मकरसंक्रात खूप जणांना लक्षात राहते ती म्हणजे त्या दिवशी मिळणाऱ्या छान तिळाच्या लाडूंमुळे. मकरसंक्रातीची माहिती तुम्हाला नक्कीच असेल. तिळाचा लाडू परफेक्ट झाला असेल तर तो खाण्याची इच्छा सतत होते. पण जर तिळाचा लाडू कडक किंवा खूपच नरम झाला तर तो खायची देखील इच्छा होत नाही. खूप जणांच्या तिळाचे लाडू हे कडक होतात. तर काही जणांच्या लाडूतून तिळ हे वेगळे होऊ लागतात. त्यामुळे असे लाडू तोंडात विरघळले तरी देखील ते खाण्याची इतकी मजा येत नाही. तिळाचे लाडू करताना खूप जणांना त्या लाडवासंदर्भात अनेक प्रश्न पडतात. तिळाचे फायदे लक्षात घेताना तिळाचा लाडू देखील परफेक्ट व्हायला हवा. त्यासाठीच तिळाच्या लाडू विषयी जाणून घेऊया सर्वकाही. मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देत तुम्ही हा आनंद शेअऱ देखील करु शकता.
तिळाच्या लाडूसाठी तिळाची निवड करताना
तिळाच्या लाडूसाठी तिळाची निवड ही देखील महत्वाची असते. बाजारात पॉलिश्ड आणि अनपॉलिश्ड असे दोन्ही प्रकारातील तिळ मिळतात. लाडूसाठी कोणताही तिळ निवडला तरी देखील चालू शकतो. पॉलिश्ड तिळाचे लाडू चकचकीत दिसतात. ते अधिक सफेद असतात. तर अनपॉलिश्ड तिळ हे थोडे पिवळे असतात. तुम्ही कोणत्याही तिळाची निवड करु शकता. कारण त्याने लाडवाच्या चवीत काहीही फरक पडत नाही. तर त्याच्या दिसण्यामध्ये फरक दिसतो. त्यामुळे तिळ तुमच्या आवडीनुसार निवडा. लहान मुलांना का घातले जाते बोरन्हाण हे देखील तुम्हाला या सोबत माहीत करुन घेणे गरजेचे आहे.
गूळ कोणता असावा
लाडूसाठी बाजारात खास चिकीचा गूळ मिळतो. हा चिकीचा गूळच लाडूसाठी वापरायला हवा. बाजारात या दिवसात चिकीचा गूळ जास्तीत जास्त मिळतो. त्यामुळे कोणताही गूळ निवडू नका. कारण चिकीचा गूळ हा लाडू धरुन ठेवण्यासाठी फारच जास्त फायद्याचा असतो. घरी असलेला गूळ वापरुन तुम्ही लाडू बनवण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात चालणार नाही. तुम्ही त्यासाठ खास चिकीचा गूळ वापरायला हवा. चिकीचा गूळ एकदम चिकट असतो. तो पटकन तुटत नाही. त्यामुळे तो चिरताना वेळ लागतो पण त्याचा लाडू चांगलाच लागतो.
गुळाचा पाक तयार करताना
गुळाचा पाक करणे सगळ्यात जास्त महत्वाचे असते. गुळाचा पाक करताना तुम्हाला एका मोठ्या कढईत गुळाचा पाक करायचा आहे. गुळाचा पाक करताना भांड्यात एक किलोला साधारण दीड पेला इतके पाणी वापरायचे असते. सुरुवातीला पाण्याचा एक भाग पाणी गरम करुन त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये उर्वरित गूळ घालून त्याचा छान गोळीबंद पाक करायचा आहे. पाक बनवायचे काम सगळ्यात शेवटी करायचे असते. त्याआधी तुम्ही तिळ, डाळं आणि खोबरं भाजून घ्यायचं असतं. म्हणजे पाकात सारण टाकल्या टाकल्या लाडू पटपट वळता येतात.
आता तुम्ही नक्कीच अशापद्धतीने लाडू बनवा. यंदा तुमचे लाडू नक्कीच परफेक्ट होतील.
अधिक वाचा
मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे
संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाची अशी करा तयारी