ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
सर्वात सोप्या पद्धतीने बनवा होममेड शिमर लिप बाम

सर्वात सोप्या पद्धतीने बनवा होममेड शिमर लिप बाम

ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करत असाल. मात्र असं असूनही तुमचे ओठ काळवंडलेले, रूक्ष आणि कोरडे दिसू  शकतात. बऱ्याचदा बाहेरील बदलेले वातावरण, धुळ, माती, प्रदूषण, मेकअप याचा परिणाम तुमच्या ओठांवर होत असतो. आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी ओठ फक्त मऊ असून चालत नाही ओठ रंगीत आणि चमकदार दिसावे असं प्रत्येकीला वाटत असतं. मेकअप करताना मग तुम्ही गडद  आणि शिमरच्या लिपस्टिक वापरता. मात्र सतत लिपस्टिक लावण्यामुळेही तुमचे ओठ काळवंडू शकतात. ओठांचा मऊपणा कमी झाल्यामुळे ओठ कोरडे पडतात आणि फुटून त्यातून रक्त येऊ लागतं. अशा वेळी तुम्हाला गरज असते चांगल्या लिप बामची… मात्र बाजारात विकत मिळणाऱ्या लिपबाममध्ये तुम्हाला हवे तसे परिणाम देणारे घटक असतीलच असं नाही. ओठांची निगा राखण्यासाठी काही वेळ ओठांवर लिपस्टिक ऐवजी चांगल्या गुणवत्तेचे लिपबाम लावणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या ओठांना लिपस्टिकप्रमाणे मनासारखा  रंग तर मिळतोच शिवाय तुमचे ओठ मऊदेखील राहतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असं लिप बाम शेअर करत आहोत जे तुम्ही फक्त घरातच नाही तर बाहेर लिपस्टिकप्रमाणे वापरू शकता. शिमर लिप बाममुळे तुमच्या ओठांना पोषण आणि चमक मिळते. यासाठीच जाणून  घ्या घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये आणि सहज शिमर लिप बाम कसं तयार करावं. 

शिमर लिप बाम घरी बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत

शिमर लिप बाम तुम्हाला बाजारातून विकत घेण्याची मुळीच गरज नाही. आम्ही दिलेल्या या स्टेप बाय स्टेप पद्धतीने तु्म्ही घरच्या घरी तुमच्या आवडत्या शेडचे शिमर लिप बाम बनवू शकता. 

शिमर लिप बामसाठी लागणारे साहित्य –

  • एक चमचा कॉस्मेटिक ग्रेड मिका पिगमेंटेड पावडर
  • एक चमचा कोको पावडर
  • एक चमचा शिया बटर
  • दोन चमचे बी वॅक्स
  • काही थेंब कोणतेही इसेंशिअल ऑईल
  • एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल

pexels

ADVERTISEMENT

शिमर लिप बाम बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत –

स्टेप 1 – शिया बटर, बी वॅक्स डबल बॉयलर पद्धतीने वितळवा. डबल बॉयलर म्हणजे एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात एक छोटे भांडे ठेवून त्यात शिया बटर आणि बी बॅक्स वितळवा.

स्टेप 2 –मिश्रणामध्ये व्हिटॅमन ई कॅप्सुल टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.

स्टेप 3 – मिश्रणात काही थेंब तुमच्या आवडीचे इसेंसिअल ऑईल मिसळा आणि चांगले मिक्स करा.

स्टेप 4 – तुमच्या आवडीच्या रंगाचे लिप बाम बनवण्यासाठी तुमच्या आवडीच्या रंगाची कॉस्मॅटिक ग्रेड मिका पिगमेंटेड पावडर त्यात मिसळा. गरजेनुसार थोडी कोको पावडरही मिसळा

ADVERTISEMENT

स्टेप 5 – सर्व मिश्रण एकजीव करा आणि  एका छोट्या डबीत भरून ठेवा. मिश्रण थंड होण्यासाठी थोडावर बाहेर अथवा फ्रीजमध्ये ठेवा.

तुमचे शिमर लिप बाम तयार आहे.या लिपबाममुळे तुमचे ओठ मऊ, चमकदार आणि सुंदर दिसतील.आम्ही शेअर केलेली लिप बाम बनवण्याची पद्धत तुम्ही ट्राय केली का आणि त्याचा तुम्हाला काय इफेक्ट मिळाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

हेअर प्रॉडक्ट वापरताना मुळीच चुकवू नका हा क्रम

DIY Hacks: जाणून घ्या आपल्या केसांसाठी फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्याचे फायदे

वापरण्यापूर्वी असे स्वच्छ करा तुमचे हेअर स्ट्रेटनर

11 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT