ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how to make eyebrows at home in marathi

घरीच कसे करावे स्वतःचे आयब्रोज, जाणून घ्या सोपी युक्ती

आयब्रोज जाड आणि कोरीव असतील तर चेहरा अधिक आकर्षक दिसतो. यासाठी अनेकींना आयब्रोज करण्याची सवय असते.  एक्स्ट्रा वाढलेल्या भुवयांचे केस काढून तुम्ही तुमच्या आयब्रोजला परफेक्ट शेप देता. पण यासाठी दर पंधरा दिवसांनी तुम्हाला पार्लरमध्ये जावं लागतं. त्यामुळे जर तुम्ही घरीच तुमच्या आयब्रोज करू शकला तर तुमचा फक्त याच कारणासाठी पार्लरमध्ये जाण्याचा वेळ वाचेल. शिवाय मागील दोन वर्षात कोरोनामुळे घरात आयब्रोज करता येण्याची गरज प्रत्येकाला वाटू लागली आहे. यासाठी जाणून घ्या घरच्या घरी तुम्ही आयब्रोज कशा करू शकता.

घरी आयब्रोज करण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर

घरात स्वतःचे आयब्रोज करणं अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला यासाठी आत्मविश्वास हवा आणि हवं काही साहित्य 

आयब्रोज करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • प्लकर
  • मोठा आणि छोटा आरसा
  • आयब्रो पेन्सिल
  • आयब्रो ब्रश

आयब्रोज करण्यासाठी कशी कराल सुरूवात

  • बऱ्याचजणींच्या आयब्रोज या जाड आणि दाट असतात. जर तुम्ही बरेच दिवस पार्लरमध्ये आयब्रोज केले नसतील तर तुमच्या आयब्रोजला शेप देणं थोडं कठीण जाऊ शकतं. पण तुम्ही एक सोपी युक्ती वापरून आयब्रोजला सुरूवात करू शकता. यासाठी आयब्रो पेन्सिल घ्या आणि तुमच्या नाकाच्या मध्यभागी कपाळावर एक चिन्ह करा. त्याचप्रमाणे तुमच्या आयब्रोजच्या कडांवर काही चिन्ह करत तुमच्या आयब्रोजचा आकार तयार करा. आयब्रोजची अशी राखा निगा, फक्त थ्रेडिंग करणं पुरसं नाही
  • जर तुम्ही संपूर्ण भुवयीला कडांवर चिन्ह तयार केले तर तुम्हाला तुमच्या आयब्रोजचा परफेक्ट आकार लक्षात येईल. तुमचा नॅचरल शेप खराब होऊ नये यासाठी आयब्रोजच्या नॅचरल शेपला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.
  • प्लकरच्या मदतीने या चिन्हांच्या बाहेर असलेले केस उपटून काढा. सुरुवात कपाळावरील नको असलेल्या केसांपासून करा. 
  • पहिलाच प्रयत्न करत असाल तर उगाच जास्त केस काढू नका. फक्त नको असलेले जास्तीचे केस काढून टाका. ज्यामुळे शेप खराब होणार नाहीच शिवाय तुमचा चेहरा फ्रेशही दिसेल. आयब्रोजनंतर तुम्हालाही येतात का पिंपल्स
  • जर तुमचे केस फार दाट आणि जाड असतील तर ते उपटताना तुम्हाला वेदना होऊ शकतात. यासाठी प्लकर वापरण्याआधी बर्फाने त्वचा शेकवा. ज्यामुळे तो भाग बधीर होईल आणि केस काढणं सोपं जाईल.
  • केसांची लांबी जास्त हवी असेल तर आधी आयब्रोजवर जेल लावा. आणि तुमच्या आयब्रोजला एक परफेक्ट शेप द्या. त्यानंतर जास्तीचे केस काढून टाका. सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी – Eyebrow Shaping Tips In Marathi

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

ADVERTISEMENT
08 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT