ADVERTISEMENT
home / Natural Care
महिन्याभरात मांड्यामधील काळेपणा असा करता येईल दूर

महिन्याभरात मांड्यामधील काळेपणा असा करता येईल दूर

मांड्या कितीही आकर्षक असल्या तरी मांड्यांमधील आतला भाग अर्थात Inner Thigh ही जागा अनेकांची काळवंडलेली असते. मांड्यामधील हा काळेपणा कोणालाही आवडत नाही. शरीर कितीही नितळ असले तरी देखील मांड्याकडील भाग हा अधिक काळवंडलेला आणि पिग्मेंट असलेला दिसतो. हे पिग्मेंट दोन मांड्यांमध्यो अधिक दिसू लागले की, शॉर्ट्स किंवा तत्सम कपडे घालायला नकोसे होते. पण हा मांड्यांमधील काळेपणा नेमका दूर करायचा कसा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने काळजी घेत तुम्ही मांड्यांमधील काळेपणा कमी करु शकता.

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

अॅलोवेरा आणि हळद

हळदीचा उपयोग

Instagram

ADVERTISEMENT

अॅलोवेरा जेल आणि हळद ही त्वचेवरील पिग्मेंट आणि काळे डाग हळुहळू कमी करण्यासाठी मदत करते.  आठवड्यातून तीन दिवस तुम्ही मांड्यांवर याचा प्रयोग करु शकता. अॅलोवेरा जेल त्वचेवरील जळजळ कमी करते तर हळद त्वचा उजळवण्याचे काम करते. 

असा करा वापर : एका भांड्यात अॅलोवेरा जेल  एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घ्या. व्यवस्थित एकत्र करुन ती मांड्याच्या आतल्या बाजूने लावा. तुम्हाला मांड्या जिथे काळ्या वाटतात तिथे तुम्ही हा पॅक लावून ठेवा. वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हळदीचा वापर केल्यामुळे त्याचे डाग शरीरावर काही काळासाठी दिसतील पण काहीच हरकत नाही. दोन- तीन धुण्यामध्ये ते नक्कीच निघून जातील. 

सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया

कॉफी स्क्रब

कॉफी स्क्रब

ADVERTISEMENT

Instagram

कॉफी स्क्रबचे वेगवेगळे प्रकार हल्ली बाजारात मिळतात. त्याचे अनेक फायदे आहेत. पण स्क्रबचा पहिला उपयोग हा तुमची त्वचा एक्सफोलिएट करणे असते. त्यामुळे तुम्ही याचाही मांड्यावर उपयोग करु शकता. तुम्ही जर रेडिमेड कॉफी स्क्रब वापरत असाल तर तुम्हाला काही वेगळे करण्याची गरज नाही. तुम्ही तो स्क्रब आहे तसा वापरु शकता. 

आठवड्यातून एकदा तरी कॉफी स्क्रबचा उपयोग करा. त्यानंतर तुम्ही मांड्यांना मॉश्चरायझर लावायला विसरु नका. 

बदामाचे तेल

बदामाचे तेल

ADVERTISEMENT

Instagram

बदामाचे तेल हे त्वचेसाठी खूपच चांगले असते. बदामाचे तेल तुम्ही मांड्यावर दररोज रात्री चोळा. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन E तुमच्या त्वचेवर चांगले काम करते. बदामाचे तेल त्वचेवर लावल्यामुळे मांड्यावरील सेल्युलाईटही कमी होण्यास मदत मिळते.  रात्री झोपताना तुम्ही  बदामाचे तेल लावायला विसरु नका.बदामाचे तेल लावत तुम्ही थोडा मसाज करायला विसरु नका. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते.

AHA असलेले मॉश्चरायझर

AHA असलेले मॉश्चरायझर

Instagram

ADVERTISEMENT

मॉश्चरायझर हे त्वचेसाठी फारच चांगले असते. मांड्यामधील त्वचा ही सूर्य किरण मिळत नसल्यामुळे कोरडी पडते. तुमची त्वचाही अशी कोरडी पडली असेल तर तुमच्या काळवंडलेल्या त्वचेामागे कोरडी त्वचा हे देखील हे कारण असू शकते. त्यामुळे दररोज आंघोळ केल्यानंतर मांड्याच्या आतल्या भागामध्ये AHA असलेले मॉश्चरायझर लावा. 


आता किमान महिनाभर तुम्ही या काही गोष्टी करुन पाहा म्हणजे तुम्हाला तुमच्या मांड्यामध्ये झालेला फरक दिसेल.

म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय (How To Whiten Vaginal Area In Marathi)

01 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT