडी झाल्यास कुठेही तुम्ही मिस्ट स्प्रे वापरून त्वचा हायड्रेट करू शकता. मेकअप केल्यावर अथवा मॉईस्चराईझर, सनस्क्रीन लावल्यावरही तुम्ही मिस्ट वापरून त्वचेचा मऊपणा टिकवून ठेवू शकता. 

सौम्य फेश वॉश वापरा 

जर तुम्ही बराच काळ एसीमध्ये बसत असाल तर तुमची त्वचा जास्त कोरडी होण्याची शक्यता असते. यासाठी चेहरा धुताना नेहमी सौम्य फेस वॉश वापरा. कारण इतर फेस वॉशमुळे तुमच्या त्वचेवरील मऊपणा कमी होण्याची शक्यता असते. तसंच जास्त वेळा चेहरा वॉश करू नका. कारण त्यामुळेही तुमची त्वचा कोरडी पडू शकते. 

घरगुती उपाय करा

त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. कारण नैसर्गिक घटकांचा वापर केल्यामुळे त्वचेवर लगेच चांगला परिणाम होतो. यासाठी मध, नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, दही, केळं अशा घटकांपासून बनवलेले फेसपॅक अथवा उपाय चेहऱ्यावर करा. ज्यामुळे त्वचेचा मऊपणा कमी होणार नाही. यासाठी करा कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
31 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT