ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
eyebrow threading

आयब्रो करताना थ्रेडिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी सोप्या टिप्स

आयब्रो (eyebrow threading) करणे हा प्रत्येक मुलीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. सर्व मुलींना आपले आयब्रो दाट आणि सुंदर ठेवायला आवडतात. पण आयब्रो थ्रेडिंग करताना होणाऱ्या वेदना आणि त्रास कोणालाच नको असतो. कारण यावेळी काही जणींच्या अगदी डोळ्यातून पाणी येण्याइतकेही दुखते. पण तुम्हाला या त्रासापासून सुटका हवी असेल तर आम्ही काही सोप्या टिप्स या लेखातून सांगत आहोत. आयब्रो थ्रेडिंग जास्त महिला करतात. आपले सौंदर्य अधिक खुलून यावे यासाठी आपण आयब्रोजना योग्य आकार थ्रेडिंग करून देतो. पण थ्रेडिंगची प्रकिया ही नक्कीच त्रासदायक असते. काही जणींना तर यानंतर पिंपल्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. थ्रेडिंगच्या सहाय्याने भुवयांना अधिक चांगला आकार देता येतो. ही आतापर्यंतची उत्तम प्रक्रिया मानली जाते. पण तरीही ही प्रक्रिया चालू असताना होणारा त्रास हा नक्कीच वाईट आहे. पण तुम्ही काही टिप्सचा वापर करून हा त्रास नक्कीच करून घेऊ शकता. जाणून घेऊया. 

बर्फाचा वापर

use of ice
use of ice – freepik

अधिक थंड तापमानाचा वापर केल्यास, केसांमधील मजबूती कमी होते आणि त्वचा सुन्न होते. जेव्हा तुम्ही आयब्रोज थ्रेडिंग करता तेव्हा तुम्ही आयब्रोच्या अर्थात भुवयांच्या आसपासच्या बाजूला बर्फाच्या तुकड्याने रगडून घ्या अथवा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. बर्फाचा वापर केल्यास अथवा थंड पाण्याने आपला चेहरा व्यवस्थित धुऊन घेतल्यास, थ्रेडिंगचा त्रास कमी होतो. तसंच भुवईचे केस पटकन निघण्यास मदत मिळते. 

च्युईंगम चघळत राहा 

आयब्रो करताना जर त्रासापासून वाचायचं असेल तर हा एक मजेशीर असा उपाय आहे. तुम्ही आयब्रो थ्रेडिंग करत असताना च्युईंगम चघळत राहा. तुम्ही थ्रेडिंग चालू असताना जर जलद गतीने च्युईंगम चावत राहिलात तर तुम्हाला थ्रेडिंगचा त्रास कमी होतो आणि थ्रेडिंगची प्रक्रिया अधिक सोपी होते. ही प्रक्रिया तुम्ही नक्की करून पाहा. ही प्रक्रिया वाचताना तुम्हाला नक्कीच थोडी विचित्र वाटेल पण यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होतो. 

टाल्कम पावडरचा करा वापर 

talcum-powder
talcum powder use while threading eyebrows – Freepik

आपण जेव्हा थ्रेडिंग करायला जातो तेव्हा अर्थात सर्वच सलॉनमध्ये टाल्कम पावडरचा सर्रास वापर केला जातो. पण बऱ्याचदा या टाल्कम पावडरचा उपयोग योग्य तऱ्हेने केला जात नाही. त्यामुळे तुम्ही टाल्कम पावडर तुमच्या भुवयांच्या आसपासच्या भागात व्यवस्थित लागली आहे की नाही हे आधी तपासून पाहा. तसंच भुवया कोरण्याआधी तुम्ही ही टाल्कम पावडर आसपासच्या भागात व्यवस्थित रगडून घ्या जेणेकरून कपाळावरील तेल आणि दमटपणा हा निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा खेचली जाणार नाही. तुमच्या कपाळावरील भाग जेव्हा सुका असतो तेव्हा थ्रेडिंग अधिक चांगल्या तऱ्हेने आणि कमी त्रासामध्ये होते. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स

भुवईचा भाग जोरात रगडा 

तुम्ही भुवई कोरण्याची प्रक्रिया करताना अधिक त्रासाला सामोरे जात असाल तर तुम्ही भुवईचा भाग आयब्रो करण्याआधी जोरात रगडा. जोरात त्वचा रगडल्यामुळे त्वचा अधिक उत्तेजित होते आणि त्यातील तेल आणि दमटपणा निघून जाण्यास मदत होते. तसंच प्रयत्न करा की, त्वचा रगडल्यानंतर त्वरीत तुम्ही थ्रेडिंग करून घ्याल. जेणेकरून त्याचा परिणाम राहून तुम्हाला थ्रेडिंग करताना जास्त दुखणार नाही. 

अधिक वाचा – आयब्रोजचा असा मेकअप केला तर चेहरा दिसेल आकर्षक

कोरफडची जेल लावा 

Aloe Vera Uses For Face In Marathi
aloe vera gel use

तुम्हाला आयब्रो थ्रेडिंग करून झाल्यानंतर जर आजूबाजूच्या भागावर जळजळ होत असेल तर तुम्ही ही जळजळ थांबविण्यासाठी ताज्या कोरफड जेलचा वापर करावा. थ्रेडिंगनंतर त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – आयब्रो स्लिट्सचा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे स्टाईल

भुवईचे केस अधिक वाढण्याची वाट पाहू नका 

काही महिला पाच ते सहा महिने थ्रेडिंग करत नाहीत. असं अजिबात करू नका. जितके केस अधिक वाढतील तितका त्रास अधिक होईल. त्यामुळे आयब्रो थ्रेडिंग करताना भुवईच्या केसांची अधिक वाढ होण्याआधीच तुम्ही करून घ्या. जेणेकरून आयब्रो थ्रेडिंग करताना कमी त्रास होईल. 

वरील टिप्स तुम्ही नक्की करून पाहा आणि आयब्रो थ्रेडिंग करताना होणाऱ्या त्रासापासून स्वतःला वाचवा. तुम्ही तुमच्या सौंदर्यात आयब्रोजना योग्य आकार देऊन अधिक भर घालू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT