फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये सतत नवनवीन ट्रेंड येत असतात. सध्या असलेल्या लोशन बारच्या ट्रेंडविषयी तुम्हाला माहीत असेलच. त्वचेसाठी साबण वापरावा की नाही या संभ्रमात तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी लोशन बार नक्कीच वापरू शकता. शिवाय तुम्हाला बाहेरून केमिकलयुक्त लोशन बार विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही नैसर्गिक पद्धतीने घरीच हे लोशन बार तयार करू शकता. तज्ञ्जांच्या मते अंघोळ केल्यावर त्वचेवर लोशन बार लावण्यामुळे तुमच्या त्वचेला चांगला फायदा मिळतो. तुम्ही झोपण्याआधी देखील त्वचेवर लोशन बार लावू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. लोशन बार हे त्वचेसाठी पोषक आणि हायड्रेटिंग घटकांपासून बनवले जातात. वॉटर बेस्ड लोशनपेक्षा ते त्वचेला जास्त वेळ मऊपणा देतात. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने लोशन बार बनवू शकता. जाणून घ्या लोशन बार बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत
कसा बनवाल लोशन बार
लोशन बार घरी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात असलेले त्वचेला पोषक असे कोणतेही घटक वापरू शकता. आम्ही तुम्हाला याची एक सोपी पद्धत सांगत आहोत.
लोशन बारसाठी लागणारे साहित्य –
- एक कप नारळाचे तेल
- एक कप कोको बटर
- एक कप बी वॅक्स
- एक चमचा इसेंशिअल ऑईल
- एक चमचा व्हिटॅमिन ई ऑईल
- लोशन बार बनवण्याची पद्धत –
- एक सॉस पॅन घ्या आणि ती गॅसवरर गरम करा. गॅस मंद आंचेवर असू द्या.
- पॅनमध्ये नारळाचे तेल, शिया बटर, बी वॅक्स टाका आणि ते चांगले एकत्र करून घ्या.
- गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. थोडे थंड झाल्यावर त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका.
- बॅटर योग्य पद्धतीने सिलिकॉन मोल्डमध्ये टाकून थंड करा. मिश्रण पूर्ण थंड होई पर्यंत सिलिकॉन मोल्डला हात लावू नका.
- थंड झाल्यावर लोशन बार बाहेर काढा आणि फ्लिप रॅपमध्ये गुंडाळून ठेवा.
कसा करावा लोशन बारचा वापर –
लोशनबारचा वापर करणे अगदी सोपे आहे. यासाठी लोशन बार तळहातावर घ्या आणि हातावर थोडं चोळून घ्या. तळहाताच्या उष्णतेमुळे ते मेल्ट होऊन तुमच्या तळहाताला लागते. हातावर वितळलेले लोशन बार तुम्ही तुमच्या शरीरावरील सर्व त्वचेवर लावू शकता. एखाद्या लोशनप्रमाणे तुम्ही त्वचेवर हे लोशनबार लावू शकता. जर तुम्ही नियमित स्किन केअर रुटिन फॉलो करत असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी लोशन बार तुमच्या स्किन केअर रुटिनमध्ये समाविष्ट करू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य पोषण होईल आणि तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहिल. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी आणि त्वचा फ्रेश, टवटवीत दिसण्यासाठी लोशन बार तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. विशेष म्हणजे तुमच्या त्वचेचा प्रकार आणि त्वचेच्या गरजेनुसार हवे ते घटक वापरून तुम्ही लोशन बार तयार करू शकता.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
वाचा –
फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स