ADVERTISEMENT
home / रेसिपी
द्राक्षांची चटणी

तुम्ही कधी ट्राय केली आहे का द्राक्षांची चटणी, नक्की करा ट्राय

 द्राक्षांचा सीझन आला की घरात बरीच द्राक्षे आणली जातात. तुम्हालाही द्राक्ष खायला आवडत असतील. पण तुम्ही आंबट द्राक्षे आणली असतील तर त्याचे काय करायचे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अशावेळी ती द्राक्षे फेकून न देता तुम्ही त्यापासून मस्त चटणी करु शकता. हे तुम्हाला माहीत आहे का? द्राक्षांची चटणी ही एकदम मस्त आंबट- गोड लागते. साधा डाळ किंवा पोळीसोबत ही चटणी इतकी चविष्ट लागते की, तुम्ही पुन्हा पुन्हा ती खाण्याची इच्छआ व्यक्त कराल. चला जाणून घेऊया घरच्या घरी ही चटणी कशी बनवायची ते.

डोशासह बनवा स्वादिष्ट शेंगदाणा आणि दही चटणी, लागेल अधिक चविष्ट

द्राक्षांची चटणी

द्राक्षांची चटणी

साहित्य:  वाटीभर द्राक्ष, खोबरं, मिरच्या, कोथिंबीर,लसूण, मीठ 

कृती :
द्राक्ष चांगली स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो खराब आणि पचपचीत झालेली द्राक्षे अजिबात घेऊ नका.
खोबरं छान खवून घ्या. तुम्ही ज्या प्रमाणे खोबऱ्याची चटणी करता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला ही चटणी करताना त्याचे सामान घ्यायचे आहे.
द्राक्ष मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, मिरच्या, कोथिंबीर, लसणीच्या पाकळ्या आणि मीठ घालून त्याची चटणी वाटून घ्यायची आहे. ही चटणी चवीला मस्त आबंट- गोड लागते. ही चटणी तुम्हाला मस्त गरम गरम डाळ- भातासोबत खाता येते. काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर अशावेळी तुम्ही द्राक्षांची चटणी नक्कीच खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

द्राक्ष निवडताना

द्राक्ष निवडताना ती नेहमी लांब असायला हवीत. ती लांब आणि थोडी पिवळसर रंगाची असेल तर ती द्राक्ष गोड असतात. त्यामुळे कोणतीही द्राक्ष घेऊ नका. गोड असलेली अशी द्राक्ष तुम्ही निवडली तर ती नेहमीच चांगली असतात. द्राक्ष चांगली निवडलेली असतील तर ती चवीला छान गोड लागतात. द्राक्ष जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे ती लवकरात लवकर खाणे कधीही चांगले. कारण द्राक्ष जशी जुनी होऊ लागतात. तसा त्यांना एक वेगळाच वास सुटतो जो अजिबात चांगला नाही. त्याची चव फारच खराब होते.

द्राक्ष खाण्याचे फायदे

द्राक्ष ही हिरवी आणि काळी अशी दोन्ही असतात. ही दोन्ही द्राक्षे आरोग्यासाठी फारच फायद्याची असतात. द्राक्षांमध्ये ग्लुकोज,मॅग्नेशिअम असे काही घटक असतात. जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. 

टीबी, कर्करोग अशा आजारांमध्ये द्राक्ष खाणे ही फायद्याची ठरतात.

द्राक्षांमध्ये रक्ताची कमतरता भरुन काढणारे घटक असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्यन देखील मिळते. द्राक्षांचा रस प्यायल्याने देखील त्याचा फायदा होण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

आता तुम्ही देखील नक्की ट्राय करुन बघा. द्राक्षांची चटणी

उन्हाळ्यात खाताय जांभूळ, मग जाणून घ्या फायदे

11 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT