दात दुखी दूर करण्यासाठी, कानातील ठणका थांबवण्यासाठी, ताप अथवा सर्दी बरी करण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी, एजिंगच्या खुणा विरळ करण्यासाठी लवंग तेल हमखास वापरलं जातं. कारण लवंग तेल वापरणं हा एक सोपा आणि घरगुती उपाय असतो. लवंग हा एक भारतीय मसाला असल्यामुळे लवंगचा वापर स्वयंपाकातही मोठ्या प्रमाणावर होतो. लवंग खाण्याचे फायदे अनेक असल्यामुळे कधी ना कधी तरी लवंगची चव प्रत्येकाने चाखलेली असते. आरोग्य समस्या दूर करण्यासाठी बऱ्याचदा लवंग अथवा लवंग तेल तोंडांवाटे पोटात जाऊ शकतं. मात्र लवंग खाण्यास योग्य असल्यामुळे लवंग तेलाचे दुष्परिणाम होत नाही. विशेष म्हणजे यासाठी लवंग तेल तुम्ही स्वतःच घरी बनवू शकता. जाणून घ्या लवंग तेलाचे फायदे आणि बनवण्याची पद्धत
लवंग तेलाचे फायदे
लवंग तेलामध्ये जीवजंतू नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हे तेल वापरून एखादे इनफेक्शन घरच्या घरी कमी करता येते. या तेलामध्ये अॅंटी फंगल, अॅंटि व्हायरल आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. चवीला आणि सुंगधाला थोडं उग्र असलं तरी त्याचे फायदे मात्र अफलातून असतात. लवंग तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यातून दातावर ठेवल्यास दातदुखी काही काळ नक्कीच थांबते. कानाला थंडीतून येणारा ठणका कमी करण्यासाठी कानात तुम्ही लवंग तेल टाकू शकता. सौंदर्य खुलवण्यासाठी, पिपल्स कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या अथवा एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी त्वचेवर तुम्हाला लवंग तेल लावता येतं. पोटाचे आजार कमी करण्यासाठी, अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी अथवा अस्थमाच्या आजारावर तुम्ही पोटातून पाण्यासोबत अथवा अन्नपदार्थांमधून लवंग तेल घेऊ शकता. सर्दी, खोकला, ताप असे इनफेक्शन लवंग तेलाने दूर जातात. डोकेदुखी कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी केसांमध्ये लवंग तेल वापरले जाते. यासाठी जाणून घ्या आणखी काही लवंग तेलाचे फायदे.
लवंग तेल घरी बनवण्याची सोपी पद्धत
लवंग तेल घरी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लागतील ज्या तुम्हाला घरात सहज मिळतील.
साहित्य –
- 100 ग्रॅम लवंग
- 1 कप नारळाचे तेल (ऑलिव्ह ऑईल अथवा बदामाचे तेलही तुम्ही वापरू शकता)
- एक काचेची बाटली
लवंग तेल बनवण्याची पद्धत –
- सर्वात आधी लवंग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- काचेच्या बाटलीत हे मिश्रण गाळून टाका.
- बाटलीत वरून इतर तेल मिसळा.
- बाटलीचे झाकण बंद करून एक ते दोन आठवडे सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ठेवून द्या.
- वापरण्यापूर्वी लवंग तेल गाळून घ्या.
लवंग तेलाचा वापर कसा करावा –
रात्री झोपताना तुम्ही लवंग तेल केस अथवा त्वचेवर लावू शकता. मात्र लक्षात ठेवा लवंग तेल वापरण्यापूर्वी ते तेल, क्रीम अथवा सीरममध्ये डायल्यूट करा. दातावर, कानात तेल लावण्यापूर्वी ते नारळाच्या तेलात मिसळा. लवंग तेलात अॅंटि स्ट्रेस गुणधर्म असल्यामुळे ते हाताला अथवा पायाला चोळल्यास रात्री छान झोप लागते. पोटात औषध स्वरूपात घेताना ते गरम पाण्यात अथवा अन्नपदार्थात मिसळून खा.