वांगी हा असा पदार्थ आहे जो खूप जणांना अजिबात आवडत नाही. खूप जण रोज तिच तिच वांग- बटाट्याची भाजी करतात. जर तुम्हाला वांग बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही वांग्याचा उपयोग करुन मस्त झणझणीत भरली वांगी बनवू शकता. भरली वांगी हा काही नवीन प्रकार नाही. भरली वांगी ही रेसिपी खूप जण करत असतील. ही रेसिपी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जर तुम्हाला थोडी वेगळी झणझणीत आणि वेगळी अशी भरली वांगी बनवायची असेल तर तुम्ही आम्ही सांगत असलेली मस्त रेसिपी बनवू शकता.
जाणून घ्या श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे
भरली वांगी बनवण्याची ही झणझणीत पद्धत
भरली वांगी बनवण्याची आम्ही सांगणारी पद्धत ही फारच सोपी आहे. ही भरली वांगी खूप ठिकाणी बनवली जाते. जर तुम्ही अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवत नसाल तर जाणून घ्या ही बनवण्याची योग्य पद्धत
साहित्य : काटेरी वांगी, (हिरवी वांगीदेखील चालतील), मूठभर शेंगदाणे, मूठभर तीळ, चणा डाळ, ¼ वाटी धणे, ¼ वाटी सुके खोबरे लाल तिखट, मीठ, कडीपत्ता, तेल, गोडा मसाला, काळा मसाला, घाटी मसाला, आलं-लूसण पेस्ट
घरी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू
कृती:
काटेरी वांगी स्वच्छ करुन घ्या. असे करताना तुम्हाला काटेरी वांग्याचे देठ तसेच ठेवायचे आहेत. वांग्याला चार चीरा पाडून त्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. यात मीठ थोडे जास्तीचे घाला. मीठ जितके जास्त असेल तितके ते कच्च्या वांग्याला चांगले लागते. त्यामुळे वांग्याची चवही वाढते.
आता तुम्हाला वांग्यासोबत किती ग्रेव्ही लागते यावर याचे प्रमाण अवलंबून आहे. ही ग्रेव्ही शेंगदाण्याची असल्यामुळे शेंगदाण्याच्या प्रमाणावर बाकीचे प्रमाण घ्या. शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणात तुम्हला पांढरे तीळ आणि चण्याची डाळ घ्यायची आहे. तितक्याच प्रमाणात तुम्हाला धणे घ्यायचे आहेत.
आता तव्यावर एक- एक साहित्य तेलात भाजून घ्यावे. सगळ्यात शेवटी तुम्हाला खोबरे भाजायचे आहे. भाजलेल्या सगळ्या साहित्यांची तुम्हाला एक छान पेस्ट करुन घ्यायची आहे. सगळे साहित्य खमंग भाजले तर ही पेस्टही तितकीच खमंग होते.
आता भरली वांगीला फोडणी देण्यासाठी तुम्हाला तीच कढई लागेल. कारण त्याच तेलात फोडणी द्यायची आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कडीपत्त्याची फोडणी द्यावी, त्यात आलं-लसूण पेस्ट घालून मग त्यात वांगी घालावी. ही वांग 50 टक्के शिजायला हवी. वांगी चांगली शिजली की त्या छान लागतात. आता वांगी शिजल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तयार पेस्ट घालून एकजीव करायेचे आहे. त्यामध्ये हळद, तिखट, घाटी मसाला, गोडा मसाला घालून चांगले एकजीव करुन झाकण लावून वांगी शिजायला ठेवायची आहेत.
साधारण 15 मिनिटांनी भरली वांग्यावर तुम्हाला चांगली तर्री आलेली दिसेल. ग्रेव्हीचा रंग चांगला बदलेपर्यंत तुम्हाला ती शिजवायची आहेत. त्यावर कोथिंबीर भुरभुरुन ही मस्त भरली वांगी तुम्हाला चपाती आणि भातासोबत खायची आहेत.
आता अशापद्धतीने भरली वांगी तुम्ही नक्की ट्राय करा.