जाड दिसायला कोणालाच आवडत नाही. पण ड्रेसमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी शरीर एका दिवसात कमी जास्त करता येत नाही.बारीक होता आलं तरी देखील काहींची शरीरयष्टी ही काहीही केल्या बदलता येत नाही. आता हातांचे दंडच घ्या ना! काही जणांचे शरीर बारीक असले तरी देखील दंड हे जाडजूड असतात.अशा व्यक्तींना स्लिव्हलेस घालायची फारच लाज वाटते. कारण असे कपडे घातल्यानंतर फोटोत काहीही नसताना जाड दिसायला होते. तुमचेही दंड असेच जाड आहेत आणि स्लिव्हलेस तुम्हाला घालायचेच असेल तर अशा कपड्यांची स्टाईलिंग नेमकी कशी करावी ते जाणून घेऊया.
ब्रेस्ट साईज असेल मोठी तर टाळा ‘ब्रा’संदर्भातील या चुका
बारीक पट्ट्या
स्लिव्हलेसमध्येही अनेक प्रकार आहेत. काही स्लिव्हलेस ड्रेसच्या पट्ट्या या फारच बारीक असतात. असे ड्रेस स्टायलिश आणि फॅन्सी दिसतात. पण जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर अशा बारीक पट्ट्यांमुळे हात जास्त जाड दिसतात. जर तुम्हाला अशा बारीक पट्ट्यांचे ब्लाऊज घालायचेच असतील तर तुम्ही गळा मोठा करुन पट्ट्या या खांद्याच्या कोपऱ्याकडे आणा. त्यामुळे तुमचे खांदे आणि तेथील भाग जास्त दिसत नाही. दंडाचा भाग खूप जाड दिसत नाही. त्यामुळे बारीक पट्ट्यांचा ब्लाऊज घालताना ही काळजी घ्या.
रफल साडीचा ट्रेंड तुम्हालाही करायचा आहे का फॉलो, जाणून घ्या
फिटिंग हवी परफेक्ट
खूप जणांचा फिटिंगचा फारच गोंधळ असतो. पण स्लिव्हलेस ड्रेसच्या बाबतीत अशी चूक करुन चालत नाही. कारण अशा ड्रेसची खांद्याकडील फिटिंग ही नेहमी परफेक्टच असायला हवी. जर ही फिटिंग परफेक्ट असेल तर ड्रेस अधिक चांगला उठून दिसतो. एखादा रेडिमेड ड्रेस आणल्यानंतर बरेचदा त्याचे हात फार सैल असतात किंवा खांद्याच्या खाली येतात. असा ड्रेस तुम्ही अल्टर न करता घातला तर तो चांगला दिसत नाही. त्यामुळे तुमचा हात जाड असल्यासारखे वाटते. त्यामुळे काख आणि खांदा याची फिटिंग अगदी व्यवस्थित हवी.
बाजूबंद टाळा
खूप जणांना बाजूबंद घालायलाही फार आवडतात. पण बाजूबंद घातल्यानंतर हात अधिक जाड दिसतात. जर बाजूबंद फारच घट्ट असेल तर तो अधिकच दंडामध्ये रुतल्यासारखा दिसतो. त्यामुळे शक्य असेल तर बाजूबंद नावाचा प्रकार टाळा. तो स्लिव्हलेस ड्रेसवर घालू नका. त्यापेक्षा ज्यांना बाह्या असतील अशा ड्रेसवर तुम्ही बाजूबंद घालण्यास काहीच हरकत नाही. दंडाशी निगडीत कोणत्याही ज्वेलरी स्लिव्हलेस ड्रेसवर घालणे टाळा.
जाड दिसायचे नसेल तर अशी असावी कपड्यांची फिटिंग
ओढणीचा करा वापर
काही केल्या दंड हे जाड आहेत आणि ते वरील कोणत्याही टिप्समुळे बारीक किंवा सुडौल दिसत नसतील तर तुम्ही ओढणीचा वापर करा. एका खांद्यावर ओढणी सोडून तुम्हाला असे ड्रेस किंवा साडी असल्यास तसा पदर सोडूनही स्टाईल करता येऊ शकते. पदर किंवा ओढणी अशी घेतल्यामुळे तुम्ही त्यामध्ये बारीक दिसता. शिवाय तुमचे खांदे आणि दंड अधिक चांगले दिसतात.
आता अशा पद्धतीने स्लिव्हलेस ड्रेस घातल्यानंतर काही गोष्टी विचारात घेऊन थोडी स्टायलिंग केली तर तुमचा हात जास्त जाड दिसणार नाही.
bra size a b c d means in hindi