Advertisement

Mental Health

तणावग्रस्त आहोत हे कसे घ्याल समजून, काय आहेत कारणे

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 15, 2021
तणावग्रस्त आहोत हे कसे घ्याल समजून, काय आहेत कारणे

सध्याच्या धावपळ आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अनेकांचा तणाव वाढत चालला आहे. सद्यपरिस्थितीत कोविड काळ, नोकरीचा ताण, घरातील ताण या सगळ्यात माणसांना खूपच त्रास होतो आहे. पण आपण नक्की तणावग्रस्त आहोत हे कसे ओळखायचे? कारण आपल्याला काही त्रास होतो आहे हे मानणेच मुळात काही माणसांना अवघड वाटते. पण या सगळ्याची नक्की कारणे काय आहेत आणि आपण तणावग्रस्त आहोत हे कसं काय समजून घ्यायचं याबाबत आम्ही डॉ. आशिष गोसर, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याशी चर्चा केली आणि जाणून घेतलं. तुम्हालाही असा काही त्रास होत असेल तर तुम्ही हा लेख वाचणे अत्यंत गरजेचे आहे. पण त्याआधी स्ट्रोक आणि स्ट्रेस म्हणजे नक्की काय आणि त्याची कारणे काय आणि केस ओळखायचे हे सर्व जाणून घेऊ. स्ट्रोक हे अपंगत्व आणि मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे.  स्ट्रेस हा स्ट्रोकसाठी अग्रगण्य सुधारित जोखीम घटकांपैकी एक देखील आहे. जे रुग्ण स्ट्रेस्ड अर्थात तणावग्रस्त असतात, त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका अधिक असल्याचे अभ्यासात आढळले आहे.

आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

तणावामुळे नक्की काय होते

तणावामुळे नक्की काय होते

Freepik (How to know you are stressed)

  • तणावामुळे रक्तदाब (Blood Pressure), ब्लड शुगर (Diabetes) आणि धूम्रपान (Smoking habit) वाढते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकारासारख्या घटनांचा धोका वाढतो
  • तणावामुळे मेंदूमधील अ‍ॅमीगडाला (amygdala) अतिरिक्त व्हाईट ब्लड सेल्स (White Blood Cells) तयार करण्यासाठी बोन मॅरोला सूचित करते. यामुळे आर्टेरीमध्ये (artery) जळजळ होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका आणखी वाढतो.
  • अ‍ॅमीगडाला फाईट किंवा फ्लाईटसाठी अड्रेनलाईनद्वारे शरीराला तयार करण्यासाठी हायपोथलेमसला संकेत देखील देते. यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते आणि स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढतो.

बर्‍याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की ज्या लोकांना तणाव आहे, अशा लोकांना स्ट्रोकचा 4 ते 5 पट अधिक धोका असतो. सर्व प्रकारचे स्ट्रोक इस्केमिक आणि हेमोर्रेजीक तणावग्रस्त लोकांमध्ये आढळतात, ज्यामध्ये 80% इस्केमिक असतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि डिस्लिपिडेमिया यासारख्या इतर घटकांसह हा एक महत्त्वाचा सुधारित जोखीम घटक आहे. तणावाची पातळी कमी झाली तर मधुमेह, रक्तदाब आणि लिपिडच्या पातळीवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

कोरोनाच्या काळात तणावमुक्त राहण्यासाठी करा हे सोपे उपाय

मी तणावग्रस्त आहे हे मला कसे कळेल?

तणावामुळे डोकेदुखी, छातीत दुखणे, स्नायू दुखणे, शरीर दुखणे, मळमळ आणि सहज थकवा येणे यासारख्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला झोपण्यात अडचणदेखील जाणवू शकते. यामुळे चिडचिडेपणा, उदासीनता किंवा राग वाढतो. तसेच लक्ष केंद्रित करण्यास किंवा प्रेरित राहण्यास असमर्थता वाटते. याचबरोबर भूकेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सुद्धा होतो. भूक लागणे कमी तरी होते अथवा भूक वाढते तरी.  तणावग्रस्त लोक इतरांपासून लांब राहतात. अशा लोकांना बहुतेकदा परस्पर संबंध टिकवून ठेवण्यात अडचणी येतात.

एकूणच स्ट्रेस शरीराच्या प्रत्येक सिस्टम जसे कार्डिओ वास्क्युलर सिस्टम, नर्व्हस सिस्टम, रिप्रॉडक्टिव्ह सिस्टम, एंडोक्राईन सिस्टम, इत्यादीवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. एखादा व्यक्ती जेव्हा तणावाखाली असते, तेव्हा त्याला इतरांची मदत घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे, जेणेकरून त्याचे प्रभावी व्यवस्थापन केले जाऊ शकते आणि तणावामुळे होणाऱ्या बर्‍याच आजारांना रोखताही येऊ शकते.

अधिक वाचा – तुम्ही तणावाखाली तर नाही ना… जाणून घ्या नैराश्य लक्षणे (Depression Symptoms In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक