ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
अस्सल केशर कसे ओळखावे? जाणून घ्या

अस्सल केशर कसे ओळखावे? जाणून घ्या

श्रीखंड असो किंवा कोणताही गोड पदार्थ त्यावर केशराची काडी टाकली त्याला एक वेगळाच लुक येतो. भगव्या रंगाच्या केशराच्या काड्या या खूपच महाग असतात.अगदी तोळ्याच्या भावात त्या विकल्या जातात. बाजारात तुम्ही कधी केशर आणायला गेलात तर अगदी एवढीशी डबीसुद्धा खूप महाग पडते. प्रत्येक घरात गोडाधोडाचे पदार्थ करताना केशर ही असतेच. जगात वेगवेगळ्या ठिकाणी केशरची शेती केली जाते. ही केशर खरेदी करताना कधी कधी फसवणूकही होते. खूप वेळा केशरच्या बाबतीत झालेली फसवणूक तुम्हीही अनुभवली असेल.केशरची खरेदी करायचा विचार असेल तर अस्सल केशर कशी ओळखायची ते जाणून घेऊया.

सकाळच्या घाईत नाश्त्याला बनवा चविष्ट रव्याचे धिरडे, रवा चिला रेसिपी

केशरची शेती

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी केशरची शेती केली जाते. केशरचे फूल हे गोड जांभळ्या रंगाचे असते. त्याच्यामध्ये  केशराच्या दांड्या असतात. हे फुल जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला त्यामध्ये केशराच्या ओल्या काढा दिसतील या फुलाची शेती करुन एका ठराविक वेळी ही फुल काढली जातात आणि त्यामधून केशर काढले जाते. हे केशर वाळवले जाते. थंड प्रदेशात या फुलाची शेती केली जाते. आपल्याकडे काश्मीरमध्ये केशरची शेती केली जाते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक केशरची खरेदी अगदी हमखास करतात. 

चिकन खायची इच्छा होत असेल तर असे करा मस्त ग्रीन सुकं चिकन

ADVERTISEMENT

अस्सल केशर अशी ओळखा

केशर आणल्यानंतर ती चांगली आहे की नाही हे ओळखायचे असेल तर काही ठराविक गोष्टींनी तुम्ही केशर तपासू शकता. 

  • केशराचा रंग हा नेहमी छान केशरी रंगाचा असतो. जर तुम्ही एक- दोन केशराच्या काड्या हलक्या पाण्यात घातल्या तर त्याचा पिवळसर रंग पाण्याला येतो. असा रंग आला की, केशर खरी आहे समजावी. 
  • रंगाच्या बाबतीत हल्ली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही फुलांच्या काड्या घेऊन त्याला रंग लावला जातो. अशी परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही केशरची काडी जीभेवर ठेवा. तिचा रंग लगेच पसरतो शिवाय त्याचा एक झटका जीभेला लागतो. ही केशर खरी आहे असे समजावे.
  • केशरला एक वेगळाच उग्र वास असतो. ज्यावेळी तुम्ही सोविनयर शॉपमधून त्याची खरेदी करता त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट अगदी नक्कीच जाणवेल. 

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

केशरचे फायदे

 केशरचे फायदे भरपूर आहेत. केवळ खाद्यपदार्थांना रॉयल लुक आणण्यासाठीच नाही तर त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो.  अनेक सौंदर्यप्रसाधानात केशराचा उपयोग केला जातो. केशरमध्ये अँटी- एजिंग आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा आणि आरोग्यासाठी ते फारच लाभदायी ठरते. 

आता या पुढे कधीही केशरच खरेदी करायला जाणार असाल तर या काही गोष्टींचा विचार नक्की करा. 

ADVERTISEMENT
26 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT