ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
homemade cheek tint

हे नैसर्गिक पदार्थ वापरून घरातच बनवा Lip आणि Cheek Tint

आपल्या गालावर लालसर गुलाबी लाली आणि नैसर्गिक गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात.गुलाबी गाल महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. म्हणून तर आपण मेकअप करताना ब्लश वापरतो. बहुतेक स्त्रियांना गाल नैसर्गिकरित्या गुलाबी दिसावे अशी इच्छा असते. गुलाबी गाल केवळ चेहेऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर त्यामुळे त्वचाही तरुण दिसते. 

Cheek Tint
Cheek Tint

गाल गुलाबी दिसण्यासाठी आपण मेकअप करताना ब्लश लावतो.पण बाजारात उपलब्ध असलेले ब्लश हे रासायनिक पदार्थांनी बनलेले असतात त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. कारण आपल्या चेहेऱ्याची त्वचा ही जास्त नाजूक असते. जर तुम्हाला त्वचेवर रासायनिक पदार्थ लावायचे नसतील आणि गाल नैसर्गिकरित्या  गुलाबी दिसावेत असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही घरीच नैसर्गिक पदार्थांनी बनवलेले चीक टिंट वापरू शकता. घरीच लीप आणि चीक टिंट बनवणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त वेळही घालवावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्या घरीच टिंट कसे बनवायचे. 

बीटरूट टिंट

Homemade Cheek Tint
Homemade Cheek Tint

बीटरूट्समध्ये बेटानिन्स असतात त्यामुळे त्यांचा नैसर्गिक रंग गुलाबी असतो. बीटरूटचा नैसर्गिक रंग खूप सुंदर असतो आणि बीटरूटमध्ये त्वचेसाठी फायदेशीर अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे बीटरूट वापरून आपण घरच्या घरी टिंट बनवू शकतो. ताज्या बीटरूटचा रस थोड्या ग्लिसरीनमध्ये मिसळा आणि त्यात एक चमचा पाणी मिसळा. हे मिश्रण एका काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा आणि दोन-तीन तास थंड करा. तुमचे नैसर्गिक बीटरूट टिंट तयार आहे. तुम्ही हे टिंट तुमच्या गालांवर व ओठांवरही लावू शकता. यात ग्लिसरीन असल्यामुळे तुमची त्वचा मऊ राहण्यात मदत होईल. 

पोमोग्रॅनेट टिंट

Homemade Cheek Tint
Homemade Cheek Tint

डाळिंब जसे पोटासाठी चांगले आहे तसेच ते त्वचेसाठीही फायदेशीर आहे. डाळिंबाचाही नैसर्गिक गुलाबी रंग तुमच्या गालावर सुंदर गुलाबी टिंट देऊ शकेल.हा नैसर्गिक लाल-गुलाबी  रंग तुमच्या ओठांवर अगदी अप्रतिम दिसेल. प्रथम डाळिंबापासून टिंट बनवायचे असेल तर डाळींबाचे ताजे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचा रस काढून घ्या. मग त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि त्यांची घट्ट पेस्ट तयार होईपर्यंत मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण एका हवाबंद डबीत ठेवा आणि दररोज वापरा. फक्त यात आपण टिकण्यासाठी काही प्रिझर्व्हेटिव्ह किंवा रसायने वापरत नसल्याने ते खराब होणार नाही याची काळजी घ्या आणि हे टिंट शक्यतोवर फ्रिजमध्येच ठेवा. 

ADVERTISEMENT

रोझ अँड आमंड टिंट

Homemade Cheek Tint
Homemade Cheek Tint

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए  असते जे तुमची त्वचा मऊ आणि मॉश्चराइज्ड ठेवेल. आणि गुलाबी रंगाचा गुलाब एक मनमोहक सुगंध व सुंदर रंग देईल. हे टिंट बनवण्यासाठी दोन चमचे अस्सल बदामाचे तेल घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळा. गुलाबी रंगाच्या किंवा लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्यांची पूड करून घ्या. ही एक टेबलस्पून पूड बदामाचे तेल व पाण्याच्या मिश्रणात घालून ढवळून घ्या. तुमचे ऑरगॅनिक रोझ अँड आमंड टिंट तयार आहे. 

नैसर्गिक फूड कलर टिंट

तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फूड कलर वापरून टिंट बनवणे होय. यासाठी तुम्हाला लाल फूड कलर, बदाम तेल, पाणी हे साहित्य लागेल. टिंट बनवण्यासाठी एका लहान भांड्यात एक चमचे पाणी आणि बदामाचे तेल घाला. आता त्यात रेड फूड कलरचे दोन -तीन थेंब टाका. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून त्यांची घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण छोट्या डबीत भरून साधारण दोन  तास फ्रीजमध्ये ठेवा. तुमचे होममेड चीक टिंट तयार आहे. हे टिंट फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही ते दीर्घकाळ वापरू शकता. तुम्हाला जी शेड हवी असेल त्यानुसार तुम्ही फूड कलरचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. 

अशा प्रकारे तुम्ही घरीच जास्वंदाची फुले, गुलाबाची फुले वापरून ऑरगॅनिक लीप आणि चीक टिंट बनवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
30 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT